Gmail मेसेज दुसऱ्या खात्यावर आपोआप फॉरवर्ड करणे

तुम्ही तुमचे सर्व नवीन मेसेज दुसऱ्या ईमेल पत्त्यावर पाठवणे किंवा फक्त काही प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करणे निवडू शकता. 

आपोआप फॉरवर्ड करणे सेटअप करा 

तुम्ही तुमचे मेसेज आपोआप दुसऱ्या पत्त्यावर फॉरवर्ड करू शकता. तुम्ही सर्व नवीन मेसेज किंवा फक्त ठरावीक मेसेज फॉरवर्ड करणे निवडू शकता.

टीप: फॉरवर्ड करणे तुम्ही फक्त तुमच्या काँप्युटरवर सेट करू शकता, Gmail अ‍ॅपवर नाही. तुमच्याकडे ऑफिस किंवा शाळेमार्फत खाते असल्यास आणि काही समस्या असल्यास, तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.

आपोआप फॉरवर्ड करणे सुरू किंवा बंद करा

टीप: तुमचे नवीन मेसेज फॉरवर्ड केले जातात तेव्हा स्पॅममधील मेसेज समाविष्ट केले जाणार नाही.

आपोआप फॉरवर्ड होणे चालू करा

  1. ज्या खात्यावरून तुम्ही मेसेज फॉरवर्ड करू इच्छिता ते वापरून तुमच्या कॉंप्युटरवर Gmail उघडा. तुम्ही फक्त एकाच Gmail अ‍ॅड्रेससाठी मेसेज फॉरवर्ड करू शकता, ईमेल गट किंवा पर्यायी नावासाठी नाही.
  2. वर उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर सर्व सेटिंग्ज पहा  वर क्लिक करा.
  3. फॉरवर्ड करणे आणि POP/IMAP टॅबवर क्लिक करा.
  4. "फॉरवर्ड करणे" विभागामध्ये फॉरवर्ड करण्याचा पत्ता जोडा क्लिक करा.
  5. तुम्ही ज्यावर मेसेज फॉरवर्ड करू इच्छिता तो ईमेल अॅड्रेस एंटर करा.
  6. पुढील आणि त्यानंतर पुढे जा आणि त्यानंतर ठीक आहे क्लिक करा.
  7. त्या पत्त्यावर एक पडताळणी मेसेज पाठवला जाईल. त्या मेसेजमधील पडताळणी लिंकवर क्लिक करा.
  8. तुम्ही ज्यावरून मेसेज फॉरवर्ड करू इच्छिता त्या Gmail खात्यासाठीच्या सेटिंग्ज पेजवर मागे जा आणि तुमचा ब्राउझर रीफ्रेश करा.
  9.  फॉरवर्ड करणे आणि POP/IMAP टॅबवर क्लिक करा.
  10. "फॉरवर्ड करणे" विभागामध्ये, येणाऱ्या मेलची प्रत यावर फॉरवर्ड करा निवडा.
  11. तुमच्या ईमेलच्या Gmail प्रतीबाबत काय करावे ते निवडा. आम्ही Gmail ची प्रत इनबॉक्समध्ये ठेवण्याची शिफारस करतो.
  12. पेजच्या तळाशी, बदल सेव्ह करा वर क्लिक करा.

आपोआप फॉरवर्ड करणे बंद करा

  1. तुमच्या काँप्युटरवर, तुम्हाला ज्या खात्यावरून मेसेज फॉरवर्ड करणे थांबवायचे आहे ते वापरून Gmail उघडा.
  2. वर उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर सर्व सेटिंग्ज पहा  वर क्लिक करा.
  3. फॉरवर्ड करणे आणि POP/IMAP टॅबवर क्लिक करा.
  4. "फॉरवर्ड करा" विभागामध्ये फॉरवर्ड करणे अक्षम करा वर क्लिक करा.
  5. तळाशी, बदल सेव्ह करा वर क्लिक करा.
फक्त विशिष्ट प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करणे

तुम्हाला फक्त विशिष्ट प्रकारचे मेसेज दुसऱ्या खात्यावर फॉरवर्ड करायचे असल्यास या मेसेजसाठी फिल्टर तयार करा.

तुम्ही तुमचे फिल्टर सेट अप करताना, तुम्ही हे मेसेज कोणत्या ईमेल अॅड्रेसवर फॉरवर्ड करायचे ते निवडू शकता.

तुम्हाला ज्यावर मेसेज फॉरवर्ड करायचे आहेत तो ईमेल अॅड्रेस तुम्हाला दिसत नसल्यास फॉरवर्ड करणे चालू करण्यासाठी वरील पायऱ्या फॉलो करा.

अनेक खात्यांवर फॉरवर्ड करणे

तुम्ही फक्त तुमचे सर्व मेसेज एकाच खात्यावर आपोआप फॉरवर्ड करू शकता.

अनेक खात्यांवर मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी फिल्टर तयार करण्याकरीता, "फक्त विशिष्ट प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करा" मधील वेगवेगळ्या खात्यांवर ईमेल फॉरवर्ड करण्यासाठी वरील पायऱ्या वापरा.

मला फॉरवर्ड करण्याची सूचना मिळाली

"तुम्ही तुमचा मेल फॉरवर्ड करत आहात" सूचना

वरील पायऱ्या वापरुन तुम्ही आपोआप मेल फॉरवर्ड करणे सेटअप केल्यास, तुम्ही फॉरवर्ड करणे चालू केल्यानंतर पहिल्या आठवड्यासाठी तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये एक सूचना दिसेल. हे फॉरवर्ड करणे चालू केले असल्याचे रिमाइंडर आहे आणि यामुळे तुमच्या फॉरवर्ड करणे सेटिंग्जचे परीक्षण करण्याची संधी मिळते.

तुम्ही फॉरवर्ड करणे बंद केल्यास, ही सूचना नाहीशी होईल.

"तुमचे फिल्टर तुमचे काही मेल सूचना फॉरवर्ड करत आहेत" सूचना

विशिष्ट प्रकारचे मेसेज दुसऱ्या ईमेल पत्त्यावर फॉरवर्ड करणारे फिल्टर तुम्ही तयार केले असल्यास, तुम्ही फिल्टर सेट केल्यानंतर पहिल्या आठवड्यासाठी तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये ही सूचना दिसेल. हे फॉरवर्ड करणे चालू केले असल्याचे रिमाइंडर आहे आणि यामुळे तुमच्या फॉरवर्ड करणे सेटिंग्जचे परीक्षण करण्याची संधी मिळते.

तुम्ही तुमचे फिल्टर मेसेज फॉरवर्ड होणे थांबवा असे बदलले तर ही सूचना नाहीशी होईल.

मी फॉरवर्ड करा सूचना पाहिली, परंतु मी फॉरवर्ड करणे सेट अप केले नव्हते

तुम्हाला फॉरवर्ड करण्याची सूचना दिसत असल्यास परंतु तुमच्या खात्यासाठी ती सेट अप केलेली नसल्यास, या पायऱ्या फॉलो करा:

  1. तत्काळ तुमचा पासवर्ड बदला. इतर कोणालातरी तुमच्या Gmail खात्याचा अॅक्सेस असू शकतो.
  2. फॉरवर्ड करणे बंद करण्यासाठी वरील पायऱ्या फॉलो करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5193646883385445150
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false