Google Maps वरून OpenTable द्वारे आरक्षणे करणे

OpenTable या एका ऑनलाइन आरक्षण साइटवरून युनायटेड स्टेट्समधील रेस्टॉरंटमध्ये आरक्षणे करण्यासाठी Google Maps अ‍ॅप वापरा.

तुम्ही Google वर आरक्षित करा वापरून डायनिंग आरक्षणेदेखील करू शकता.

आरक्षण करणे

  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. रेस्टॉरंट शोधा किंवा नकाशावरील रेस्टॉरंटवर टॅप करा.
  3. अधिक माहिती पाहण्यासाठी, रेस्टॉरंटच्या नावावर टॅप करा. रेस्टॉरंट OpenTable वापरत असल्यास, तुम्हाला उपलब्ध वेळेच्या स्लॉटसह "टेबल शोधा" विभाग दिसेल.
  4. रेस्टॉरंट उघडण्याची वेगवेगळी वेळ आणि पार्टीतील लोकांची संख्या पाहण्यासाठी, आरक्षणाची वेळ आणि पार्टीतील लोकांची संख्या अपडेट करा.

टीप: तुमचा Google ईमेल OpenTable वर नोंदणीकृत असल्यास, तुम्हाला तुमच्या आरक्षणासाठी डायनिंग रिवॉर्ड पॉइंटदेखील मिळतील.

 

तुमचे आरक्षण निश्चित करा

तुमचे आरक्षण निश्चित करणारे पेज तुम्हाला दिसेल. लवकरच तुम्हाला OpenTable कडून कंफर्मेशन ईमेल मिळेल.

तुमचे आरक्षण बदलणे किंवा रद्द करणे

तुमचे आरक्षण बदलण्यासाठी किंवा रद्द करण्याकरिता, खालील पायऱ्या फॉलो करा:

  1. OpenTable कडून मिळालेला कंफर्मेशन ईमेल उघडा.
  2. बदला किंवा रद्द करा वर टॅप करा.

समस्या ट्रबलशूट करा

मला "ही कृती पूर्ण झाली नाही" अशी एरर दिसत आहे 

तुमचे आरक्षण निश्चित करण्यासाठी Google हे OpenTable शी कनेक्ट करू शकत नसल्यास, तुम्हाला ही एरर दिसेल.

पुन्हा प्रयत्न करण्यासाठी, पुन्हा सुरुवात करा वर टॅप करा.

माझ्या मालकीचे रेस्टॉरंट असून मला Google Maps मध्ये "टेबल शोधा" दिसत नाही

"टेबल शोधा" विभागासाठी, तुमचे रेस्टॉरंट Google वर आरक्षित करा याचा भाग असणे आणि ते युनायटेड स्टेट्समध्ये असणे आवश्यक आहे.

तुमचे रेस्टॉरंट OpenTable नेटवर्क चा भाग असल्यास पण, ते दाखवत नसल्यास, OpenTable शी संपर्क साधा.

तुम्ही आरक्षण करता तेव्हा, शेअर केली जाते ती माहिती

आरक्षण निश्चित करण्यासाठी OpenTable ला तुमचे नाव, फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस आवश्यक असतो. ही माहिती ते कशी वापरतात आणि तिचे संरक्षण कसे करतात याबद्दल जाणून घेण्यासाठी, त्यांचे गोपनीयता धोरण आणि वापर अटी तपासा. 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16768936912048840115
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false