ईमेल ब्‍लॉक करा किंवा सदस्‍यता रद्द करा

तुमच्‍या Gmail इनबॉक्‍समध्‍ये तुम्‍हाला नको असलेले ईमेल तुम्‍हाला मिळत असल्‍यास, तुम्‍ही प्रेषकाला ब्‍लॉक करू शकता किंवा त्‍याची सदस्‍यता रद्द करू शकता किंवा Gmail कडे संदेशाची तक्रार करू शकता.  

टीप: एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देण्यासाठी, धमकी देण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी Gmail चा वापर करत असल्यास ते Gmail च्या प्रोग्राम धोरणाचे उल्लंघन करत आहेत. तुम्हाला कसलाही धोका असल्याचे वाटत असल्यास, लगेच पोलिसांशी संपर्क साधून, सायबरमार्फत होणार्‍या छळाचा कुठला कायदा तुमच्या परिस्थितीत लागू होऊ शकतो याची माहिती घ्या.

ईमेल अ‍ॅड्रेस ब्लॉक करा

तुम्ही एखाद्या पाठवणाऱ्याला ब्लॉक करता, तेव्हा ते तुम्हाला पाठवत असलेले मेसेज स्पॅम मध्ये जातात.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Gmail वर जा.
  2. मेसेज उघडा.
  3. वर उजवीकडे, आणखी आणखी वर क्लिक करा.
  4. [पाठवणारा] ब्लॉक करा वर क्लिक करा.

टीप: तुम्ही एखाद्याला चुकून ब्लॉक केले असल्यास, त्याच पायऱ्या वापरून त्यांना अनब्लॉक करू शकता.

मोठ्या प्रमाणात ईमेलचे सदस्यत्व रद्द करा

तुम्ही जाहिराती किंवा बातमीपत्रक यासारख्या बर्‍याच ईमेल पाठविणार्‍या एखाद्या साइटवर साइन अप केले असल्यास, तुम्ही हे ईमेल मिळणे थांबविण्यासाठी सदस्यत्व रद्द करा‍ लिंक वापरू शकता. तुम्ही सदस्यत्व रद्द केल्यानंतर मेलिंग सूचीद्वारे तुम्हाला मेसेज पाठवणे थांबवण्यासाठी काही दिवस लागू शकतात.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Gmail वर जा.
  2. तुम्हाला सदस्यत्व रद्द करायचे आहे अशा पाठवणाऱ्याचा ईमेल उघडा.
  3. पाठवणाऱ्याच्या नावाशेजारील, सदस्यत्व रद्द करा वर क्लिक करा.
  4. पॉप-अपमध्ये, सदस्यत्व रद्द करा वर क्लिक करा.
    • काही पाठवणाऱ्यांच्या ईमेलचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जा वर क्लिक करावे लागू शकते.
  5. पर्यायी: तुम्ही सदस्यत्व रद्द केल्यानंतर, बॅनरमध्ये, स्पॅममध्ये हलवा यावर क्लिक करा.

टिपा:

  • तुम्ही तुमची ईमेलची सूची पाहत असतानादेखील सदस्यत्व रद्द करू शकता. सदस्यत्व रद्द करण्यासाठी, ईमेलवर कर्सर फिरवा आणि सदस्यत्व रद्द करा वर क्लिक करा.
  • तुम्ही सदस्यत्व रद्द करता, तेव्हा पाठवणाऱ्याच्या नावाऐवजी, तुम्हाला मेलिंग सूची किंवा सूची आयडीसाठी युनिक आयडेंटिफायर दिसू शकतो.

स्पॅम किंवा संशयास्पद ईमेल काढून टाका

माझ्या इनबॉक्समधील स्पॅम काढा आणि ब्लॉक करा

Gmail स्पॅम तुमच्या इनबॉक्सबाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण काहीवेळेस मेसेज त्यामधूनही जातो. तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये स्पॅम मेसेज दिसल्यास:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Gmail वर जा.
  2. मेसेजेसच्या डावीकडील चौकटीत खूण करा किंवा मेसेज उघडा.
  3. पेजच्या सर्वात वरील भागाजवळ स्पॅमची तक्रार नोंदवा वर क्लिक करा.

टीप: तुम्ही स्पॅमची तक्रार करा वर क्लिक करता किंवा एखादा ईमेल मॅन्युअली तुमच्या स्पॅम फोल्डरमध्ये हलवता तेव्हा, Google ला त्या ईमेलची कॉपी मिळेल आणि आमच्या वापरकर्त्यांना स्पॅम आणि गैरवापरापासून संरक्षित करण्यासाठी मदत करण्याकरिता त्याचे विश्लेषण करू शकते.

एका संशयास्पद ईमेलमधून वैयक्तिक माहितीची मागणी करण्यात आली

तुम्हाला संशयास्पद ईमेल वैयक्तिक माहिती विचारत असल्याचे दिसल्यास, तुम्ही फिशिंगसाठी ईमेलची तक्रार करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Gmail वर जा.
  2. तुम्हाला हवा असलेला ईमेल उघडा.
  3. सर्वात वर उजवीकडे, अधिक आणखी वर क्लिक करा.
  4. फिशिंगची तक्रार नोंंदवा वर क्लिक करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7413781221104371641
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false