Gmail जाहिराती कसे कार्य करतात

तुम्‍ही Gmail उघडल्‍यावर, तुम्‍हाला अशा जाहिराती दिसतील ज्‍या तुम्‍हाला अधिक उपयुक्‍त आणि संबंधित जाहिराती दाखवण्‍यासाठी निवडल्‍या होत्‍या. Gmail मध्‍ये पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती निवडण्‍याची आणि दाखवण्‍याची प्रक्रिया पूर्णपणे ऑटोमेटेड आहे. तुम्ही Google मध्ये साइन इन केलेले असताना केलेल्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीच्या आधारावर या जाहिराती तुम्हाला दाखवल्या जातात. तुम्‍हाला जाहिराती दाखवण्‍यासाठी आम्‍ही तुमचे Gmail मेसेज स्‍कॅन करणार नाही किंवा ते वाचणार नाही.

गोपनीयता, पारदर्शकता आणि निवड

Google तुमच्या Gmail आणि Google खाते माहितीचा समावेश असलेली तुमची वैयक्तिक माहिती विकत नाही. तसेच आम्‍ही तुमची वैयक्तिक माहिती तोपर्यंत जाहिरातदारांसोबत शेअर करत नाही जोपर्यंत तुम्‍ही आम्‍हाला तसे करायला सांगत नाही.

आम्‍ही ज्या आशयाच्या आधारावर जाहिराती दाखवतो त्याबद्दल आम्ही काळजी घेतो. उदाहरणार्थ, Google जात, धर्म, लैंगिक आवड, आरोग्‍य किंवा संवेदनशील आर्थिक वर्गवार्‍यांसारख्‍या, संवेदनशील माहितीच्‍या आधारावर जाहिराती लक्ष्‍य करत नाही. Gmail मध्‍ये डिस्‍प्‍ले केलेल्‍या जाहिराती Gmail जाहिरात धोरणे च्या अधीन आहेत.

पर्सनलाइझ Gmail जाहिरातींसाठी वैयक्तिक माहितीच्‍या वापरातून बाहेर पडण्‍यासाठी, जाहिरात सेटिंग्ज पेजवर जा, नंतर जाहिराती पर्सनलायझेशन बंद करा. तुम्‍ही बाहेर पडल्‍यास, तुम्‍हाला अजूनही Gmail जाहिराती दिसतील, परंतु त्‍या तुमच्‍या Google खात्‍याशी संबंधित Google कडे असलेल्‍या वैयक्तिक डेटावर आधारित नसतील.

Google तुमच्‍या डेटा आणि Google च्‍या गोपनीयता धोरण यावर कशी प्रक्रिया करते याबद्दल अधिक जाणून घ्‍या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
12108874031346189332
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false