Google Maps मध्ये आम्ही रस्ते जोडण्याची आवश्यकता असल्यास किंवा नकाशामधील एखादी गोष्ट योग्य नसल्यास, तुम्ही आम्हाला सांगू शकता. तुम्हाला Google Maps मध्ये पुढीलपैकी काही एरर दिसल्यास आम्हाला कळवा:
- रस्त्यांची चुकीची नावे
- वन-वे आणि टू-वे रस्त्यांविषयी चुकीची माहिती
- चुकीच्या पद्धतीने ड्रॉ केलेले रस्ते
- रस्ते बंद
- नकाशावरील रस्ता अस्तित्वात नसणे
- नसलेले रस्ते
- चुकीचे पत्ते आणि मार्कर स्थाने.
महत्त्वाचे: तुम्ही फक्त काही देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये Maps मधील संपादने सबमिट करू शकता.
रस्त्याशी संबंधित चुकीची माहिती दुरुस्त करणे
- तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप
उघडा.
- तळाशी, "योगदान द्या" टॅबवर टॅप करा.
- नकाशा संपादित करा
रस्ता जोडा किंवा त्यामध्ये सुधारणा करा
रस्त्यामध्ये सुधारणा करा वर टॅप करा.
- तुम्हाला ज्या रस्त्यामध्ये सुधारणा करायची आहे त्यावर टॅप करा
पुढील वर टॅप करा.
- तुम्हाला ज्या प्रकारच्या माहितीमध्ये सुधारणा करायची आहे ती निवडा आणि योग्य माहिती एंटर करा.
- पाठवा वर टॅप करा.
नसलेला रस्ता जोडा
- तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप
उघडा.
- तळाशी, "योगदान द्या" टॅबवर टॅप करा.
- नकाशा संपादित करा
रस्ता जोडा किंवा त्यामध्ये सुधारणा करा वर टॅप करा.
- नसलेला रस्ता ड्रॉ करा वर टॅप करा.
- "पहिला रस्ता जोडा" वर टॅप करा.
- नसलेला रस्ता सुरू होतो त्या स्थानावर पिन हलवा.
- तळाशी, ड्रॉ करण्यास सुरुवात करण्यासाठी, अधिक
वर टॅप करा.
- रस्ता संपतो त्या स्थानावर पिन ड्रॅग करा आणि अधिक
वर टॅप करा.
- रस्त्याचे नाव आणि प्रकार जोडा व सेव्ह करा वर टॅप करा.
- रस्ता पूर्ण करण्यासाठी, पूर्ण झाले
वर टॅप करा.
- नसलेले अतिरिक्त रस्ते जोडण्यासाठी, "दुसरा रस्ता जोडा" वर टॅप करा आणि सहा ते दहा या पायऱ्या फॉलो करा.
- रस्ता सबमिट करण्यासाठी, पुढील वर टॅप करा. आणखी कोणतेही तपशील असल्यास, ते जोडा आणि त्यानंतर पाठवा वर टॅप करा.