उच्च गुणवत्तेच्या परीक्षणांचे आणि फोटोचे योगदान देण्याविषयी टिपा

उत्तम परीक्षणे लिहिण्यासाठी टिपा

परीक्षण उत्तमरीत्या लिहिल्यास, तुमचे परीक्षण प्रकाशित होण्याची शक्यता वाढवेल आणि इतरांना त्यांच्यासाठी अगदी योग्य असलेली ठिकाणे शोधण्यात मदत होईल. येथे काही टिपा आहेत:

  • योग्य तपशीलवार माहिती द्या: तुम्ही परीक्षण करत असलेल्या ठिकाणाची विशिष्ट व उपयुक्त माहिती द्या आणि इतर अतिथींना कसा अनुभव येऊ शकतो त्याचे वर्णन करा. ते ठिकाण इतके खास का आहे ते हायलाइट करा आणि काहीतरी वेगळे व नवीन शेअर करण्याचा प्रयत्न करा. 
  • विश्वसनीय माहिती द्या: परीक्षण म्हणून तुमचा स्वतःचा अनुभव सांगा आणि ते ठिकाण तुम्हाला कसे वाटले व तेथील सेवा कशी होती याबद्दल सांगा. शक्य तितकी नेमकी माहिती देण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या भेटीशी संबंधित सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही गोष्टींचा समावेश करा.
  • आदराच्या भावनेने व्यक्त व्हा: व्यवसायाचे मालक त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी अनेकदा फीडबॅकचा वापर करतात. तुमची निराशा झाली असली तरीही, तुमची टीका सुधारणा करण्यासाठी प्रवृत्त करणारी असेल याची खात्री करा. याव्यतिरिक्त, कृपया असभ्य भाषा टाळा.
  • योग्य शैली वापरून लिहा: तुमचे शब्दलेखन व व्याकरण तपासा आणि प्रमाणापेक्षा जास्त कॅपिटलायझेशन व विरामचिन्हे टाळा. सर्वसाधारणपणे परीक्षणाची लांबी एक परिच्छेद इतकी असणे चांगले आहे. 
  • वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती टाळा: तुमच्या परीक्षणांमध्ये इतर व्यवसायांचे फोन नंबर किंवा URL यांचा समावेश करू नका. याव्यतिरिक्त, तुम्ही सध्या ज्या ठिकाणी काम करत आहात किंवा यापूर्वी काम करत होतात त्या ठिकाणांसाठी परीक्षणे लिहू नका.
  • सामान्य विषयांवर भाष्य करणे टाळा: अलीकडील बातम्यांच्या कव्हरेजमुळे किंवा सध्या घडलेल्या घटनांमुळे काही विशिष्ट स्थाने ही मोठ्या सार्वजनिक वादविवादाचा किंवा संभाषणाचा विषय होऊ शकतात. आम्ही तुमच्या मताचा आदर करतो आणि त्याला महत्त्व देतो तरीही, स्‍थानिक परीक्षणे ही सामाजिक किंवा राजकीय मुद्यांवर भाष्य करणारी नसावीत. ब्लॉग किंवा सोशल नेटवर्क यांसारखे फोरम हे अशा प्रकारच्या संभाषणांसाठी जास्त योग्य आहेत. कृपया त्या ठिकाणाशी संबंधित तुम्हाला स्वतःला आलेल्या अनुभवाबद्दल लिहा आणि अलीकडील बातम्यांच्या आधारे त्या ठिकाणाशी संबंधित सामान्य विषयांवर भाष्य करू नका.

उत्तम फोटो काढण्यासाठी टिपा

फोटोची गुणवत्ता चांगली असल्यास, तुमचा फोटो प्रकाशित होण्याची शक्यता वाढेल आणि इतरांना त्यांच्यासाठी अगदी योग्य असलेली ठिकाणे शोधण्यात मदत होईल. येथे काही टिपा आहेत:

  • उपयोगी ठरेल असा फोटो काढा: फोटोचे स्थान अचूक असल्याची, तो सेल्फी नसल्याची आणि तुम्ही कोणत्या ठिकाणाचे परीक्षण लिहित आहात ते एखाद्या व्यक्तीला समजण्यात त्यामुळे मदत होईल याची खात्री करा. समान प्रकारचे किंवा डुप्लिकेट फोटो सबमिट करणे टाळा.
  • स्पष्ट फोटो काढा: फोटोमध्ये एकावर एक मजकूर नसल्याची आणि तो प्रमाणापेक्षा जास्त संपादित केला नसल्याची खात्री करा. फोटो अस्पष्ट नसल्याची खात्री करा. 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13146351795631993923
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false