Gmail मधून साइन आउट करा

तुम्ही कोणत्या डिव्हाइसवर Gmail वापरता त्यानुसार तुम्ही Gmail मधून साइन आउट करू शकता, तुमचे Google खाते काढून टाकू शकता किंवा वेगवेगळ्या खात्यांदरम्यान स्विच करू शकता.

ऑफिस किंवा शाळेमध्ये असताना Google अ‍ॅप्सचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे का?  कोणत्याही शुल्काशिवाय Google Workspace चाचणीसाठी साइन अप करा.

तुमच्या कॉंप्युटरवरून साइन आउट करा

  1. Gmail उघडा.
  2. सर्वात वरच्या बाजूस उजवीकडे तुमच्या फोटोवर क्लिक करा.
  3. साइन आउट करा वर क्लिक करा.

दुसऱ्या डिव्हाइसमधून साइन आउट करा

तुम्ही दुसर्‍या कॉंप्युटरवरील तुमच्या ईमेलमधून साइन आउट करायचे विसरल्यास, तुम्ही रिमोट पद्धतीने Gmail मधून साइन आउट करू शकता:

  1. Gmail उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे तुमच्या फोटोवर क्लिक करा.
  3. तुमचे Google खाते व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  4. सुरक्षा वर क्लिक करा.
  5. "तुमची डिव्हाइस" याच्या अंतर्गत, सर्व डिव्हाइस व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  6. एक डिव्हाइस निवडा.
  7. साइन आउट करा वर क्लिक करा.

साइन आउट न करता खात्यांदरम्यान स्विच करा

तुम्ही एका वेळी मल्टिपल साइन-इनचा वापर करून एकाच ब्राउझरवर एकाहून अधिक खात्यांनी साइन इन करू शकता. त्यानंतर तुम्ही त्यातील एकाही खात्यातून साइन आउट न करता त्यांदरम्यान स्विच करू शकता. एकाहून अधिक खात्यांमध्ये साइन इन करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3450462250649675538
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false