समर्थित ब्राउझर

तुम्‍ही Chrome, Firefox आणि Safari सारख्‍या प्रसिद्ध ब्राउझरसह Gmail वापरू शकता.

Gmail द्वारे सपोर्ट असलेले ब्राउझर

Gmail या ब्राउझरच्या नवीनतम आणि आधीच्या आवृत्तीमध्ये उत्तम कार्य करते:

टीप: तुम्ही वापरत असलेला कोणत्याही ब्राउझरमध्ये कुकी आणि JavaScript सुरू केलेले असणे आवश्यक आहे. 

तुमच्या ब्राउझरवर Gmail ला भेट द्या

  1. तुमच्या कॉंप्युटरवर gmail.com वर जा.
  2. तुमचे वापरकर्तानाव आणि पासवर्ड एंटर करा.

ब्राउझर एरर ट्रबलशूट करा

ब्राउझर सपोर्ट करत नाही

तुम्ही Gmail सह कार्य करत नसलेले ब्राउझर वापरत असाल परंतु ''हे ब्राउझर सपोर्ट करत नाही'' एरर दिसत असल्यास, एखाद्या एक्स्टेंशनमुळे समस्या होऊ शकते. तुमच्या ब्राउझरचे एक्स्टेंशन बंद करून पाहा.

JavaScript एरर

"Gmail मध्ये लॉगिन करण्यासाठी, तुमचे ब्राउझर JavaScript ला कुकीज सेट करण्यास अनुमती द्या वर सेट केले असणे आवश्यक आहे"

तुम्हाला हा मेसेज दिसल्यास, तुमच्या ब्राउझरची सुरक्षितता सेटिंग्ज उघडा आणि तमुच्या विश्वसनीय साइटमध्ये https://mail.google.com जोडा.

"अरेरे! Gmail कार्य करणार नाही कारण तुमच्या वेब ब्राउझरमध्ये JavaScript बंद केलेले आहे"

तुम्हाला हा मेसेज दिसत असल्यास, JavaScript सुरू करा, त्यानंतर पेज रिफ्रेश करा. तुमची JavaScript सेटिंग्ज बदलण्याच्या सूचना ब्राउझरनुसार वेगळ्या आहेत, त्यामुळे योग्य मदत पेज शोधण्यासाठी JavaScript आणि तुमच्या ब्राउझरचे नाव शोधा.

कुकी एरर

तुम्हाला ''तुमच्या ब्राउझरच्या कुकी कार्यक्षमता बंद केलेल्या आहेत. कृपया त्या सुरू करा'' मेसेज दिसल्यास, सूचना शोधण्यासाठी तुमच्या ब्राउझरचे नाव आणि कुकीज शोधा. तुम्ही Google Chrome वापरत असल्यास Chrome वर कुकी सुरू करा हे कसे करायचे ते जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13712578948199032074
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false