Google Maps मध्ये तुमचे प्रवास पिन आणि व्यवस्थापित करणे

झटपट दिशानिर्देश मिळवण्यासाठी आणि तुमच्या वारंवार होणाऱ्या प्रवासांची पोहोचण्याची अंदाजे वेळ मिळवण्याकरिता Google Maps मध्ये जा टॅब Go वापरा.

महत्त्वाचे: हे वैशिष्‍ट्य फक्त मोबाइलवर उपलब्ध आहे.

तुमचे वारंवार होणारे प्रवास पिन करणे

तुम्हाला वारंवार होणारा प्रवास सेव्ह करायचा असल्यास, तुम्ही तो पिन करू शकता. बाय डीफॉल्ट, जा टॅब हा पिन करण्यासाठी बरेच पत्ते सुचवतो. हे पत्ते तुमचा शोध इतिहास किंवा स्थान इतिहास यामधून मिळवले जातात. तुमच्या इतिहासामधील दिशानिर्देश आणि ठिकाणांबद्दल जाणून घ्या

तुम्ही आवडता प्रवास पिन केल्यास, तुम्ही जा टॅबवर टॅप करता तेव्हा, तो तुमच्या स्क्रीनच्या तळाशी दिसतो. तुम्ही दिशानिर्देशांच्या शोधामधून किंवा जा टॅबमधील सूचनांमधून प्रवास पिन करू शकता.

टीप: तुम्ही फक्त ड्रायव्हिंग, परिवहन आणि दुचाकीवरील प्रवास पिन करू शकता.

दिशानिर्देशांच्या शोधामधून तुमचा प्रवास पिन करण्यासाठी:

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. गंतव्यस्थान शोधा आणि दिशानिर्देश वर टॅप करा.
  3. वाहतूक मोड निवडा. तुम्ही Transit निवडले असल्यास, तुमचा प्राधान्य दिलेला मार्ग निवडा.
  4. तळाशी, पिन करा वर टॅप करा.

जा टॅबमधून तुमचा प्रवास पिन करण्यासाठी:

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, जा Go वर टॅप करा.
  3. सुचवलेल्या प्रवासांची सूची मिळवण्यासाठी, तळाशी असलेल्या बारमधून वर स्वाइप करा.
  4. तुम्हाला हवा असलेला प्रवास शोधा आणि उजवीकडे, पिन करा वर टॅप करा. 

पिन केलेला प्रवास काढून टाकणे

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, जा Go वर टॅप करा.
  3. तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या पिन केलेल्या मार्गावर टॅप करा.
  4. तळाशी, पिन केलेले वर टॅप करा.

पिन केलेले प्रवास साफ करा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह वर टॅप करा.  
  3. सेटिंग्ज Settings वर टॅप करा.
  4. "जा या टॅब" च्या अंतर्गत,   पिन केलेले प्रवास हटवा वर टॅप करा.
  5. हटवा वर टॅप करा.

तुम्ही पिन केलेला प्रवास संपादित करणे

ड्रायव्हिंगपासून परिवहनापर्यंत प्रवास संपादित करणे

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, जा Go वर टॅप करा.
  3. तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या पिन केलेल्या मार्गावर टॅप करा.
  4. तळाशी, पिन केलेले वर टॅप करा.
  5. सर्वात वरती, परिवहन Transit वर टॅप करा.
  6. तुम्हाला हव्या असलेल्या प्रवासावर टॅप करा.
  7. तळाशी, पिन करा वर टॅप करा.

परिवहनापासून ड्रायव्हिंगपर्यंत प्रवास संपादित करणे

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, जा Go वर टॅप करा.
  3. तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या पिन केलेल्या मार्गावर टॅप करा.
  4. तळाशी, पिन केलेले वर टॅप करा.
  5. सर्वात वरती, प्रवासाचे इतर पर्याय वर टॅप करा.
  6. सर्वात वरती, ड्रायव्हिंग Driving वर टॅप करा.
  7. तळाशी, पिन करा वर टॅप करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17670482502657157612
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false