तुमची Google Maps प्रोफाइल पाहणे आणि संपादित करणे

तुमची Maps सार्वजनिक प्रोफाइल तुम्हाला तुमचे फोटो, परीक्षणे, सूची आणि Maps मधील इतर आशय दाखवू देते. तुमच्या Maps प्रोफाइलमध्ये, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

टीप: तुमच्या प्रोफाइलवर तुमचे नाव, फोटो आणि माहिती कायम दिसेल.

तुमचे नाव आणि फोटो बदलणे

तुमचे नाव आणि फोटो या गोष्टी तुमच्या Maps प्रोफाइलमध्ये सर्वात वरती दिसतात.

तुमचे नाव आणि फोटो बदलण्यासाठी:

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. योगदान द्या Contribute आणि त्यानंतर तुमची प्रोफाइल पाहा आणि त्यानंतर प्रोफाइल संपादित करा Edit आणि त्यानंतर नाव आणि फोटो संपादित करा वर टॅप करा.
  3. तुमचे नाव एंटर करा किंवा फोटो निवडा.
  4. सेव्ह करा वर टॅप करा.

महत्त्वाचे: तुम्ही तुमचे नाव आणि फोटो बदलता तेव्हा, तो बदल तुम्ही वापरत असलेल्या Google च्या सर्व उत्पादनांमध्ये दिसतो.

तुमची माहिती जोडणे किंवा संपादित करणे

तुमच्याबद्दल आणि तुम्हाला आवडणाऱ्या ठिकाणांबद्दल इतरांना सांगण्यासाठी, तुमच्या सार्वजनिक प्रोफाइलमध्ये तुमची संक्षिप्त माहिती जोडा. 

टीप: तुमची प्रोफाइल निर्बंधित असली तरीही, तुमची माहिती प्रत्येकाला दिसते.

माहिती जोडणे
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. योगदान द्या Contribute आणि त्यानंतर तुमची प्रोफाइल पाहा आणि त्यानंतर प्रोफाइल संपादित करा Edit वर टॅप करा.
  3. तुमची माहिती लिहा (कमाल २०० वर्ण).
  4. सेव्ह करा वर टॅप करा.
तुमची माहिती संपादित करणे
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. योगदान द्या Contribute आणि त्यानंतर तुमची प्रोफाइल पाहा आणि त्यानंतर प्रोफाइल संपादित करा Edit वर टॅप करा.
  3. तुमची माहिती संपादित करा.
  4. सेव्ह करा वर टॅप करा.
तुमची माहिती काढून टाकणे
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. योगदान द्या Contribute आणि त्यानंतर तुमची प्रोफाइल पाहा आणि त्यानंतर प्रोफाइल संपादित करा Edit वर टॅप करा.
  3. तुमची माहिती हटवा.
  4. सेव्ह करा वर टॅप करा.

स्थानिक मार्गदर्शक पातळी, गुण आणि बॅज पाहणे

तुम्ही स्थानिक मार्गदर्शक असल्यास, Google Maps ॲपमध्ये तुम्ही तुमची पातळी, गुण आणि बॅज पाहू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. योगदान द्या Contribute आणि त्यानंतर तुमची प्रोफाइल पाहा वर टॅप करा.
  3. तुमच्या नावांतर्गत, तुमची स्थानिक मार्गदर्शक पातळी आणि गुण पाहणे. तुमचे बॅज आणि योगदानांची संख्या पाहण्यासाठी, ॲरो arrow वर टॅप करा.

विषयासंबंधित चिपबद्दल

विषयासंबंधित चिप या तुम्ही Maps वर सार्वजनिकरीत्या काय लिहिता यावर आधारित असतात. त्या तुम्हाला स्वारस्य असणाऱ्या विषयांचे वारंवार परीक्षण करणार्‍या लोकांना शोधण्यासाठी मदत करण्याकरिता दाखवल्या जातात. विषयासंबंधित चिप या पाकशैली, खाद्यपदार्थ किंवा तुम्ही लिहिलेल्या इतर ठिकाणांवर आधारित असू शकतात.

टीप: तुम्ही कंट्रिब्युटरचे परीक्षण आणि फोटो फिल्टर करण्यासाठी विषयासंबंधित चिप वापरू शकता.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11025324641968307418
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false