नेव्हिगेशन हे नेव्हिगेशन डेटाद्वारे प्रायोजित आहे, जे Google Maps ला प्रत्येकासाठी अधिक उपयुक्त बनवते. तुम्ही पुढीलप्रमाणे वैशिष्ट्ये वापरता, तेव्हा हा डेटा गोळा केला जातो:
- टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन
- एका नजरेत दिसणारे दिशानिर्देश, जे थेट तुमच्या मार्गाचे अवलोकन किंवा लॉक स्क्रीनवरून तुम्हाला अपडेट केलेले ETAs आणि तुम्ही तुमच्या मार्गावरून जात असताना तुमचे पुढील वळण या गोष्टी आपोआप पाहू देते. तुम्ही सेटिंग्ज ला भेट देऊन किंवा निळ्या बिंदूवर टॅप करून एका नजरेत दिसणारे दिशानिर्देश बंद करू शकता.
नेव्हिगेशन डेटाने Google Maps ला, रहदारीची स्थिती, व्यत्यय आणि पोहोचण्यासाठीचा जलद मार्ग शोधण्याची क्षमता, अशी रीअल-टाइम वैशिष्ट्ये पुरवण्यात नेहमी मदत केली आहे — व यापुढेही मदत करत राहील.
नेव्हिगेशन डेटा कशाप्रकारे काम करतो
तुम्ही Google Maps वापरून नेव्हिगेट करताना, प्रत्येकासाठी रीअल टाइम मध्ये जग दाखवण्याकरिता मदत करण्यासाठी Google डेटा गोळा करते. डेटा, जसे की:
- GPS स्थान
- तुम्ही निवडलेला मार्ग यांसारखे नेव्हिगेशनशी संबंधित तपशील
- बॅरोमीटर यासारखा तुमच्या डिव्हाइसकडून येणारा सेन्सर डेटा
Maps ला आणखी चांगले बनवण्यासाठी, Google तुमचा डेटा स्वतः वापरते किंवा इतरांसोबत एकत्रित करते, जसे की:
- नेव्हिगेशनमध्ये सुधारणा करत आहे
- वेळ वाचवण्यासाठी आणखी जलद पर्यायी मार्ग सुचवत आहे
- रहदारी, व्यत्यय आणि हवामानाची स्थिती यांसारखी रीअल-टाइम अपडेट दाखवत आहे
Google नेव्हिगेशन डेटा गोळा करणे सुरू करते:
- टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसाठी: तुम्ही सुरू करा वर टॅप केल्यानंतर, लगेच.
- एका नजरेत दिसणाऱ्या दिशानिर्देशांसाठी: Maps उघडे असताना, तुम्ही तुमच्या मार्गावरून पुढे जाण्यास सुरुवात केल्यानंतर, लगेच.
Google नेव्हिगेशन डेटा गोळा करणे थांबवते:
- टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसाठी: तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर. तुम्ही बाहेर पडा किंवा बंद करा वर टॅप करूनदेखील नेव्हिगेशन थांबवू शकता.
- एका नजरेत दिसणाऱ्या दिशानिर्देशांसाठी: तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर. तुम्ही मागे जा वरदेखील टॅप करू शकता.
Google चे गोपनीयता धोरण यानुसार तुमचा डेटा कसा गोळा केला जातो आणि वापरला जातो याबद्दल अधिक जाणून घ्या.
Google नेव्हिगेशनसंबंधित डेटाचे संरक्षण कसे करते
- तुम्ही कोणता मार्ग निवडलात, यासारखा नेव्हिगेशनशी संबंधित डेटा तुमच्या Google खाते शी संलग्न नाही. त्याऐवजी तो नियमित रीसेट केल्या जाणाऱ्या, सुरक्षितपणे जनरेट केलेल्या आयडेंटिफायरशी संलग्न असतो. याचा अर्थ असा, की Google हे तुमच्या Google खाते च्या आधारावर तुमचा नेव्हिगेशनशी संबंधित डेटा पाहू शकत नाही.
- तुम्ही जग एक्सप्लोर करता, तेव्हा गोळा केलेला इतर डेटा, जसे की तुम्ही एखाद्या ठिकाणाचे दिशानिर्देश शोधता, तेव्हा तो डेटा तुमच्या Google खाते शी संबंधित असू शकताे. तुम्ही Maps मधील तुमचा डेटा ला भेट देऊन नियंत्रणे बदलू शकता व स्थान इतिहास किंवा वेब आणि अॅप अॅक्टिव्हिटी यासारखी तुमची अॅक्टिव्हिटी व्यवस्थापित करू शकता.
- आम्ही सर्वांना सर्वोत्कृष्ट Maps अनुभव देण्यासाठी आवश्यक असलेला फक्त नेव्हिगेशन डेटा गोळा करतो—त्यावर प्रक्रिया केल्यानंतर तो हटवला जातो.
- आम्ही तुमच्या Google खाते किंवा डिव्हाइससोबत असलेल्या नकाशाशी अपडेट संलग्न करत नाही.
Google तुमची माहिती कशी सुरक्षित ठेवते, याबद्दल अधिक जाणून घ्या.
नियंत्रण तुमच्याकडे आहे
- तुमच्या iPhone किंवा iPad वर, सेटिंग्ज वर जा.
- गोपनीयता स्थान सेवा वर टॅप करा.
- स्थान सेवा सुरू केल्याची खात्री करा.
- Google Maps अॅप वर टॅप करा.
- पर्यायावर टॅप करा:
- कधीही नाही: स्थान सेवा याच्याशी संबंधित माहितीचा अॅक्सेस प्रतिबंधित करते.
- पुढच्या वेळी विचारा: अॅप वापरताना नेहमी, एकदा अनुमती द्या, किंवा अनुमती देऊ नकायांपैकी निवडू देते.
- अॅप वापरताना: Google Maps किंवा त्याचे एखादे वैशिष्ट्य वापरले जात असताना तुमचे स्थान अॅक्सेस केले जाऊ शकते.
- नेहमी: Google Maps सक्रियपणे वापरले जात नसतानादेखील तुमचे स्थान अॅक्सेस करण्याची अनुमती देते.
तुम्ही एका नजरेत दिसणारे दिशानिर्देशदेखील कधीही बंद करू शकता:
- तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे सेटिंग्ज नेव्हिगेशन सेटिंग्ज वर टॅप करा.
- तुम्ही मार्गाचे अवलोकन स्क्रीनवरील निळ्या बिंदूवरदेखील टॅप करू शकता.
- एका नजरेत दिसणारे दिशानिर्देश वर टॅप करा.
अधिक जाणून घ्या
- नकाशावर तुमचे स्थान शोधा: Google Maps मध्ये तुमच्या स्थानाची अचूकता कशी शोधायची आणि त्यामध्ये सुधारणा कशी करायची ते जाणून घ्या.
- तुम्ही भेट दिलेली ठिकाणे आणि प्रवास केलेले मार्ग यांसंबंधित तुमचा स्थान इतिहास व्यवस्थापित करा: टाइमलाइनबद्दल जाणून घ्या
- Maps मध्ये तुमची डेटाशी संबंधित प्राधान्ये व्यवस्थापित करा
- तुमची वेब आणि अॅप अॅक्टिव्हिटी शोधणे व नियंत्रित करणे
- Google Maps 101: AI हे रहदारीचे पूर्वानुमान करण्यात आणि मार्ग ठरवण्यात अशाप्रकारे मदत करते
- प्रगत ग्राफ न्यूरल नेटवर्क वापरून केलेले रहदारीसंबंधित पूर्वानुमान
- Google गोपनीयता धोरण