सूचना

मधील किमान एक मेसेज संभवत: धोकादायक म्हणून अलीकडे ओळखला गेला आहे. फसवे ईमेल वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी किंवा ऑनलाइन खात्यांमध्ये घुसखोरी करण्यासाठी वापरले जातात. फसव्या मेसेजपासून संरक्षण करण्यात मदत कशी करावी ते जाणून घ्या

एकाहून अधिक इनबॉक्स वापरून तुमचे ईमेल व्यवस्थापित करा

ऑफिस किंवा शाळेमध्ये असताना Google अ‍ॅप्सचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे का?  कोणत्याही शुल्काशिवाय Google Workspace चाचणीसाठी साइन अप करा.

महत्त्वाचे: तुम्ही फक्त कॉंप्युटर वापरून एकाहून अधिक इनबॉक्स सेट करू शकता.

एकाहून अधिक इनबॉक्स कसे तयार करावे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Gmail वर जा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. "इनबॉक्सचा प्रकार" च्या शेजारी, एकाहून अधिक इनबॉक्स निवडा.
  4. एकाहून अधिक इनबॉक्सशी संबंधित सेटिंग्ज बदलण्यासाठी, कस्टमाइझ करा वर क्लिक करा.
  5. तुम्हाला प्रत्येक विभागासाठी जोडायचा असलेला शोध निकष एंटर करा.
    • तारांकित केलेले ईमेल शोधण्यासाठी, is:starred वापरा:
    • तुम्ही एखाद्या व्यक्तीचा ईमेल अ‍ॅड्रेस शोधता तेव्हा, त्या विभागाच्या परिणामांमध्ये त्यांच्या पर्यायी नावाचा समावेश असलेले ईमेलदेखील दिसतील. शोध हा फक्त मूळ ईमेलपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी, तो दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये घातला पाहिजे. उदाहरणार्थ: "from:john.doe@gmail.com".
    • तुम्ही “from:email" शोधता तेव्हा, परिणामांमध्ये त्या व्यक्तीने तुमच्यासोबत फाइल शेअर केली तेव्हाचे Drive शेअरिंग सूचना ईमेलदेखील मिळतील.
  6. "विभागाचे नाव" अंतर्गत, विभागासाठी नाव एंटर करा.
  7. "कमाल पेज आकार" च्या पुढे तुम्हाला विभागामध्ये पाहायच्या असलेल्या ईमेलची संख्या एंटर करा.
  8. "एकाहून अधिक इनबॉक्स स्थिती" च्या पुढे तुम्हाला विभाग कुठे ठेवायचा आहे ते निवडा.
  9. तळाशी, बदल सेव्ह करा वर ‍क्लिक करा.

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10999208935644885252
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false