एक Gmail खाते तयार करा

Gmail साठी साइन अप करण्यासाठी, Google खाते तयार करा. तुम्ही Gmail आणि YouTube, Google Play आणि Google Drive सारख्या इतर Google उत्पादनांमध्ये साइन इन करण्यासाठी वापरकर्ता नाव आणि पासवर्ड वापरू शकता.

Gmail खाते साठी साइन अप करा

  1. Google खाते च्या साइन इन पेजवर जा.
  2. खाते तयार करा वर क्लिक करा.
  3. तुमचे खाते सेट करण्यासाठी स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.
  4. Gmail मध्ये साइन इन करण्यासाठी तुम्ही तयार केलेले खाते वापरा.

खाते तयार करणे

मला हवे असलेले वापरकर्ता नाव कोणीतरी वापरत आहे

तुम्हाला एखादा विशिष्ट Gmail अ‍ॅड्रेस मिळू शकणार नाही जर तुम्ही विनंती केलेले वापरकर्ता नाव:

  • सध्या वापरले जात आहे
  • आधीपासून असलेल्या वापरकर्ता नावासारखे आहे (उदाहरणार्थ, example@gmail.com आधीपासून अस्तित्वात असल्यास, तुम्ही examp1e@gmail.com वापरू शकत नाही)
  • तेच वापरकर्ता नाव जे पूर्वी कुणीतरी वापरलेले आणि नंतर हटवले आहे
  • स्पॅम किंवा गैरवापर/गैरवर्तन टाळण्यासाठी Google द्वारे आरक्षित आहे

कोणीतरी माझ्या ओळखीची तोतयागिरी करत आहे

तुमची ओळख तोतयागिरी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी एखाद्याने Gmail अ‍ॅड्रेस तयार केला असेल असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही हे करू शकता:

दुर्दैवाने, Gmail तोतयागिरीच्या संदर्भात तृतीय पक्षांचा समावेश असलेल्या प्रकरणांमध्ये मध्यस्थी म्हणून सहभागी होऊ शकत नाही. Gmail वापर अटी मध्ये अधिक जाणून घ्या.

तुमच्या व्यवसायासाठी Gmail वापरा

तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी Gmail वापरायचे असल्यास, तुमच्यासाठी वैयक्तिक Google खाते यापेक्षा Google Workspace खाते अधिक योग्य असू शकते. Google Workspace मध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • तुमच्या कंपनीचे susan@example.com सारखे डोमेन नाव वापरणारे एक व्यावसायिक, जाहिरातमुक्त Gmail खाते.
  • कर्मचारी खात्यांची मालकी जेणेकरून तुम्ही तुमच्या कंपनीची खाती, ईमेल आणि फाइल नेहमी नियंत्रित करू शकाल.
  • खऱ्या माणसाकडून २४/७ फोन, ईमेल आणि चॅट सपोर्ट.
  • अधिक Gmail आणि Google Drive स्टोरेज.
  • तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी मोबाइल डिव्हाइस व्यवस्थापन, जसे की हरवलेली डिव्हाइस रिमोट पद्धतीने वाइप करण्याची क्षमता.
  • प्रगत सुरक्षा आणि अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह नियंत्रणे.

Google Workspace बद्दल अधिक जाणून घ्या किंवा कोणत्याही शुल्काशिवाय चाचणी सुरू करा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1039914424513107047
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false