Gmail च्या क्लायंट-साइड एंक्रिप्शन बद्दल जाणून घ्या

Google Workspace हे त्याच्या सुविधांदरम्यान ॲट रेस्ट आणि इन ट्रांझिट यानुसार सर्व डेटा एंक्रिप्ट करण्यासाठी नवीनतम क्रिप्टोग्राफिक मानके वापरते. त्याव्यतिरिक्त, Gmail इतर ईमेल सेवा पुरवठादारांसह संवादासाठी TLS (ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी) वापरते. Gmail क्लायंट-साइड एंक्रिप्शन (CSE) सह, Google च्या क्लाउडवर आधारित स्टोरेजवर कोणताही डेटा प्रसारित किंवा स्टोअर होण्यापूर्वी एंक्रिप्शनला तुमच्या ब्राउझरमध्ये हाताळून तुम्ही तुमच्या संवेदनशील किंवा नियमन केलेल्या डेटा आशयाची गोपनीयता मजबूत करू शकता. उद्देशित मिळवणाऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत हे तुमच्या मेसेजना एकसमान संरक्षण पुरवते.

सुरुवात करण्याआधी

Google Workspace च्या पुढील आवृत्त्यांसह तुम्ही ईमेलना अतिरिक्त एंक्रिप्शन जोडू शकता:

  • Enterprise Plus
  • Education Plus
  • Education Standard

तुम्हाला वैशिष्ट्य दिसत नसल्यास, तुम्हाला तुमच्या Google Workspace ॲडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधावा लागू शकतो.

अतिरिक्त एन्क्रिप्शन असलेली माहिती

CSE सुरू केले जाते, तेव्हा:

  • इनलाइन इमेज आणि अटॅचमेंट यांच्या समावेशासह ईमेलच्या मुख्य भागाला अतिरिक्त एन्क्रिप्शन मिळेल.
  • विषय, टाइमस्टॅंप आणि मिळवणारे यांच्या समावेशासह ईमेलच्या हेडरला अतिरिक्त एन्क्रिप्शन मिळणार नाही.

टीप: क्लायंट साइड एन्क्रिप्शन बाय डीफॉल्ट सुरू व्हावे, यासाठी तुमच्या ॲडमिनने तुमचे मेसेज डीफॉल्टवर सेट केलेले असू शकतात. तुमचा मिळवणारा S/MIME ला सपोर्ट करत नसल्यास, तुम्ही CSE कधीही बंद करू शकता.

तुमच्या डोमेनमध्ये CSE असलेले ईमेल पाठवणे

महत्त्वाचे:

  • तुम्ही ईमेल मसुदा तयार करण्यापूर्वी, तुम्हाला अतिरिक्त एंक्रिप्शन जोडायचे आहे का ते ठरवा. तुम्ही ईमेल मसुदा तयार करताना अतिरिक्त एंक्रिप्शन जोडू शकता, पण तुम्ही तसे केल्यास, तुमचा मसुदा हटवला जाईल आणि नवीन मसुदा उघडेल.
  • ईमेल मसुदा तयार केल्यानंतर, यापुढे आवश्यक नसल्यास, तुम्ही अतिरिक्त एंक्रिप्शन बंद करू शकता. अतिरिक्त एंक्रिप्शन काढून टाकण्यापूर्वी मसुद्यामध्ये कोणतीही संवेदनशील माहिती नसल्याची खात्री करा.
  1. Gmail मध्ये, तयार करा वर क्लिक करा.
  2. मेसेजच्या उजव्या कोपऱ्यामध्ये, मेसेज सुरक्षा वर क्लिक करा.
  3. "अतिरिक्त एंक्रिप्शन" अंतर्गत, सुरू करा वर क्लिक करा.
  4. तुमचे मिळवणारे, विषय आणि मेसेजचा आशय जोडा.
  5. पाठवा वर क्लिक करा.
  6. सूचना मिळाल्यास, तुमच्या ओळख पुरवठादारामध्ये साइन इन करा.

बाह्य डोमेनमध्ये CSE असलेले ईमेल पाठवा

तुमच्या डोमेनच्या बाहेरील मिळवणाऱ्यांना तुम्ही CSE असेलेले ईमेल पाठवण्याआधी, सर्वप्रथम डिजिटल स्वाक्षऱ्या एक्स्चेंज करा.

महत्त्वाचे:

  • डिजिटल स्वाक्षरी असलेल्या ईमेलमध्ये तुमचे सर्टिफिकेट आणि पब्लिक की समाविष्ट असते, जी मिळवणाऱ्यांनी तुम्हाला पाठवलेले ईमेल एन्क्रिप्ट करण्यासाठी त्यांच्याद्वारे वापरली जाऊ शकते.
  • तुम्ही डिजिटल स्वाक्षऱ्या एक्स्चेंज करता, तेव्हा मिळवणाऱ्याने त्या बदल्यात स्वाक्षरी केलेला ईमेल पाठवला असल्याची खात्री करा. मिळवणारा स्वाक्षरी केलेला ईमेल पाठवतो, तेव्हा की आपोआप स्टोअर केली जाते, आणि मिळवणाऱ्याशी संवाद साधताना अतिरिक्त एंक्रिप्शन आता उपलब्ध आहे.
  • प्रत्येक संपर्कासह तुम्हाला फक्त एकदाच डिजिटल स्वाक्षऱ्या एक्स्चेंज करायच्या आहेत.
  • तुम्ही किंवा तुमच्या संपर्काने सर्टिफिकेट अपडेट केल्यास, तुम्हाला डिजिटल स्वाक्षऱ्या पुन्हा एक्स्चेंज करणे आवश्यक असेल.
  1. Gmail मध्ये, तयार करा वर क्लिक करा.
  2. मेसेजच्या उजव्या कोपऱ्यामध्ये, मेसेज सुरक्षा वर क्लिक करा.
    • अतिरिक्त एन्क्रिप्शन अद्याप सुरू केले नसल्याची खात्री करा.
  3. डिजिटल स्वाक्षरी आणि त्यानंतर मेसेजवर स्वाक्षरी करा वर क्लिक करा
    • सर्टिफिकेट पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्याकरिता स्वाक्षरी पहा वर क्लिक करा.
  4. तुमचा स्वाक्षरी केलेला मेसेज मिळवणाऱ्याला पाठवा.
  5. मिळवणाऱ्याला डिजिटल स्वाक्षरी असलेला ईमेल मिळाल्याचे कंफर्म करण्यासाठी, त्यांना त्या बदल्यात स्वाक्षरी केलेला मेसेज पाठवण्यास सांगा.

तुम्ही डिजिटल स्वाक्षऱ्या एक्स्चेंज केल्यानंतर, CSE उपलब्ध होते, आणि तुम्ही संपर्काशी संवाद साधताना अतिरिक्त एंक्रिप्शन जोडू शकता.

CSE एंक्रिप्ट केलेला ईमेल वाचा

तुम्हाला CSE एंक्रिप्ट केलेला मेसेज मिळतो, तेव्हा तुम्हाला पाठवणाऱ्याच्या नावाखाली "एंक्रिप्ट केलेला मेसेज" असे दिसेल. मेसेज वाचण्यासाठी:

  1. Gmail मध्ये, ईमेल उघडा.
  2. सूचना मिळाल्यास, तुमच्या ओळख पुरवठादारामध्ये साइन इन करा.
  3. हा मेसेज तुमच्या Gmail ब्राउझर विंडोमध्ये आपोआप डीक्रिप्ट केला जाईल.

अटॅचमेंटची आकार मर्यादा

अतिरिक्त एन्क्रिप्शन सुरू केले जाते, तेव्हा अटॅचमेंट आणि इनलाइन इमेजसाठी कमाल ५ MB ची अपलोड मर्यादा असते.

ब्लॉक केलेले फाइल प्रकार

तुम्ही CSE सुरू केल्यास आणि तुम्हाला अटॅचमेंट असलेला ईमेल मिळाल्यास, एन्क्रिप्ट केलेले ईमेल हे व्हायरससाठी स्कॅन केले जाऊ शकत नाहीत, असा चेतावणी मेसेज तुम्हाला दिसेल. तुम्हाला ईमेल सुरक्षित असल्याची खात्री होईपर्यंत, अटॅचमेंटच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. विशिष्ट फाइल प्रकार असलेली अटॅचमेंट आपोआप ब्लॉक केली जातात.

पुढील फाइल प्रकार Gmail ने ब्लॉक केले आहेत:

.ade, .adp, .apk, .appx, .appxbundle, .bat, .cab, .chm, .cmd, .com, .cpl, .diagcab, .diagcfg, .diagpack, .dll, .dmg, .ex, .ex_, .exe, .hta, .img, .ins, .iso, .isp, .jar, .jnlp, .js, .jse, .lib, .lnk, .mde, .msc, .msi, .msix, .msixbundle, .msp, .mst, .nsh, .pif, .ps1, .scr, .sct, .shb, .sys, .vb, .vbe, .vbs, .vhd, .vxd, .wsc, .wsf, .wsh, .xll

वैशिष्ट्याशी संबंधित निर्बंध

अतिरिक्त एन्क्रिप्शन सुरू केले जाते, तेव्हा ही वैशिष्ट्ये उपलब्ध नसतात:

  • गोपनीय मोड
  • ईमेल लेआउट
  • मल्टी-सेंड मोड
  • मीटिंगच्या वेळांचा प्रस्ताव मांडणे
  • पॉप-आउट आणि फुल-स्क्रीनमध्ये तयार करणे
  • Groups ना मिळवणारा म्हणून पाठवणे
  • ईमेल स्वाक्षरी
  • इमोजी
  • प्रिंट करा

एंक्रिप्शन प्रोटोकॉल

सुरक्षित MIME डेटा पाठवण्यासाठी आणि मिळवण्याकरिता अतिरिक्त एंक्रिप्शन S/MIME 3.2 IETF मानक यावर अवलंबून असते. S/MIME ला ई-मेल पाठवणाऱ्या आणि मिळवणाऱ्यांनी त्यांची X.509 सर्टिफिकेट Gmail द्वारे विश्वसनीय करण्यासाठी आवश्यकता आहे. ईमेलच्या अखंडत्वाची खात्री करण्यासाठी S/MIME एंक्रिप्शन हे S/MIME डिजिटल स्वाक्षऱ्यांच्या समन्वयामध्ये वापरले जाते.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17981189659515129673
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false