तुम्ही Google Maps नेव्हिगेशन मिनिमाइझ न करता गाणी प्ले करू शकता, थांबवू शकता, एखादे गाणे वगळू शकता आणि बदलू शकता.
महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य सर्व स्थानांवर उपलब्ध नाही.
टीप: नेव्हिगेशन हे Apple Music आणि Spotify सोबत काम करते.
- तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप
उघडा.
- तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे
सेटिंग्ज
नेव्हिगेशन
मीडिया प्लेबॅक नियंत्रणे दाखवा वर टॅप करा.
- मीडिया अॅप
पुढील
ओके निवडा.
- तुमची मीडिया सेटिंग्ज बदलण्यासाठी, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे
सेटिंग्ज
नेव्हिगेशन
संगीत प्लेबॅक नियंत्रणे वर टॅप करा.
- तुम्ही निवडलेल्या मीडिया प्लेअरची नियंत्रणे Google Maps नेव्हिगेशन स्क्रीनच्या तळाशी दिसतात.
Google Assistant वापरून तुमची डीफॉल्ट संगीत सेवा निवडणे
तुम्ही नेव्हिगेट करताना Google Assistant वापरता, तेव्हा तुमचा डीफॉल्ट संगीत स्रोत म्हणून तुम्ही प्राधान्य दिलेली संगीत स्ट्रीमिंग सेवा निवडू शकता.
- तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Assistant ॲप
उघडा.
- सर्वात वर उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे
सेवा
संगीत वर टॅप करा.
- संगीत सेवा निवडा. काही सेवांसाठी, तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये साइन इन करण्यास सांगितले जाईल.
Google Assistant सोबत तुमची संगीत सेवा कशी वापरावी ते जाणून घ्या.