सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

Google Maps अ‍ॅपमध्ये समुदाय आव्हानामध्ये सामील होणे

तुम्ही स्थानिक व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी समुदाय आव्हानांमध्ये सामील होऊ शकता, तुमच्या आवडत्या ठिकाणांबद्दल तुमचे मत शेअर करू शकता आणि त्यानंतर Google Maps अ‍ॅपमध्ये बोनस पॉइंट मिळवू शकता. तुमच्यासाठी समुदाय आव्हान असल्यास, तुम्ही ते योगदान टॅबमध्ये शोधू शकता. 

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य फक्त निवडक देशांमध्ये उपलब्ध आहे.

समुदाय आव्हानामध्ये सामील होणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, योगदान वर टॅप करा.
  3. “समुदाय आव्हान” विभाग मिळाल्यानंतर, सुरुवात करा वर टॅप करा.

समुदाय आव्हानामध्ये योगदान देणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. पुढीलपैकी एक गोष्ट करून आव्हानासाठी पात्र ठिकाणे जोडा:
    • तुमच्या आवडत्या ठिकाणांना भेट देत रहा.
    • समुदाय आव्हान पेजवर, “ठिकाण निवडा” या अंतर्गत, शोधा वर टॅप करा.
  3. समुदाय आव्हान पेजवर दिसणार्‍या ठिकाणांसाठी, एक पोस्ट तयार करा. 
    • आव्हानाच्या प्रकारानुसार, तुम्ही फोटो, रेटिंग, परीक्षणे जोडू शकता किंवा संपादन सुचवू शकता.

टीप: तुम्ही प्रत्येक पोस्टसाठी गुण मिळवू शकता. तुम्ही आव्हानादरम्यान माइलस्टोन गाठता, तेव्हा तुम्ही बोनस गुण मिळवू शकता. गुण, पातळ्या आणि बॅज या गोष्टींबद्दल अधिक जाणून घ्या.

नवीनतम समुदाय आव्हानामधील तुमची योगदाने पाहणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, योगदान वर टॅप करा.
  3. “आव्हान पूर्ण झाले” कार्डवर, योगदाने पहा वर टॅप करा.

टीप: नवीनतम समुदाय आव्हान संपल्यानंतर, तुम्ही एका आठवड्यापर्यंतच्या तुमच्या वैयक्तिक योगदानांचा सारांश पाहू शकता.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5607234371258719687
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false