Google Maps मध्ये आम्हाला फीडबॅक कसा पाठवावा

आम्ही नेहमी Google Maps मध्ये सुधारणा करण्याचे मार्ग शोधत असतो आणि त्यासाठी आम्हाला तुमचे मत आवश्यक आहे. तुम्हाला काय आवडते, काय आवडत नाही किंवा तुम्हाला सापडलेल्या बगविषयी आम्हाला सांगा. कायदेशीर कारणांमुळे काही माहिती काढून टाकायला हवी असे तुम्हाला वाटत असल्यास, कायदेशीर विनंती सबमिट करा.

तुम्ही पाठवू शकता अशा फीडबॅकचे प्रकार

तुम्ही फीडबॅक पाठवता तेव्हा, तुम्ही आम्हाला तीन प्रकारच्या गोष्टींबद्दल सांगू शकता:

Maps विषयी फीडबॅक पाठवणे

Maps वापरण्याच्या तुमचा अनुभवाविषयी आम्हाला सांगण्यासाठी, खालील पायऱ्या फॉलो करा.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर मदत आणि फीडबॅक वर टॅप करा.
  3. फीडबॅक पर्याय निवडा.

तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर फीडबॅक पाठवण्यासाठी फोन हलवा

आम्हाला फीडबॅक पाठवण्यासाठी तुम्ही तुमचा फोन किंवा टॅबलेट हलवू शकता. काय सुरू आहे हे जाणून घेण्यात आम्हाला मदत करण्यासाठी हे तुमच्या Google Maps स्क्रीनचा स्क्रीनशॉट कॅप्चर करते. आवश्यकता नसल्यास, तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून टाकू शकता.

"फीडबॅक पाठवण्यासाठी फोन हलवा" सुरू किंवा बंद करण्यासाठी, खालील पायऱ्या फॉलो करा.

  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. बॉक्समध्ये खूण करा किंवा "फीडबॅक पाठवण्यासाठी फोन हलवा" सुरू करा.

चांगल्या पद्धतीने फीडबॅक देण्यासाठी टिपा

  • शक्य तितकी नेमकी माहिती द्या. तुम्हाला एखाद्या गोष्टीला काय म्हणतात याबद्दल खात्री नसल्यास, तुम्ही त्याऐवजी त्याचे वर्णन करू शकता. आम्हाला जितकी जास्त माहिती मिळेल तितके आम्ही त्याचे चांगले निराकरण करू शकतो.
  • तुम्हाला शक्य होईल तितकी माहिती समाविष्ट करा. तुम्ही काय करत होता, काय घडले आणि तुम्हाला काय अपेक्षित होते ते सांगा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11219865119137983574
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false