मागील खाते ॲक्टिव्हिटी

तुम्हीतुमचे Gmail खाते वापरले गेल्याच्या तारखा आणि वेळा यांसह तुमचा साइन-इन इतिहास पाहू शकता. तुमचे खाते ॲक्सेस करण्यासाठी वापरलेले आयपी ॲड्रेसदेखील तुम्ही पाहू शकता.

ऑफिस किंवा शाळेमध्ये असताना Google अ‍ॅप्सचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे का?  कोणत्याही शुल्काशिवाय Google Workspace चाचणीसाठी साइन अप करा.

तुमची खाते ॲक्टिव्हिटी पहा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Gmail उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, तपशील वर क्लिक करा.

टीप: तुमच्या संपूर्ण Google खाते साठी सुरक्षा अपडेट पाहण्याकरिता तुम्ही अलीकडील सुरक्षितता इव्‍हेंट पेजलादेखील भेट देऊ शकता.

"या खात्यावरील अ‍ॅक्टिव्हिटी" पेजवर दाखवलेली माहिती

"या खात्यावरील अ‍ॅक्टिव्हिटी" पेज हे तुमचे साइन-इन रेकॉर्ड दाखवते आणि त्यामध्ये खालील माहितीचा समावेश असतो.

समवर्ती सेशनची माहिती

"एकाच वेळी असणाऱ्या सेशनची माहिती" या विभागामध्ये, तुम्ही दुसर्‍या डिव्हाइस, ब्राउझर किंवा स्थानावरून Gmail मध्ये साइन इन केले असल्यास, तुम्हाला तसे दिसेल.

ॲक्सेसचा प्रकार

"ॲक्सेसचा प्रकार" या विभागामध्ये, तुम्हाला तुम्ही Gmail ॲक्सेस केलेला ब्राउझर, डिव्हाइस किंवा ईमेल सर्व्हर (जसे की POP किंवा IMAP) दिसेल.

तुम्ही एखाद्या ॲप्लिकेशनला ऑथोराइझ केले असल्यास, तुम्हाला तृतीय पक्षाच्या ॲप्लिकेशनचे स्थान (आयपी ॲड्रेस) दिसेल. 

स्थान (आयपी ॲड्रेस)

तुम्ही शेवटचे दहा आयपी ॲड्रेस आणि तुमच्या Gmail खात्यामध्ये ॲक्सेस केलेली अंदाजे स्थाने पाहू शकता.

तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये संशयास्पद ॲक्टिव्हिटीबद्दल चेतावणी मिळाल्यास, तुम्हाला कदाचित संशयास्पद लेबल केलेले तीन अतिरिक्त आयपी ॲड्रेसदेखील दिसू शकतात.

तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये एकाहून अधिक आयपी ॲड्रेस किंवा स्थाने दिसण्याची काही कारणे आहेत:

  • तुम्ही Apple Mail किंवा Microsoft Outlook सारख्या इतर सेवांवर तुमचे ईमेल वाचण्यासाठी POP किंवा IMAP वापरत असल्यास, या स्थानाविषयी माहितीचादेखील समावेश केला जाईल.
  • तुम्ही मेल आनयनकर्ता वापरत असल्यास, एक Google आयपी दाखवला जाईल कारण तुमचे मेसेज एका Google सर्व्हरद्वारे मिळवले जात आहेत.
  • तुम्ही एखाद्या फोन किंवा टॅब्लेटवर Gmail वापरात असल्यास, तुमची इंटरनेट सेवा किंवा मोबाइल वाहकाचे स्थान दाखवले जाऊ शकते. हे स्थान तुम्ही जेथे आहात तेथून बरेच दूर असू शकते. वाहकाचे नाव तुमच्या वाहकाशी जुळत असल्यास, हे सामान्य आहे.

समस्या ट्रबलशूट करणे

मला वाटते, की माझ्या खात्याचा दुसऱ्या व्यक्तीकडे ॲक्सेस आहे

तुम्ही पेजवरील ॲक्टिव्हिटी जसे स्थान किंवा ॲक्सेसचा प्रकार ओळखत नसल्यास, फिशिंग किंवा मालवेयर यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडे तुमच्या खात्याचा ॲक्सेस असू शकतो.

  1. लगेच तुमचा पासवर्ड बदला.
  2. तुमचे खाते संरक्षित करण्यात मदत करण्यासाठी Gmail सुरक्षितता टिपा फॉलो करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16255851260793454241
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false