Gmail मधून साइन आउट करा

तुम्ही कोणत्या डिव्हाइसवर Gmail वापरता त्यानुसार तुम्ही Gmail मधून साइन आउट करू शकता, तुमचे Google खाते काढून टाकू शकता किंवा वेगवेगळ्या खात्यांदरम्यान स्विच करू शकता.

ऑफिस किंवा शाळेमध्ये असताना Google अ‍ॅप्सचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे का?  कोणत्याही शुल्काशिवाय Google Workspace चाचणीसाठी साइन अप करा.

साइन आउट करण्याचे पर्याय

Gmail अ‍ॅपमधून साइन आउट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या फोन अथवा टॅबलेटमधून तुमचे संपूर्ण खाते काढून टाकणे हा आहे.

तथापि, तुम्ही इतर कृतींद्वारे त्यासारख्या अनेक टास्क करू शकता.

तुमच्या डिव्हाइसमधून तुमचे Google खाते काढून टाका

तुम्ही एखादे खाते काढून टाकता तेव्हा, ते डिव्हाइसवरील सर्व अ‍ॅप्समधून काढून टाकले जाते. तुमचे खाते काढून टाकण्यात आल्यानंतर तुम्ही नकाशे किंवा YouTube सारख्या कोणत्याही Google उत्पादनांमध्ये साइन इन केलेले राहणार नाही.

तुम्ही तुमचे डिव्हाइस इतरांना देण्यापूर्वी तुम्हाला त्यावरील वैयक्तिक माहिती काढून टाकायची असल्यास, हा पर्याय चांगला आहे.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Gmail ॲप उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे तुमच्या प्रोफाइल प्रतिमेवर टॅप करा.
  3. या उपकरणावर खाती व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  4. तुमचे खाते निवडा.
  5. तळाशी, खाते काढून टाका वर टॅप करा.
टीप: तुमच्या फोन किंवा टॅबलेटवरून खाते काढून टाकल्यामुळे प्रत्यक्ष खाते हटवले जाणार नाही, त्यामुळे तुम्ही ते कॉंप्युटर किंवा इतर डिव्हाइसवर तरीही वापरू शकाल.
दुसऱ्या खात्यावरून ईमेल तपासा

तुम्ही Gmail अ‍ॅपची अद्यतनित आवृत्ती वापरत असल्यास एखाद्या बिगर-Gmail खात्यावरून केवळ ईमेल तपासण्याचा पर्याय दिसेल. या पायर्‍या काम करत नसल्यास, Gmail अ‍ॅप अद्यतनित करून पाहा आणि त्यानंतर पुन्हा प्रयत्न करा.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Gmail ॲप उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे तुमच्या प्रोफाइल प्रतिमेवर टॅप करा.
  3. दुसरे खाते जोडा वर टॅप करा.
  4. तुम्हाला जोडायच्या असलेल्या खात्याचा प्रकार निवडा.
    • तुम्ही Windows साठी असलेल्या Outlook मधून ऑफिस किंवा शाळेचे ईमेल तपासत असल्यास, Outlook, Hotmail आणि Live निवडा.
    • तुम्हाला तुमची ईमेल सेवा दिसत नसल्यास, इतर निवडा.
  5. तुमचे खाते जोडण्यासाठी स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.
  6. तुम्हाला वापरायच्या असलेल्या खात्यावर टॅप करा.
टीप: तुम्ही इतर लोकांसह डिव्हाइस शेअर करत असल्यास, तुमच्या डिव्हाइसवर त्यांना स्वतंत्रपणे वेगळा वापरकर्ता म्हणून समाविष्ट करणे किंवा त्यांना अतिथी म्हणून जोडणे हे करून पहा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18357367157345787232
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false