Google Maps वरील व्यवसाय माहिती संपादित करणे

तुम्हाला एखादे ठिकाण माहीत असल्यास, Google Maps ला ठिकाणाची माहिती बदलावी की नाही हे ठरवण्यात मदत करणारा फीडबॅक तुम्ही देऊ शकता.

महत्त्वाचे:

  • तुम्ही एखाद्या व्यवसायाचे मालक असल्यास किंवा तो व्यवस्थापित करत असल्यास, तुमच्या व्यवसाय माहितीमध्ये कशी सुधारणा करावी ते जाणून घ्या.
  • तुम्ही ठिकाणाविषयी सूचना देण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केले असल्याची खात्री करा.
  • तुम्ही व्यवसाय ॲट्रिब्यूट फक्त निवडक देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये संपादित करू शकता.

ठिकाणाचे व्यवसाय तास बदला

  1. Google Maps Maps उघडा.
  2. ठिकाण शोधा किंवा ते नकाशावर निवडा.
  3. व्यवसायाचे तास दाखवण्यासाठी: अवलोकन टॅब निवडा. तास hours वर स्क्रोल करा आणि डाउन अ‍ॅरो डाउन ॲरो निवडा.
  4. संपादन सुचवा निवडा.
  5. पुढीलपैकी एक निवडा:
    • व्यवसाय तास चुकीचे असल्यास: तुम्हाला बदलायच्या असलेल्या तासांच्या बाजूला, संपादित करा निवडा.
    • काही किंवा सर्व व्यवसाय तास उपलब्ध नसल्यास: तळाशी, तास संपादित करा निवडा.
      • एखाद्या ठिकाणाच्या, दिवसाच्या मधल्या वेळी असणारा लंच ब्रेक यांसारख्या उघडण्याच्या किंवा बंद होण्याच्या अतिरिक्त वेळा असल्यास, तपशील भरण्यासाठी तास जोडा निवडा.
  6. तुमची संपादने पूर्ण करा आणि सेव्ह करा निवडा.
टीप: तुमच्या सूचनेची पडताळणी करण्यासाठी फोटो जोडा. तुमचे फोटो तुमच्या नावाअंतर्गत सार्वजनिकरीत्या उपलब्ध आहेत.

ठिकाणाचे नाव, स्थान किंवा इतर तपशील बदला

  1. Google Maps Maps उघडा.
  2. ठिकाण शोधा किंवा ते नकाशावर निवडा.
  3. संपादन सुचवा आणि त्यानंतर नाव किंवा इतर तपशील बदला निवडा. 
  4. तुमचा फीडबॅक सबमिट करण्यासाठी, स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.
टीप: तुमच्या सूचनेची पडताळणी करण्यासाठी फोटो जोडा. तुमचे फोटो तुमच्या नावाअंतर्गत सार्वजनिकरीत्या उपलब्ध आहेत.

Google Maps मध्ये ठिकाणाच्या सेवा आणि वैशिष्ट्ये संपादित करणे

तुम्ही एखाद्या ठिकाणामधील सेवांचे पर्याय, हायलाइट, अ‍ॅक्सेसिबिलिटी, उपलब्ध असलेले खास खाद्यपदार्थ किंवा पेये, जेवणाचे पर्याय, सुविधा, वातावरण, तेथील लोकांचा दर्जा, योजना करताना लक्षात घेण्यासारख्या गोष्टी किंवा पेमेंटचे पर्याय यांचे वर्णन करू शकता.

महत्त्वाचे: तुम्ही फक्त मोबाइल डिव्हाइसवरील व्यवसाय विशेषतांमध्ये संपादने सुचवू शकता.

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या व्यवसायाची प्रोफाइल शोधा.
  3. टॅब सिलेक्टर बारमध्ये, तिरपे स्क्रोल करा आणि याविषयी आणि त्यानंतर वैशिष्ट्ये आणि त्यानंतर वैशिष्ट्ये संपादित करा वर टॅप करा.
  4. दिलेल्या वर्णनांपैकी, एखाद्या वर्णनामध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यासाठी त्यावर टॅप करा:
    • योग्य
    • चुकीचे
    • खात्री नाही
  5. तुमचे संपादित करणे पूर्ण झाल्यानंतर, सबमिट करा वर टॅप करा.

सुधारणा प्रकाशित करण्यासाठी असणारा प्रतीक्षा कालावधी

Maps हे अचूक आणि अप टू डेट असल्याची खात्री करण्यासाठी, तुम्ही केलेल्या सर्व संपादनांचे आम्ही पुनरावलोकन करतो. नकाशावर बदल दिसण्यासाठी वेळ लागू शकतो आणि आम्ही तुम्हाला तुमच्या संपादनांच्या स्टेटसविषयी अपडेट देत राहू.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2222504034169272672
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false