सूचना

मधील किमान एक मेसेज संभवत: धोकादायक म्हणून अलीकडे ओळखला गेला आहे. फसवे ईमेल वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी किंवा ऑनलाइन खात्यांमध्ये घुसखोरी करण्यासाठी वापरले जातात. फसव्या मेसेजपासून संरक्षण करण्यात मदत कशी करावी ते जाणून घ्या

Gmail मधील इनबॉक्स वर्गवाऱ्या जोडणे व काढून टाकणे

तुमचा इनबॉक्स संगतवार ठेवण्यात मदत व्हावी, यासाठी इनबॉक्स वर्गवाऱ्या वापरा. इनबॉक्स वर्गवाऱ्या वापरून, Gmail तुमच्या ईमेलना आपोआप वेगवेगळ्या वर्गवाऱ्यांमध्ये क्रमाने लावते, जसे की सोशल मीडिया अपडेट किंवा प्रचार.
ऑफिस किंवा शाळेमध्ये असताना Google अ‍ॅप्सचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे का?  कोणत्याही शुल्काशिवाय Google Workspace चाचणीसाठी साइन अप करा.

इनबॉक्स वर्गवाऱ्यांबद्दल जाणून घेणे

तुम्ही "डीफॉल्ट" इनबॉक्स प्रकार सुरू करता, तेव्हा तुम्ही तुमच्या इनबॉक्समध्ये एक किंवा त्याहून अधिक वर्गवाऱ्या दाखवू शकता:

  • प्राथमिक: तुम्हाला माहीत असलेल्या लोकांकडून आलेले ईमेल आणि इतर टॅबमध्ये न दिसणारे मेसेज.
  • सोशल: सोशल नेटवर्क आणि मीडिया शेअर करणार्‍या साइट यांच्याकडील मेसेज.
  • प्रचार: डील, ऑफर आणि इतर प्रचारात्मक ईमेल.
  • अपडेट: ऑटोमेट केलेली कन्फर्मेशन, नोटिफिकेशन, विधाने आणि तात्काळ लक्ष देण्याची गरज नसलेले रिमाइंडर.
  • फोरम: ऑनलाइन गट, चर्चा मंडळे आणि मेलिंग सूची.
टीप: तुमच्या इनबॉक्समध्ये २५०,००० पेक्षा जास्त ईमेल असल्यास, तुम्ही इनबॉक्स वर्गवाऱ्या सुरू करू शकत नाही. मर्यादेच्या आत राहण्यासाठी, तुमचे ईमेल हटवा किंवा संग्रहित करा

इनबॉक्स वर्गवाऱ्या जोडणे किंवा काढून टाकणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Gmail ॲप उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. "इनबॉक्स" या अंतर्गत, इनबॉक्स प्रकार वर टॅप करा.
  4. डीफॉल्ट इनबॉक्स वर टॅप करा.
  5. सर्वात वरती डावीकडे, सेटिंग्ज वर टॅप करा.
  6. इनबॉक्स कस्टमायझेशन आणि त्यानंतर इनबॉक्स वर्गवाऱ्या वर टॅप करा.
  7. एक किंवा त्याहून अधिक वर्गवाऱ्या सुरू करा.

टीप: तुम्ही प्रत्येक वर्गवारीसाठी वेगवेगळी नोटिफिकेशन निवडू शकता. Gmail नोटिफिकेशन कशी काम करतात हे जाणून घ्या.

इनबॉक्स वर्गवाऱ्या बंद करणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Gmail ॲप उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू वर टॅप करा.
  3. सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. तुमचे खाते निवडा.
  5. इनबॉक्स कस्टमायझेशन आणि त्यानंतर इनबॉक्स वर्गवाऱ्या वर टॅप करा.
  6. एक किंवा त्याहून अधिक वर्गवाऱ्या बंद करा.
  7. सर्व इनबॉक्स वर्गवाऱ्या लपवण्यासाठी:

एखाद्या वर्गवारीमधील ईमेल शोधणे

महत्त्वाचे: संग्रहित केलेले ईमेल हे इनबॉक्स वर्गवाऱ्यांमध्ये दिसत नाहीत. संग्रहित केलेले ईमेल पाहण्यासाठी, Gmail मधील “सर्व मेल” लेबलवर जा.

  1. सर्वात वरती, शोध बारमध्ये वर्गवारी: एंटर करा.
  2. तुमच्या शोध संज्ञेच्या आधी वर्गवारीचे नाव एंटर करा:
    • प्राथमिक
    • सामाजिक
    • अपडेट
    • फोरम
    • आरक्षणे
    • खरेदी

उदाहरणार्थ, वर्गवारी: सोशल पार्टी ही तुम्हाला "सोशल" वर्गवारी अंतर्गत असलेले ईमेल दाखवते, ज्यात "पार्टी" चा समावेश असतो.

टीप: तुम्हाला "आरक्षणे" किंवा "खरेदी" या वर्गवाऱ्यांशी जुळणारे ईमेल शोधणे शक्य असले, तरी तुम्ही तुमच्या इनबॉक्समध्ये या वर्गवाऱ्या निवडू शकत नाही.

  • आरक्षणे: फ्लाइट कन्फर्मेशन, हॉटेल बुकिंग आणि रेस्टॉरंट आरक्षणे.
  • खरेदी: ऑर्डर, शिपिंग आणि डिलिव्हरीची कन्फर्मेशन.

कमी प्राधान्य असलेले ईमेल संगतवार लावणे

  • ऑर्डरची कन्फर्मेशन आणि रिमाइंडर यांसारख्या ज्या ईमेलकडे तुम्ही तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता नाही, त्यांना तुम्ही "अपडेट" वर्गवारीअंतर्गत शोधू शकता. 
  • महत्त्वाच्या ईमेलला प्राधान्य देण्यात मदत करण्यासाठी, “प्राथमिक,” “सोशल” आणि “प्रचार” या वर्गवाऱ्या सुरू असल्यास, “अपडेट” सुरू केले जाऊ शकतात.
  • "अपडेट" वर्गवारी बंद करण्यासाठी:
    1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Gmail ॲप उघडा.
    2. सर्वात वरती डावीकडे, मेनू मेनू वर टॅप करा.
    3. सेटिंग्ज वर टॅप करा.
    4. तुमचे खाते निवडा.
    5. इनबॉक्स कस्टमायझेशन आणि त्यानंतर इनबॉक्स वर्गवाऱ्या वर टॅप करा.
    6. अपडेट बंद करा.

Gmail तुमचे मेसेज कशाप्रकारे क्रमाने लावते यात सुधारणा करणे

तुमचा ईमेल हा इनबॉक्स वर्गवारीमध्ये कुठे जातो यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, तुम्ही हे करू शकता:

  • मेसेज एका वर्गवारीमधून दुसऱ्या वर्गवारीमध्ये हलवा:
    1. Gmail ॲपमध्ये, एक किंवा त्याहून अधिक ईमेल निवडा.
    2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी 더보기 वर टॅप करा.
    3. यावर हलवा वर टॅप करा.
    4. वर्गवारी निवडा.
  • ईमेल तारांकित करा: तुम्ही ईमेल तारांकित करता, तेव्हा तो तुमच्या "प्राथमिक" वर्गवारीमध्ये दिसतो आणि तो आधीपासून ज्या वर्गवारीमध्ये होता, त्यातच राहतो. ईमेल कशाप्रकारे तारांकित करावेत हे जाणून घ्या.
  • फिल्टर तयार करणे: Gmail मध्ये, विशिष्ट पाठवणाऱ्यांच्या ईमेलला महत्त्वाचा म्हणून मार्क करणारे किंवा तुम्ही निवडलेल्या वर्गवारीकडे निर्देशित करणारे फिल्टर सेट करा. फिल्टर कशाप्रकारे सेट करावेत हे जाणून घ्या.
  • Google Contacts मध्ये पाठवणारे जोडा: तुम्ही तुमच्या संपर्क सूचीमध्ये एखाद्या पाठवणाऱ्याला जोडता, तेव्हा तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून ईमेल मिळत असल्याचे Gmail ला कळवले जाते. संपर्क कशाप्रकारे जोडावेत हे जाणून घ्या.
  • ईमेलला उत्तर द्या: तुम्ही पाठवणाऱ्याशी संवाद साधता, तेव्हा तुम्ही पाठवणाऱ्याशी परिचित आहात असे Gmail ला कळवले जाते. Gmail मध्ये कशाप्रकारे उत्तर द्यावे हे जाणून घ्या.

तुमच्या इनबॉक्समधील मेसेजची संख्या पहा

Gmail मध्ये, मेसेजची उत्तरे संभाषणांमध्ये गटबद्ध केलेली असतात. तुमच्या इनबॉक्समध्ये, तुम्ही तुमच्या संभाषणांची संख्या पाहू शकता, पण मेसेजची संख्या पाहू शकत नाही.

तुमच्या इनबॉक्समध्ये किती मेसेज आहेत हे पाहण्यासाठी या पायऱ्या फॉलो करा:

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Gmail उघडा.
    • तुम्ही Gmail अ‍ॅपवरून मेसेजची एकूण संख्या पाहू शकत नाही.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. सर्व सेटिंग्ज पहा वर क्लिक करा.
  4. "संभाषण दृश्य" विभागावर खाली स्क्रोल करा.
  5. संभाषण दृश्य बंद करा.
  6. पेजच्या तळाशी, बदल सेव्ह करा वर क्लिक करा.
  7. मेसेजची संख्या पाहण्यासाठी, तुमच्या इनबॉक्समध्ये जा.
    • तुमच्याकडे अनेक विभाग किंवा वर्गवाऱ्या असल्यास, प्रत्येक विभागातील संख्यांची बेरीज करा.
  8. तुमचे काम पूर्ण झाल्यावर, सेटिंग्ज पेजवर परत या.
  9. संभाषण दृश्य सुरू करा.

संबंधित स्रोत

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18424992987843624895
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false