Google Maps अ‍ॅपमध्ये समुदाय आव्हानामध्ये सामील होणे

तुम्ही स्थानिक व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी समुदाय आव्हानांमध्ये सामील होऊ शकता, तुमच्या आवडत्या ठिकाणांबद्दल तुमचे मत शेअर करू शकता आणि त्यानंतर Google Maps अ‍ॅपमध्ये बोनस पॉइंट मिळवू शकता. तुमच्यासाठी समुदाय आव्हान असल्यास, तुम्ही ते योगदान टॅबमध्ये शोधू शकता. 

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य फक्त निवडक देशांमध्ये उपलब्ध आहे.

समुदाय आव्हानामध्ये सामील होणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, योगदान वर टॅप करा.
  3. “समुदाय आव्हान” विभाग मिळाल्यानंतर, हे कसे काम करते वर टॅप करा.
  4. स्थानिक आव्हानामध्ये सहभागी होण्यासाठी, इतरांसह सामील व्हा वर टॅप करा.

समुदाय आव्हानामध्ये योगदान देणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमच्या आवडत्या ठिकाणांना भेट देत रहा. 
  3. समुदाय आव्हान पेजवर दिसणार्‍या ठिकाणांसाठी, एक पोस्ट तयार करा. आव्हानाच्या प्रकारानुसार, तुम्ही फोटो, रेटिंग, परीक्षणे जोडू शकता किंवा संपादन सुचवू शकता.

टीप: तुम्ही प्रत्येक पोस्टसाठी गुण मिळवू शकता. तुम्ही आव्हानादरम्यान माइलस्टोन गाठता, तेव्हा तुम्ही बोनस गुण मिळवू शकता. गुण, पातळ्या आणि बॅज या गोष्टींबद्दल अधिक जाणून घ्या.

नवीनतम समुदाय आव्हानामधील तुमची योगदाने पाहणे

  1. तुमच्या मोबाइल फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, योगदान वर टॅप करा.
  3. “आव्हान पूर्ण झाले” कार्डवर, योगदाने पहा वर टॅप करा.

टीप: नवीनतम समुदाय आव्हान संपल्यानंतर, तुम्ही एका आठवड्यापर्यंतच्या तुमच्या वैयक्तिक योगदानांचा सारांश पाहू शकता.

समुदाय माइलस्टोनबद्दल अधिक जाणून घ्या

  • संपूर्ण समुदाय माइलस्टोन गाठेल, तेव्हा तुम्हाला सूचित केले जाईल.
  • तुमच्या योगदानांमुळे समुदायाला तो माइलस्टोन गाठण्यात मदत झाली असेल, तर तुम्हाला रिवॉर्ड मिळेल.
  • तुमच्या योगदानांमुळे समुदायाला मागील माइलस्टोन गाठण्यात मदत झाली असल्यास, तुम्हाला सध्याच्या माइलस्टोनसाठी रिवॉर्ड मिळणार नाही.
  • आव्हान संपल्यानंतर एक आठवड्यापर्यंत तुम्ही योगदान दिलेला माइलस्टोन गाठल्यानंतर, तुमच्या रिवॉर्डवर कधीही दावा करू शकता.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12535655961452477348
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false