मेसेजमध्ये ऑथेंटिकेशन डेटा नसल्यास, तो Gmail वरून पाठवला आहे का ते निश्चित करण्यासाठी आम्ही तुम्हाला तुमची माहिती संरक्षित करण्याची चेतावणी देऊ.
चेतावणीचा मेसेज का दाखवला जात आहे
पाठवणारा name@gmail.com सारखा दिसत असल्यास, तुम्हाला ही चेतावणी दिसेल पण तो ईमेल प्रत्यक्षात त्या Gmail खात्यावरून आला आहे का, याची आम्ही पडताळणी करू शकत नाही.
हे होऊ शकते पाठवणारा जर:
- बनावट Gmail खात्यावरून पाठवत असेल
- तुम्हाला वेबसाइटवरून ईमेल पाठवत असेल (उदाहरणार्थ, नवीन लेख शेअर करण्यासाठी)
- आपोआप फॉरवर्ड केलेला एक ईमेल पाठवला असेल (उदाहरणार्थ, तुमच्या शाळेच्या खात्यावरून तुमच्या वैयक्तिक Gmail ला)
पर्याय १: मेसेज संशयास्पद वाटत आहे
तुम्हाला दिसत असलेल्या Gmail अॅड्रेसवरून मेसेज पाठवला गेला आहे याची तुम्हाला खात्री नसल्यास, या पायऱ्या फॉलो करा.
- चेतावणी मेसेजमध्ये फिशिंगची तक्रार करा वर क्लिक करा.
- कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका किंवा ईमेलमध्ये असलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
पर्याय २: मेसेज एका विश्वासू पाठवणाऱ्याकडून आला आहे
पाठवणारा कायदेशीर असल्याचे तुम्हाला माहीत असल्यास, तुम्ही भविष्यामध्ये त्यांच्या मेसेजमधून चेतावणी काढून टाकू शकता.
- तुमच्या काँप्युटरवर, Gmail उघडा.
- सर्वात वरती सर्च बॉक्समध्ये, शोध पर्याय दाखवा
वर क्लिक करा.
- "यांच्याकडून" फील्डमध्ये पाठवणाऱ्याचा ईमेल अॅड्रेस टाइप करा.
- तळाशी उजवीकडे, फिल्टर तयार करा वर क्लिक करा.
- तो कधीही स्पॅममध्ये पाठवू नका तपासा.
- फिल्टर तयार करा वर क्लिक करा.
तुम्ही दुसऱ्या ईमेल अॅड्रेसवरून आपोआप मेसेज फॉरवर्ड केल्यास, तुम्ही त्या मेसेजमधून चेतावणी काढून टाकू शकता.
- तुमच्या काँप्युटरवर, Gmail उघडा.
- वर उजवीकडे, सेटिंग्ज
सर्व सेटिंग्ज पहा वर क्लिक करा.
- वरच्या बाजूला, खाती आणि इंपोर्ट किंवा खाती टॅबवर क्लिक करा.
- "यावरून ईमेल पाठवा" विभागामध्ये दुसरा ईमेल अॅड्रेस जोडा वर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.
तुम्हाला तुम्ही फॉरवर्ड केलेल्या मेसेजवरील चेतावणी दिसण्याऐवजी, "anotherdomain.com वरील sender@gmail.com" असे काहीतरी दिसेल.
मी ईमेल करत असलेल्या लोकांना चेतावणी दाखवणे थांबवा
तुम्ही ही चेतावणी तुमच्या मिळवणाऱ्यांना दाखवण्यापासून थांबवू शकता. सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला Gmail मेसेज कसे पाठवायचे आहेत ते निवडा:
तुम्ही तुमच्या मोबाइल डिव्हाइससाठी Gmailची सेटअप मार्गदर्शक तत्त्वे फॉलो करत असल्याची खात्री करा.
तुम्ही Gmail मध्ये साइन इन केलेले असेल आणि Google च्या नसलेल्या खात्यावरून पाठवण्यासाठी "यावरून ईमेल पाठवा" वैशिष्ट्य वापरल्यास, तुम्ही Google चे SMTP सर्व्हर वापरत असल्याची खात्री करा.
ईमेल ऑथेंटिकेशन सेट करण्यासाठी तुमच्या अॅडमिनिस्ट्रेटरला संपर्क करा.
या पायऱ्यांची मदत न झाल्यास, तुम्ही समस्येची तक्रार करू शकता.