Gmail मध्ये इमेज सुरू किंवा बंद करा

बाय डीफॉल्ट, तुम्हाला इमेज असलेला ईमेल मिळाल्यास, तुम्हाला ती इमेज आपोआप दिसेल.

इमेज नेहमी दाखवा

Gmail मध्ये इमेज लोड होत नसल्यास, तुमची सेटिंग्ज तपासा.
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Gmail ॲप उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. "इनबॉक्स" या अंतर्गत, ईमेल प्राधान्ये आणि त्यानंतर इमेज आणि त्यानंतर बाह्य इमेज नेहमी दाखवा वर टॅप करा.
टीप: Gmail ला एखादा पाठवणारा किंवा मेसेज संशयास्पद वाटल्यास, तुम्हाला इमेज आपोआप दिसणार नाहीत. त्याऐवजी, तुम्हाला इमेज पाहायची आहे का हे विचारले जाईल.

इमेज प्रदर्शित करण्यापूर्वी विचारा

तुमचे इंटरनेट कनेक्शन धीमे असल्यास किंवा तुम्हाला मोबाइल डेटा सेव्ह करायचा असल्यास, इमेज बंद करा.
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Gmail ॲप उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. "इनबॉक्स" अंतर्गत, ईमेल प्राधान्ये आणि त्यानंतर इमेज आणि त्यानंतर बाह्य इमेज प्रदर्शित करण्यापूर्वी विचारा वर टॅप करा.
टीप: तुम्हाला इमेजसह मेसेज मिळाल्यास, इमेज प्रदर्शित करा वर टॅप करून इमेज पहा.

Gmail इमेज सुरक्षित करण्यात कशी मदत करते

तुम्हाला मिळण्यापूर्वी, Google संशयास्पद आशयासाठी इमेज स्कॅन करते.

ही स्कॅन इमेज अधिक सुरक्षित करतात कारण:

  • पाठवणारे तुमच्या कॉंप्युटर किंवा स्थानाबद्दल माहिती मिळवण्यासाठी इमेज लोडिंगचा वापर करू शकत नाहीत.
  • तुमच्या ब्राउझरमध्ये कुकी सेट करण्यासाठी किंवा वाचण्यासाठी पाठवणारे इमेज वापरू शकत नाहीत.
  • माहित असलेल्या हानिकारक सॉफ्टवेअरसाठी Gmail इमेज तपासते.

कधीकधी तुम्ही इमेज असलेला ईमेल उघडले आहेत की नाहीत हे पाठवणाऱ्यांना कदाचित माहित असू शकते. Gmail संशयास्पद आशयासाठी प्रत्येक मेसेज स्कॅन करते. Gmail ला एखादा पाठवणारा किंवा मेसेज संशयास्पद वाटल्यास, इमेज दाखवल्या जात नाहीत आणि तुम्हाला इमेज पहायच्या आहेत की नाही असे विचारले जाईल.

 

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
105545796188067812
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false