Google Maps वर ठिकाणाबद्दल प्रश्न विचारणे आणि उत्तरे देणे

Google Maps मध्ये दिसणारी ठिकाणे आणि व्यवसाय यांबद्दल तुम्ही प्रश्न विचारू शकता व उत्तरे देऊ शकता. व्यवसाय मालक आणि इतर लोक या प्रश्नोत्तरांना थेट प्रतिसाद देऊ शकतात. तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवरील शोधामधून आणि Google Maps वरून प्रश्न विचारू शकता किंवा उत्तरे देऊ शकता.

प्रश्न विचारा

Google Maps मध्ये
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. ठिकाण किंवा शहर शोधा अथवा ते नकाशावर टॅप करा.
  3. तळाशी, ठिकाणाच्या नावावर टॅप करा.
  4. “प्रश्न आणि उत्तरे" अंतर्गत, तुम्हाला काय करायचे आहे ते निवडा:
    • तुमचा प्रश्न आधीच कोणीतरी विचारला आहे का ते शोधण्यासाठी: सर्व प्रश्न पहा वर टॅप करा.
    • नवीन प्रश्न विचारण्यासाठी: प्रश्न विचारा वर टॅप करा.
    • तुमचा प्रश्न संपादित करण्यासाठी किंवा हटवण्यासाठी: आणखी आणखी आणि त्यानंतर प्रश्न संपादित करा किंवा प्रश्न हटवा वर टॅप करा.

तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले जाते तेव्हा, तुम्हाला सूचना मिळेल.

Google Search मध्ये
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google उघडा.
  2. एखादे ठिकाण किंवा शहर शोधा.
  3. "प्रश्न आणि उत्तरे" विभागावर स्क्रोल करा.
  4. नवीन प्रश्न विचारण्यासाठी, समुदायाला विचारा वर टॅप करा.

प्रश्न किंवा उत्तरे यांसंबधित तक्रार करणे

प्रश्न आणि उत्तरासंबंधित धोरणे

Google उत्पादने वापरणाऱ्या प्रत्येकासाठी सकारात्मक अनुभव कायम ठेवण्याकरिता खाली सूचीबद्ध केलेली आशय धोरणे महत्त्वाची भूमिका बजावतात. या सेवा देण्याच्या आमच्या क्षमतेला धोका निर्माण करणाऱ्या गैरवर्तनांवर नियंत्रण ठेवणे आमच्यासाठी आवश्यक आहे आणि हे ध्येय गाठण्यात आम्हाला मदत करण्यासाठी प्रत्येकाने खालील धोरणांचे पालन करावे अशी आम्ही विनंती करतो. ही धोरणे बदलू शकत असल्यामुळे, ती वेळोवेळी परत तपासा. 

आशय: खालीलपैकी कोणत्याही आशय धोरणांचे उल्लंघन करणारा आशय आम्ही काढून टाकू:

  • जाहिरात करणे: जाहिरात करण्यासाठी प्रश्नोत्तरांचा वापर करू नका. इतर वेबसाइटच्या लिंक किंवा वेगळ्या ठिकाणाचे फोन नंबर जोडू नका. प्रश्न आणि उत्तरे ही एखाद्या ठिकाणाबाबत तुमच्या अनुभवाचे खरे प्रतिबिंब असणे आवश्यक आहे. 
  • स्पॅम: स्पॅम करू नका. प्रचारात्मक किंवा व्यावसायिक आशयाचा समावेश करू नका, एकच आशय एकाहून अधिक वेळा पोस्ट करू नका आणि एकाच ठिकाणासाठी एकाहून अधिक खात्यांमधून प्रश्न व उत्तरे लिहू नका.
  • फोन नंबर किंवा ईमेल अ‍ॅड्रेस: जाहिरात आणि स्पॅमी प्रश्नोत्तरे रोखण्यात मदत करण्यासाठी, आम्ही फोन नंबर किंवा ईमेल अ‍ॅड्रेस पोस्ट करण्याची अनुमती देत नाही. तुम्हाला अपडेट केलेला नंबर किंवा ईमेल अ‍ॅड्रेस जोडायचा असल्यास, त्या माहितीसंबंधित तक्रार करण्यासाठी त्याऐवजी समस्येची तक्रार करा ही लिंक वापरा. तुम्ही सूचीचे नोंदणीकृत Business Profile मालक असल्यास, तुम्ही तुमच्या उत्तरांमध्ये फोन नंबर पोस्ट करू शकता.
  • विषयाला अनुसरून नसलेली प्रश्नोत्तरे: दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या अनुभवावर आधारित असलेली किंवा तुम्ही उत्तर देत असलेल्या ठरावीक ठिकाणाशी संबंधित नसलेली उत्तरे पोस्ट करू नका. प्रश्नोत्तरे म्हणजे सर्वसाधारण राजकीय किंवा सामाजिक भाष्य अथवा वैयक्तिक भांडवलासाठी वापरण्याचा फोरम नाही. एखाद्या चुकीच्या स्थानाबद्दल किंवा बंद झालेल्या ठिकाणाबद्दल तक्रार करायची असल्यास, प्रश्नोत्तरे पोस्ट करण्याऐवजी समस्येची तक्रार करा ही लिंक वापरा. फक्त प्रश्न पोस्ट करण्यासाठी "प्रश्न विचारा" हा बॉक्स वापरा. परीक्षणे आणि टिप्पण्या काढून टाकल्या जातील.
  • सभ्य भाषा वापरा: अश्लील, असभ्य किंवा आक्षेपार्ह भाषा वापरू नका. इतरांवर वैयक्तिक हल्ल्याचे प्रतिनिधित्व करणारी प्रश्नोत्तरेदेखील आम्ही काढून टाकू.
  • स्वारस्याबद्दल दुमत: प्रश्न आणि उत्तरे ही प्रामाणिक व निष्पक्षपाती असतात तेव्हा, सर्वात जास्त मौल्यवान ठरतात. एखाद्या व्यवसायासाठी प्रश्न किंवा उत्तरे लिहिण्यासाठी अथवा स्पर्धकाबद्दल नकारात्मक प्रश्न किंवा उत्तरे लिहिण्यासाठी पैसे, उत्पादने अथवा सेवा देऊ नका किंवा स्वीकारू नका. तुम्ही व्यवसाय मालक असल्यास, फक्त तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणाबद्दल लिहिलेल्या प्रश्नोत्तरांबाबत विचारणा करण्यासाठी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी स्टेशन किंवा कियोस्क सेट करू नका. तसेच, प्रचारात्मक मत देण्याऐवजी निष्पक्षपातीपणे प्रश्नोत्तरांच्या बाजूने मत द्या. 
  • बेकायदेशीर आशय: प्रीस्क्रिप्शन आवश्यक असलेल्या औषधांची प्रीस्क्रिप्शनशिवाय विक्री सुलभ करणाऱ्या लिंक यासारखा बेकायदेशीर आशय किंवा त्याची लिंक यांचा समावेश असलेली प्रश्नोत्तरे पोस्ट करू नका.
  • कॉपीराइट केलेला आशय: कॉपीराइटच्या समावेशासह इतरांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी प्रश्नोत्तरे पोस्ट करू नका. अधिक माहितीसाठी किंवा DMCA विनंती दाखल करण्यासाठी, आमच्या कॉपीराइट प्रक्रियांचे पुनरावलोकन करा.
  • लैंगिकदृष्ट्या भडक साहित्य: आम्ही लैंगिकदृष्ट्या भडक आशयाचा समावेश असलेल्या प्रश्नोत्तरांना अनुमती देत नाही. लहान मुलांचे शोषण किंवा त्यांच्याशी गैरवर्तन करणार्‍या आशयाची माहिती मिळवू किंवा देऊ नका. या विषयासंबंधित प्रश्न आणि उत्तरे काढून टाकली जातील. Google योग्य ती कारवाई करेल, ज्यामध्ये खाती बंद करणे आणि नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन (NCMEC) व कायदा अंमलबजावणी संस्था यांकडे तक्रार करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश असू शकतात.
  • तोतयेगिरी: इतरांच्या वतीने प्रश्नोत्तरे पोस्ट करू नका किंवा तुमची ओळख अथवा तुम्ही परीक्षण लिहित असलेल्या ठिकाणाशी असलेले तुमचे नाते याबद्दल दिशाभूल करू नका.
  • वैयक्तिक आणि गोपनीय माहिती: क्रेडिट कार्डची माहिती, सरकारी ओळख क्रमांक, ड्रायव्हरच्या परवान्याची माहिती इत्यादींच्या समावेशासह दुसर्‍या व्यक्तीची वैयक्तिक आणि गोपनीय माहिती असलेली प्रश्नोत्तरे पोस्ट करू नका.
  • द्वेषयुक्त भाषण: वंश किंवा वांशिक मूळ, धर्म, अपंगत्व, लिंग, वय, ज्येष्ठत्व, लैंगिक प्राधान्य अथवा लिंगाधारित ओळख यांवर आधारित लोकांच्या गटांविरुद्ध समर्थित असलेल्या प्रश्नोत्तरांना आम्ही अनुमती देत नाही.
  • नियमन केलेल्या वस्तू आणि सेवा: अल्कोहोल, जुगार, औषधनिर्माण आणि मान्यता नसलेला पूरक आहार, तंबाखू, फटाके, शस्त्रे किंवा आरोग्य अथवा वैद्यकीय उपकरणे यांसारख्या नियमन केलेल्या वस्तू व सेवांची विक्री करण्यासाठी किंवा विक्री सुलभ करण्यासाठी सेवेचा वापर करू नका.
अयोग्य प्रश्न किंवा उत्तरांबद्दल आम्हाला सांगा
  1. प्रश्न किंवा उत्तराच्या बाजूला, आणखी वर टॅप करा.
  2. प्रश्नासंबंधित तक्रार करा किंवा उत्तरासंबंधित तक्रार करा वर टॅप करा.

एखाद्या व्यक्तीच्या प्रश्नाचे उत्तर द्या

इतरांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीत असल्यास, तुम्ही त्यांना Google Maps किंवा Search मध्ये उत्तर देऊ शकता.

Google Maps मध्ये
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. ठिकाण शोधा किंवा नकाशामध्ये त्यावर टॅप करा.
  3. तळाशी, ठिकाणाच्या नावावर टॅप करा.
  4. "प्रश्न आणि उत्तरे" या अंतर्गत, प्रश्न पहा वर टॅप करा.
  5. प्रश्नाच्या बाजूला, उत्तर द्या वर टॅप करा.

तुमचे उत्तर संपादित करण्यासाठी किंवा हटवण्यासाठी, आणखी वर टॅप करा आणि त्यानंतर उत्तर संपादित करा किंवा उत्तर हटवा वर टॅप करा.

Google Search मध्ये
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google उघडा.
  2. ठिकाण किंवा शहर शोधा.
  3. खाली "प्रश्न आणि उत्तरे" विभागावर स्क्रोल करा.
  4. प्रश्न पहा वर टॅप करा.
  5. प्रश्नाच्या खाली, उत्तर वर टॅप करा.

तुमचे उत्तर संपादित करण्यासाठी किंवा हटवण्यासाठी: आणखी and thenसंपादित करा किंवा हटवा वर टॅप करा.

टिपा:

तुमचे प्रश्न किंवा उत्तरे शोधा

तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर किंवा उत्तर दिल्यानंतर, ती माहिती तुमच्या Google Maps योगदानांमध्ये पाहू शकता.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. योगदान द्या Contribute वर टॅप करा.
    • आवश्यक असल्यास, सर्वात वरती, तुम्हाला प्रश्नोत्तरे दिसेपर्यंत मेनू बार ड्रॅग करा.
  3. प्रश्नोत्तरे वर टॅप करा.
  4. तुमच्या प्रश्न आणि उत्तरांच्या सूचीमध्ये स्क्रोल करा.

सूचना बंद करा

तुमच्या व्यवसायाशी संबंधित मेसेज लपवा

एखादी व्यक्ती तुमच्या व्यवसायाबद्दल विचारणा करते तेव्हा, तुम्हाला मेसेज मिळतो.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह  आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. सूचना आणि त्यानंतर  लोक आणि ठिकाणे वर टॅप करा.
  4. व्यवसाय सूची बंद करा.
प्रश्न आणि उत्तरांशी संबंधित मेसेज लपवा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह  आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. सूचना आणि त्यानंतर  तुमची योगदाने वर टॅप करा.
  4. समुदायाशी संबंधित प्रश्न आणि उत्तरे बंद करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2796269178286102221
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false