तुमची Google Maps ची iOS विजेट जोडणे आणि कस्टमाइझ करणे

घर आणि ऑफिस यांसारख्या तुमच्या वारंवार प्रवासासाठी येण्याची वेळ आणि रहदारीसंबंधित अपडेट तपासण्यासाठी, तुमच्या iOS डिव्हाइसवर Google Maps विजेट जोडा.
 

तुमची लॉक स्‍क्रीन विजेट व्यवस्थापित करणे

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य फक्त iOS 16 आणि त्यावरील व iPadOS 16 आणि त्यावरील आवृत्तीसाठी उपलब्ध आहे. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या iOS डिव्हाइसवर Google Maps अ‍ॅपदेखील इंस्टॉल करणे आवश्यक आहे.

नवीन लॉक स्‍क्रीन विजेट जोडा आणि कॉंफिगर करा

  1. तुमच्या iPhone वर, लॉक स्क्रीन वर जा.
  2. लॉक स्क्रीन अनलॉक करा.
  3. कस्टमायझेशन मोड पाहण्यासाठी, लॉक स्‍क्रीन वर कुठेही टॅप करा आणि धरून ठेवा.
  4. कस्टमाइझ करा वर टॅप करा.
  5. लॉक स्क्रीन कस्टमाइझ करण्यासाठी, लॉक स्क्रीन निवडा.
  6. लॉक स्क्रीन विजेट गॅलरी पाहण्यासाठी, विजेट जोडा वर टॅप करा.
    1. तुम्हाला हवे असलेले विजेट शोधा आणि निवडा.
    2. लॉक स्क्रीन विजेट बारवर विजेटवर टॅप करा किंवा ड्रॅग करा.
    3. विजेट काँफिगर करण्यासाठी, लॉक स्क्रीन वर विजेट जोडल्यावर त्यावर टॅप करा.
    4. तुम्हाला हवे असलेले कॉंफिगरेशन निवडा.
    5. विजेट गॅलरीमध्ये, बंद करा बंद करा आयकनवर टॅप करा.
  7. पूर्ण झाले वर टॅप करा.
  8. कस्टमायझेशन मोडमधून बाहेर पडण्यासाठी, लॉक स्क्रीन वर टॅप करा.

सध्याचे लॉक स्‍क्रीन विजेट कॉंफिगर करा

  1. तुमच्या iPhone वर, लॉक स्क्रीन वर जा.
  2. लॉक स्क्रीन अनलॉक करा.
  3. तुमचे विजेट कस्टमाइझ करण्यासाठी, लॉक स्‍क्रीन वर कुठेही टॅप करा आणि धरून ठेवा.
  4. कस्टमाइझ करा वर टॅप करा.
  5. लॉक स्क्रीन कस्टमाइझ करण्यासाठी, लॉक स्क्रीन निवडा.
  6. लॉक स्क्रीन विजेट गॅलरीवर पोहोचण्यासाठी, सद्य विजेटवर टॅप करा.
    1. विजेट काँफिगर करण्यासाठी, विजेटवर पुन्हा टॅप करा.
    2. तुम्हाला हवे असलेले कॉंफिगरेशन निवडा.
    3. विजेट गॅलरीमध्ये, बंद करा बंद करा आयकनवर टॅप करा.
  7. पूर्ण झाले वर टॅप करा.
  8. कस्टमायझेशन मोडमधून बाहेर पडण्यासाठी, लॉक स्क्रीन वर टॅप करा.

तुमचे होम स्क्रीन विजेट व्यवस्थापित करा

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य फक्त iOS 11 आणि त्यावरील आवृत्तीवर उपलब्ध आहे.

होम स्क्रीन विजेट सुरू करणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, होम स्क्रीनवर टॅप करून धरून ठेवा.
  2. सर्वात वरती डावीकडे, जोडा वर टॅप करा.
  3. Google Maps अ‍ॅप शोधा आणि त्यावर टॅप करा.
  4. विजेटचा आकार आणि प्रकार निवडण्यासाठी, उजवीकडे किंवा डावीकडे स्‍वाइप करा.
  5. या विजेटदरम्यान निवडा:
    • प्रवासाची रीअल-टाइम माहिती पहा: तुमच्या वारंवार केल्या जाणाऱ्या प्रवासांसाठी दिशानिर्देश आणि आगमनाची अंदाजे वेळ झटपट मिळवा.
    • जाण्यापूर्वी जाणून घ्या: रहदारीची नवीनतम स्थिती तपासा, स्थानाशी संबंधित तपशील, स्टोअर उघडण्याच्या वेळा, रेस्टॉरंटविषयक परीक्षणे पहा आणि आणखी बरेच काही करा.
    • जवळपासची ठिकाणे शोधा: कामाचे तास, फोटो, परीक्षणे आणि आणखी बरेच काही पहा.
  6. विजेट जोडा वर टॅप करा.
  7. तुमच्या होम स्क्रीनवर विजेट ठेवा.
  8. सर्वात वरती उजवीकडे, पूर्ण झाले वर टॅप करा.

विजेट बंद करणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, होम स्क्रीनवर जा.
  2. Google Maps विजेटवर टॅप करून धरून ठेवा.
  3. विजेट संपादित करा वर टॅप करा.
  4. विजेट बंद करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11998125123892003370
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false