तुमच्या स्थानाची अचूकता शोधणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे

Google Maps ला तुमचे स्थान शोधण्यात समस्या येऊ शकते. नकाशावरील तुमच्या निळ्या बिंदूचे GPS स्थान चुकीचे असल्यास किंवा दिसत नसल्यास, तुम्ही समस्येचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी पावले उचलू शकता.

टीप: या पायऱ्या तुमच्या शोध परिणामांमध्येदेखील सुधारणा करतील आणि ते तुमच्यासाठी आणखी उपयुक्त करतील.

नकाशावर तुमचे सध्याचे स्थान पहा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. नकाशावरील निळा बिंदू तुमचे स्थान दाखवेल. तेथे निळा बिंदू नसल्यास, तळाशी उजवीकडे, तुमचे स्थान माझे स्थान वर टॅप करा.

टीप: निळ्या बिंदूवर टॅप करा. दिसणाऱ्या नवीन विंडोमध्ये तुम्ही तुमच्या डिव्हाइस चे स्थान किंवा स्थान इतिहास सुरू अथवा बंद करू शकता.

Maps तुमचे सध्याचे स्थान कसे शोधते

यांसारख्या स्रोतांवरून Maps हे तुम्ही कुठे आहात याचा अंदाज लावते:

  • GPS: Maps हे कमाल २० मीटरच्या भागातील तुमचे स्थान जाणून घेण्यासाठी उपग्रह वापरते. तुम्ही इमारतींच्या आतमध्ये किंवा अंडरग्राउंड असता तेव्हा, काहीवेळा GPS चुकीचे असते.
  • वाय-फाय: जवळपासच्या वाय-फाय नेटवर्कचे स्थान Maps ला तुम्ही कुठे आहात हे माहीत करून घेण्यासाठी मदत करते.
  • सेल टॉवर: तुमच्या मोबाइल डेटाचे कनेक्शन काही हजार मीटरपर्यंत अचूक असू शकते.

उच्च अचूकता मोड सुरू करा

सर्वात जास्त अचूक निळ्या बिंदूसह तुमचे स्थान शोधण्यात Google Maps ला मदत करण्यासाठी, उच्च अचूकता मोड वापरा.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, सेटिंग्ज अ‍ॅप सेटिंग्ज उघडा.
  2. स्थान वर टॅप करा.
  3. सर्वात वरती, स्थान सुरू करा.
  4. मोड आणि त्यानंतर उच्च अचूकता वर टॅप करा.

स्थान अचूकता सुधारण्याचे आणखी मार्ग

अजूनही तुमचे स्थान चुकीचे असल्यास, तुम्ही यापैकी काही गोष्टी करून पाहू शकता.

वाय-फाय सुरू करा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Settings अ‍ॅप सेटिंग्ज उघडा.
  2. वाय-फाय निवडा.
  3. सर्वात वरती, वाय-फाय सुरू करा.
तुमचा फोन किंवा टॅबलेट रीस्टार्ट करा

तुमचा Android फोन किंवा टॅबलेट रीस्टार्ट करण्यासाठी, तो बंद करून सुरू करा.

  • तुमचा फोन किंवा टॅबलेट बंद करा: पॉवर बटण धरून ठेवा आणि त्यानंतर बंद करा.
  • तुमचा फोन किंवा टॅबलेट सुरू करा: तुमचे डिव्हाइस सुरू होईपर्यंत पॉवर बटण धरून ठेवा.
तुमचा फोन किंवा टॅबलेट कॅलिब्रेट करा

तुमच्या निळ्या बिंदूचा बीम रूंद असल्यास किंवा चुकीच्या दिशेने निर्देशित करत असल्यास, तुम्ही तुमचे होकायंत्र कॅलिब्रेट करणे आवश्यक आहे.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचे होकायंत्र कॅलिब्रेट केले जात नाही तोपर्यंत 8 ची आकृती बनवा. तुम्ही असे फक्त काही वेळा करावे.
  3. बीम अरूंद होऊन त्याने योग्य दिशेने निर्देशित करणे आवश्यक आहे.

Compass calibration

लाइव्ह व्ह्यू कॅलिब्रेट करत आहे

Orient yourself with Live View

तुमच्या आसपासचा परिसर आणि जवळपासच्या खुणांसोबत लाइव्ह व्ह्यू मध्ये स्वतःचे स्थान झटपट निर्धारित करा. ठरावीक खुणा तुमच्यापासून किती दूर आहेत आणि तेथे कसे पोहोचायचे हेदेखील तुम्ही शोधू शकता. या खुणांमध्ये प्रेक्षणीय ठिकाणांचा समावेश असू शकतो, जसे की, न्यूयॉर्क शहरातील एंपायर स्टेट बिल्डिंग किंवा स्थानिक उद्याने आणि प्रवासी आकर्षणे यांसारखी सहजपणे ओळखता येणारी ठिकाणे.

खुणेच्या जागांचा वापर करून लाइव्ह व्ह्यू मध्ये स्वतःचे स्थान निर्धारित करण्याचे दोन मार्ग आहेत: 

  • एखादे ठिकाण शोधा किंवा ते नकाशावर टॅप करा. त्यानंतर, तळाशी उजवीकडे, लाइव्ह Maps AR वर टॅप करा.
  • “रेस्टॉरंट” किंवा “शॉपिंग मॉल” यासारखी वर्गवारी शोधा, त्यानंतर नकाशा पहा वर टॅप करा.
    • ठिकाणांच्या निवडीवर स्क्रोल करा, त्यानंतर एक ठिकाण निवडा.
    • लाइव्ह Maps AR वर टॅप करा.

तुम्ही लाइव्ह व्ह्यू मध्ये आल्यावर:

  1. तुमचे स्थान शोधण्यात Maps ला मदत करण्यासाठी स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.
    टीप: झाडे आणि लोकांऐवजी तुमचा कॅमेरा इमारतींवर आणि रस्त्यावरील पाट्यांवर रोखा.
  2. तुम्ही कुठे आहात हे Maps ला कळल्यावर, तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानापर्यंतचे अंतर मिळेल. तुम्ही लाइव्ह व्ह्यू पादचारी नेव्हिगेशनदेखील एंटर करू शकता.
टीप: तुमच्या ठिकाणाचे माहिती कार्ड तुमचे गंतव्यस्थान इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर आहे का याबाबत तुम्हाला माहिती देऊ शकते.
लाइव्ह व्ह्यू सह तुमच्या स्थानाची अचूकता वाढवणे
  1. तुम्ही बाहेर असताना तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps अ‍ॅप Google Maps उघडा.
  2. निळा बिंदू माझे स्थान आणि त्यानंतर लाइव्ह व्ह्यू सह कॅलिब्रेट करा Maps AR वर टॅप करा.
  3. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

टिपा: 

  • तुमच्या फोनचा कॅमेरा हा झाडे आणि लोकांऐवजी, इमारतींच्या व तुमच्या आसपासच्या पाट्यांच्या दिशेने धरा.
  • मार्ग दृश्य च्या उपलब्धतेनुसार, Maps हे लाइव्ह व्ह्यू कॅलिब्रेटर कदाचित उघडेल किंवा उघडणार नाही.
  • तुमच्या स्थानाविषयी आणखी डेटा गोळा केल्याने तुमचे Maps वरील स्थान हे आणखी अचूक होते.

निळा बिंदू म्हणजे काय

निळा बिंदू नकाशावर तुमचे स्थान दाखवतो. Google Maps ला तुमच्या स्थानाविषयी खात्री नसेल तेव्हा, निळ्या बिंदूच्या भोवती आकाशी रंगाचा गोल दिसेल. तुम्ही आकाशी रंगाच्या गोलामध्ये कुठेही असू शकता. गोल जितका लहान असेल तितकी तुमच्या स्थानाविषयी अ‍ॅपला जास्त खात्री असेल.

टिपा:

  • निळा बिंदू दिसत नसल्यास किंवा राखाडी दिसत असल्यास, Maps तुमचे सध्याचे स्थान शोधू शकत नाही आणि ते तुम्हाला तुम्ही भेट दिलेले शेवटचे स्थान दाखवते.
  • तुमच्या आणि सेल टॉवरच्या दरम्यान पार्किंग गॅरेज किंवा उंच इमारतींसारखे काही असल्यास, तुमचा निळा बिंदू कदाचित अचूक नसेल.

तुमचे स्थान इतर साइट आणि अ‍ॅप्सवर शोधा

इतर साइट आणि अ‍ॅप्सवर Google Maps मध्ये तुमचे स्थान शोधण्यासाठी, वर दिलेल्या पायर्‍या फॉलो करा. तरीही, काही वैशिष्ट्ये वेगळी असू शकतात:

  • तुम्ही वेगळी साइट किंवा अ‍ॅप वापराल, Google Maps नाही.
  • तुम्ही Google Maps ला नव्हे, तर वापरलेल्या साइट किंवा अ‍ॅपला सर्वप्रथम स्थान परवानगी देणे आवश्यक आहे.
  • तुम्ही Google Chrome किंवा Safari उघडल्यास, तुम्ही फक्त सुरक्षित वेब पेजवर तुमचे स्थान शोधू शकाल. तुम्हाला अ‍ॅड्रेस बारमध्ये "https" दिसेल.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8576104285210611681
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false