Gmail संदेश संग्रहित किंवा म्‍यूट करा

ऑफिस किंवा शाळेमध्ये असताना Google अ‍ॅप्सचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे का?  कोणत्याही शुल्काशिवाय Google Workspace चाचणीसाठी साइन अप करा.

तुमचे Gmail मेसेज न हटवता तुमचा इनबॉक्‍स साफ करण्यासाठी, तुम्‍ही त्‍यांना संग्रहित किंवा म्‍यूट करू शकता.

संग्रहित करा आणि म्यूट करा हे कसे काम करतात याबद्दल जाणून घ्या

"सर्व मेल" हा विभाग तुम्ही संग्रहित केलेले किंवा म्यूट केलेले मेसेज दाखवतो.

  • संग्रहित करा:
    • एखाद्या व्यक्तीने तुमच्या मेसेजला उत्तर दिल्यास तो इनबॉक्समध्ये पुन्हा दिसतो.
  • म्यूट करा:
    • मेसेज म्यूट केलेला म्हणून लेबल केला जातो.
    • या थ्रेडमधील नवीन मेसेज तुमच्या इनबॉक्समधून वगळले जातात.
    • तरीही पुढील बाबतीत तुम्हाला इनबॉक्समध्ये मेसेज मिळू शकतो:
      • मेसेज तुमच्याशिवाय इतर कोणालाही पाठवला जात नाही.
      • तुम्‍ही सदस्‍य असलेल्या Google ग्रुपला मेसेज पाठवला जातो.
      • एखादी व्यक्ती तुम्हाला मेसेजमधील “To” किंवा “Cc” फील्डमध्ये जोडते.

मेसेजचे संग्रहण करणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Gmail उघडा.
  2. तुम्हाला संग्रहण करायचा असलेला मेसेज उघडा.
  3. सर्वात वरती, संग्रहण करा वर क्लिक करा.

टिपा:

  • एकाहून अधिक मेसेजचे संग्रहण करण्यासाठी, प्रत्येक मेसेजच्या बाजूला असलेला बॉक्स आणि त्यानंतर संग्रहण करा वर क्लिक करा.
  • कीबोर्ड शॉर्टकट वापरून मेसेजचे संग्रहण करण्यासाठी, प्रेस करा. कीबोर्ड शॉर्टकटबद्दल अधिक जाणून घ्या.

संग्रहण केलेले मेसेज शोधणे

महत्त्वाचे: तुम्ही Gmail मध्ये शोधता, तेव्हा तुमच्या परिणामांमध्ये संग्रहण केलेल्या मेसेजचा समावेश असतो. Gmail मधील शोधाबद्दल अधिक जाणून घ्या.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Gmail उघडा.
  2. डावीकडे, आणखी वर क्लिक करा.
  3. सर्व मेल वर क्लिक करा.

संग्रहण केलेले मेसेज तुमच्या इनबॉक्समध्ये हलवणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Gmail उघडा.
  2. संग्रहण केलेला मेसेज शोधा.
  3. मेसेजच्या पुढील, बॉक्सवर खूण करा.
  4. सर्वात वरती, इनबॉक्समध्ये हलवा वर क्लिक करा.

मेसेज म्यूट किंवा अनम्यूट करणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Gmail उघडा.
  2. मेसेज उघडा.
  3. सर्वात वरती, आणखी आणखी आणि त्यानंतर म्यूट करा किंवा अनम्यूट करा वर क्लिक करा.

टिपा:

  • Gmail सर्च बॉक्सच्या सर्वात वरती, "म्यूट केलेले" लेबल असलेले सर्व मेसेज शोधण्यासाठी, is:muted एंटर करा.
  • कीबोर्ड शॉर्टकट वापरून मेसेज म्यूट करण्यासाठी, एम प्रेस करा. कीबोर्ड शॉर्टकटबद्दल अधिक जाणून घ्या.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14434455413765595891
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false