जवळपासची ठिकाणे शोधणे आणि भाग एक्सप्लोर करणे

तुम्ही Google Maps मध्ये स्वारस्य असलेली ठिकाणे, करण्यासारख्या गोष्टी किंवा उल्लेखनीय स्थाने शोधू शकता. जवळपासची संग्रहालये, नवीन रेस्टॉरंट आणि प्रसिद्ध बार व क्लब यांसारखी ठिकाणे शोधा. तुम्ही Maps मध्ये या ठिकाणांची रेटिंग आणि तपशीलदेखील पाहू शकता.

महत्त्वाचे:

  • Google Maps मध्ये वेगवेगळ्या स्रोतांकडील आशय असतो. तुमच्या Maps च्या परिणामांमध्ये आमचे भागीदार, आमचे वापरकर्ते किंवा सार्वजनिक वेब यांच्या समावेशासह विविध स्रोतांकडील माहितीचा समावेश असू शकतो. आशय हा आमची आशय धोरणे किंवा लागू असलेल्या कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचे आम्हाला आढळल्यास, Google तो काढून टाकू शकतो.
  • Maps मधील स्थानिक शोध परिणाम हे प्रामुख्याने सुसंबद्धता, अंतर आणि महत्त्व यांवर आधारित असतात. तुमच्या शोधासाठी सर्वोत्तम जुळणी शोधण्यात मदत करण्यासाठी हे घटक एकत्र केले जातात. उदाहरणार्थ, Google अल्गोरिदम हे असे ठरवू शकतात, की तुमच्यापासून जवळ असलेल्या व्यवसायापेक्षा तुमच्यापासून खूप दूर अंतरावर असलेल्या व्यवसायामध्ये तुम्ही शोधत असलेली गोष्ट असू शकते. त्यामुळे, स्थानिक परिणामांमध्ये तो आणखी वरच्या पातळीवर रँक करू शकतात.
  • Google Maps मधील परिणामांवर इतर कंपन्यांद्वारे केलेल्या पेमेंटचा प्रभाव नसतो. Google Maps मधील सशुल्क आशयाला लेबल लावले जाते.

विशिष्ट भागामध्ये ठिकाणे शोधा

तुम्ही शोधलेल्या भागांच्या जवळ ठिकाणे शोधण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. एखादे ठिकाण किंवा पत्ता शोधा.
  3. जवळपास Search nearby वर क्लिक करा.
  4. तुम्हाला कशा प्रकारचे ठिकाण शोधायचे आहे ते निवडा किंवा एंटर करा, जसे की हॉटेल किंवा विमानतळ
    • परिणाम लाल बिंदू किंवा लाल मिनी-पिनच्या स्वरूपात दिसतात. मिनी-पिन टॉप परिणाम दाखवतात. चौरस पिन जाहिराती असतात. मिनी-पिन म्हणजे काय त्याबद्दल अधिक जाणून घ्या.
    • पिन निवडल्यानंतर तुमच्या मूळ शोध परिणामावर परत जाण्यासाठी, जवळपासचा शोध रद्द करा Cancel Search nearby वर क्लिक करा.

टिपा:

  • तुम्ही तुमच्या शोधामध्ये "जवळपास" ही संज्ञा वापरू शकता. उदाहरणार्थ, उद्यानाजवळची कॉफी शॉप शोधण्यासाठी, coffee near Central Park असे शोधा.
  • स्क्रीनच्या सर्वात वरती, शोध सूचनांसाठी वर्गवारी बटणे वापरा.
  • सर्वोत्तम पर्यायांची सुविधा देण्यासाठी, तुमच्या वाहतुकीच्या पद्धतीनुसार वर्गवारी बटणे बदलतात. उदाहरणार्थ, ड्रायव्हिंग तुम्हाला "गॅस," "EV चार्जिंग" आणि "हॉटेल" यासारखे पर्याय दाखवते.

पुनरावलोकन करण्यासाठी ठिकाण फ्लॅग करा

तुम्ही तोतयेगिरी, स्पॅम किंवा अयोग्य आशयासाठी व्यवसाय अथवा ठिकाण फ्लॅग करू शकता.

टीप: कॉपीराइट किंवा ट्रेडमार्कशी संबंधित वाद अशा कायदेशीर समस्यांसाठी, तक्रार सबमिट करा.

ठिकाणाचे पुनरावलोकन ट्रिगर करण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. तुम्हाला फ्लॅग करायचे असलेले ठिकाण निवडा.
  3. संपादन सुचवा आणि त्यानंतर हे ठिकाण काढून टाका वर क्लिक करा.
  4. ठिकाण काढून टाकण्यासाठीचे कारण निवडा.
  5. सबमिट करा वर क्लिक करा.

स्वारस्य असलेली स्थानिक ठिकाणे ब्राउझ करा

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य फक्त काही ठिकाणी उपलब्ध आहे.

तुम्ही लोकप्रिय बार, पेट्रोल पंप आणि ATMs यांसारखे जवळपासचे व्यवसाय व ठिकाणे शोधू शकता. तुम्ही कामाचे तास, व्यवसायाचे फोन नंबर आणि रेटिंग यांसारखी माहितीदेखील शोधू शकता.

तुमच्या जवळपासच्या वर्गवाऱ्या शोधण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. शोध बारच्या बाजूला, रेस्टॉरंट, कॉफी किंवा हॉटेल यासारख्या सूचनेवर टॅप करा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8934529101668128972
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false