व्हॉइस नेव्हिगेशनसंबंधित समस्यांचे निराकरण करणे

तुम्ही एखाद्या ठिकाणावर नेव्हिगेट करता, तेव्हा तुम्ही तोंडी दिशानिर्देश ऐकू शकता. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर व्हॉइस नेव्हिगेशनसंबंधित समस्यांचे निराकरण कसे करावे ते जाणून घ्या.

ब्लूटूथऐवजी तुमच्या फोनद्वारे दिशानिर्देश ऐकणे

ब्लूटूथ डिव्‍हाइस नेहमी सहजपणे कनेक्ट होत नाहीत. तुम्हाला तुमच्या ब्लूटूथ स्पीकरद्वारे Maps च्या सूचना ऐकण्यात समस्या येत असल्यास, त्याऐवजी तुमच्या फोनचे स्पीकर वापरून Maps चा ऑडिओ प्ले करा. तुम्ही कोणते स्पीकर वापरायचे आहेत ते Google Maps सेटिंग्जमध्ये निवडू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, ब्लूटूथ बंद करा.
  2. Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  3. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर नेव्हिगेशन सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. ब्लूटूथवर व्हाइस प्ले करा बंद करा.

इतर नेव्हिगेशनसंबंधित समस्यांचे निराकरण करणे

पहिली पायरी: तुमच्या डिव्हाइसचा व्हॉल्यूम सुरू करा.

  • तुमच्या डिव्हाइसचा व्हॉल्यूम सुरू असून तो म्यूट केला नसल्याची खात्री करा. तुम्ही नेव्हिगेशन सुरू केल्यानंतर, तुमच्या डिव्हाइसचा व्‍हॉल्‍यूम वाढवा.

दुसरी पायरी: Maps अ‍ॅपमध्ये व्हाॅइस सुरू केला असल्याची खात्री करा.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. नेव्हिगेशन सुरू करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, तुम्हाला व्हॉल्यूम सेटिंग दिसेल. ते यांपैकी एक असेल:
    • आवाज Sound
    • म्यूट करा Mute
    • सूचना Alerts
  4. नेहमी आवाज ऐकण्यासाठी, व्हॉल्यूम सेटिंगवर टॅप करा आणि आवाज Sound वर स्विच करा. Google Maps बोलायला सुरुवात करेल.

तिसरी पायरी: Maps अ‍ॅपमध्ये व्हॉल्यूम वाढवा.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर नेव्हिगेशन सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. मोठा निवडा.

चौथी पायरी: तुमच्या कारमधील स्पीकरवर स्विच करा.

  • तुम्ही ब्लूटूथ किंवा USB केबल वापरून तुमच्या कारच्या स्पीकरवरून व्हॉइस नेव्हिगेशन ऐकू शकता.

ब्लूटूथ वापरा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, ब्लूटूथ सुरू करा.
  2. तुमचा iPhone किंवा iPad तुमच्या कारशी पेअर करा.
  3. तुमच्या कारच्या ऑडिओ सिस्टीमचा स्रोत ब्लूटूथवर सेट करा.
  4. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  5. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर नेव्हिगेशन सेटिंग्ज वर टॅप करा.
  6. ब्लूटूथवर व्हाइस प्ले करा सुरू करा.
  7. नेव्हिगेशन सुरू करा.

USB केबल वापरणे

  1. तुमच्या कारच्या ऑडिओ सिस्टीमचा स्रोत USB वर सेट करा.
  2. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  3. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर नेव्हिगेशन सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. ब्लूटूथवर व्हाइस प्ले करा बंद करा.
  5. USB केबल वापरून तुमचे डिव्हाइस तुमच्या कारशी कनेक्ट करा.
  6. नेव्हिगेशन सुरू करा.

टीप: फक्त चार्ज करणारी USB केबल किंवा आउटलेट अथवा सिगारेट लायटरशी कनेक्ट असलेला पॉवर अडॅप्टर वापरा.

पाचवी पायरी: तोंडी दिशानिर्देश डाउनलोड करा

  • काही वेळा तोंडी दिशानिर्देश डाउनलोड केलेले नसतात किंवा ते तुमच्या डिव्हाइसवर अपडेट करण्याची आवश्यकता असते. असे झाल्यास, तुम्हाला तोंडी दिशानिर्देशांऐवजी चाइम ऐकू येईल.
    1. तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट केले असल्याची खात्री करा. तुमच्याकडे मजबूत इंटरनेट कनेक्शन असल्यास, तोंडी दिशानिर्देश अधिक जलद डाउनलोड होतात.
    2. दिशानिर्देश मिळवा.
    3. तुम्ही नेहमी वापरता तसे Google Maps अ‍ॅप वापरा. तुम्ही Maps अ‍ॅप उघडलेले असताना तोंडी दिशानिर्देश डाउनलोड होतात.
    4. तोंडी दिशानिर्देश डाउनलोड करणे पूर्ण झाल्यानंतर, एखाद्या ठिकाणावर नेव्हिगेट करताना तुम्हाला चाइमऐवजी दिशानिर्देश ऐकू येतील.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3718184996435896140
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false