पत्ता पुरवला नसल्यास किंवा चुकीचे स्थान पिन केल्यास, त्यामध्ये सुधारणा करणे

तुम्ही Maps मध्ये सार्वजनिकरीत्या पत्ता जोडू किंवा संपादित करू शकता. मेल पत्ते जोडा, पॅकेज कुठे डिलिव्हर करावीत ते निश्चित करा किंवा पिन स्थाने अ‍ॅडजस्ट करा.

पत्त्यामध्ये सुधारणा करा

महत्त्वाचे: 

Google Maps आशय भागीदार या द्वारे संस्था किंवा सरकारे Google Maps वर एकाहून अधिक पत्ते दुरुस्त करू शकतात. असे करण्यासाठी, या संस्थांनी किंवा सरकारांनी आमच्या भागीदार आणि आशय आवश्यकतांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. पत्ता शोधा.
  3. संपादन सुचवा आणि त्यानंतर नाव किंवा इतर तपशील बदला वर टॅप करा.
      
  4. नकाशा बिल्डिंगच्या मध्यभागी हलवा.
  5. पत्त्याशी संबंधित माहिती एंटर करा. त्यानंतर, पोस्ट करा वर टॅप करा.

नकाशावर नसलेल्या रस्त्यासाठी पत्ता जोडण्याकरिता, सर्वप्रथम रस्ता जोडा.

नवीन पत्ता जोडा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. योगदान द्या Contribute आणि त्यानंतर नकाशा संपादित करा आणि त्यानंतर पत्त्यामध्ये सुधारणा करा वर टॅप करा.
  3. नकाशा बिल्डिंगच्या मध्यभागी हलवा.
  4. पत्त्याशी संबंधित माहिती एंटर करा.
  5. सबमिट करण्यासाठी, पोस्ट करा वर टॅप करा.

एकाहून अधिक पत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी: तुम्ही वरील पायऱ्या वापरून प्रत्येक पत्ता स्वतंत्रपणे जोडणे आवश्यक आहे.

दुसरे ठिकाण किंवा पत्ता संपादित करा

खाजगी लेबल जोडा

तुम्ही तुमच्या नकाशावरील ठिकाणांवर खाजगी लेबल जोडू शकता. तुम्ही पत्त्यामध्ये सुधारणा करता तेव्हा, तुमचे अपडेट सार्वजनिकरीत्या उपलब्ध असते. पण फक्त तुम्ही तुमची खाजगी लेबल पाहू शकता. लेबल केलेल्या जागा तुमच्या नकाशावर, शोध सूचनांमध्ये आणि "तुमची ठिकाणे" स्क्रीनवर दाखवल्या जातात.

नसलेले ठिकाण किंवा बिल्डिंग जोडा

तुम्ही सार्वजनिक खूण, कॉफी शॉप किंवा इतर स्थानिक व्यवसाय यांसारखी नकाशामध्ये नसलेली ठिकाणेदेखील जोडू शकता. नकाशामध्ये नसलेली ठिकाणे कशी जोडावी ते जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14441324649247493851
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false