नकाशामध्ये तुमचे Google Contacts शोधणे, जोडणे किंवा लपवणे

एखाद्या व्यक्तीचा पत्ता तुमच्या Google Contacts मध्ये असल्यास, तुम्ही त्यांचे नाव नकाशावर शोधून त्यांचा पत्ता शोधू शकता. तुम्ही एखादा पत्ता शोधल्यास, तुम्ही त्या पत्त्याशी जुळणारे कोणतेही संपर्क पाहू शकता.

Google संपर्क शोधणे

टीप: तुम्ही तुमचा iPhone किंवा iPad वापरून नकाशावर संपर्क जोडू किंवा लपवू शकत नाही.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.
  3. संपर्काचे नाव किंवा पत्ता शोधा. जुळणारे संपर्क सूचनांमध्ये दिसतील.
  4. नकाशावर तुमचा संपर्क पाहण्यासाठी, नाव किंवा पत्ता निवडा.
  5. तुमच्या संपर्काचे तपशील पाहण्यासाठी, स्क्रीनच्या तळाशी टॅप करा.

ट्रबलशूटिंगसंबंधी टिपा

तुमचे संपर्क तुमच्या शोध परिणामांमध्ये किंवा तुम्ही पत्ता निवडता तेव्हा दिसत नसल्यास, या टिपा वापरून पाहा:

  • वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू असल्याची खात्री करा: तुमचे संपर्क शोध परिणामांमध्ये दिसण्यासाठी Google Maps करिता वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू असणे आवश्यक आहे.
  • व्यक्तीचे नाव आणि त्याचा पत्ता तुमच्या Google Contacts मध्ये असल्याची खात्री करा: संपर्क जोडणे किंवा संपादित करणे हे कसे करावे ते जाणून घ्या.
  • Google Maps तुमचे संपर्क तुमच्या iPhone किंवा iPad वर मिळवू शकते याची खात्री करा: Google Maps तुमचे संपर्क ॲक्सेस करू शकते याची खात्री करण्यासाठी, खालील पायऱ्या फॉलो करा.
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, होम बटणावर टॅप करा.
  2. सेटिंग्ज आणि त्यानंतर गोपनीयता आणि त्यानंतर संपर्क वर जा.
  3. Google Maps सुरू करा.

टीप: तुम्ही तुमचे Google Contacts तुमच्या Apple डिव्हाइसशी सिंक करू शकता.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11269258484216177838
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false