तुमच्या Google One कुटुंब गटासह फायदे शेअर करणे
तुम्ही Google One वरील कुटुंब गटामध्ये असल्यास, तुम्हाला २ वेगवेगळ्या प्रकारांनी दावा करता येणारे फायदे मिळू शकतात:
- प्रति प्लॅनसाठी एकदाच वापरण्याची मर्यादा: फायदा रिडीम करणारा फक्त पहिला कुटुंब गट सदस्य तो वापरू शकतो.
- मर्यादा सूचीबद्ध केलेली नाही: सर्वजण उपलब्ध असलेले फायदे पाहू आणि वापरू शकतात.
पालक व्यवस्थापित करत असलेल्या खात्यांना फायदे पाहता किंवा वापरता येत नाहीत.
तुम्हाला तुमच्या कुटुंब गटासह तुमचे फायदे शेअर करायचे नसल्यास, Google One शेअर करणे कसे थांबवावे याबद्दल जाणून घ्या.
Google One फायदे शोधणे आणि वापरणे
फायद्यावर दावा करणे
- तुमच्या कॉंप्युटरवर, one.google.com वर जा.
- उजवीकडे, फायदे वर क्लिक करा.
- तुम्हाला वापरायचा असलेला फायदा शोधा आणि तपशील पहा वर क्लिक करा.
- कोणतेही नवीन फायदे नसल्यास, तुम्हाला "सर्व पाहिले आहे" असा मेसेज मिळेल.
- तुम्ही आधीच दावा केलेल्या फायद्यांसह इतर फायदे शोधण्यासाठी, इतिहास पहा वर टॅप करा.
तुमची सवलत वापरता येत नसल्यास, ते यांपैकी एका कारणामुळे होऊ शकते:
- प्रति प्लॅनसाठी एकदाच वापरण्याची मर्यादा: तुमच्या कुटुंबातील कोणीतरी आधीच फायदा रिडीम केला आहे का ते तपासा.
- एक्स्पायरीची तारीख: फायदा आता उपलब्ध आहे का ते तपासा.
- कुटुंब शेअरिंग: काही फायदे कुटुंबासह शेअर केले जाऊ शकत नाहीत आणि ते फक्त प्लॅन व्यवस्थापकाद्वारे वापरले जाऊ शकतात.
- बिलिंग स्थान: तुम्ही फक्त तुमच्या बिलिंग स्थानावर उपलब्ध असलेल्या फायद्यांवर दावा करू शकता.
Google One चा प्रोमो कोड लागू केल्यानंतर, तो रिडीम केला आहे असे ठरवले जाते. तुम्ही फायदा रिडीम केल्याचे तुम्हाला आठवत नसल्यास:
- Google One वर जा.
- डावीकडे, फायदे वर क्लिक करा.
- सर्व फायदे पहा निवडा.
आधीच रिडीम केलेल्या फायद्यांना "[date redeemed]" रोजी रिडीम केले असे दाखवले जाते. फायदा तुमच्या इतिहासामध्ये दिसत नसल्यास, तुमच्या Google One कुटुंब गटातील दुसऱ्या सदस्याने त्यावर दावा केलेला असू शकतो. दुसऱ्या सदस्याने फायदा रिडीम केला आहे का हे पाहण्यासाठी, तुमच्या कुटुंब गटाला विचारा.
Google One संबंधित मदत मिळवणे
Google One सदस्य म्हणून, तुम्ही चॅट, फोन कॉल किंवा ईमेलद्वारे मदतीसाठी Google One सपोर्टशी संपर्क साधू शकता.
- तुमच्या काँप्युटरवर, Google One वर जा.
- सर्वात वरती, मदत
वर क्लिक करा.
- मोबाइल वेबवर, सर्वात वरती, मेनू
मदत
वर टॅप करा.
- मोबाइल वेबवर, सर्वात वरती, मेनू
- “आणखी मदत हवी आहे का?” या अंतर्गत, आमच्याशी संपर्क साधा वर टॅप करा.
Google One हे सदस्यत्व व्यवस्थापन, Google One वैशिष्ट्यांचा वापर आणि तुमचे स्टोरेज समजून घेणे यांसारख्या विविध समस्यांसाठी सपोर्ट देते.
तुमच्या Google Store खरेदीबद्दल रिवॉर्ड मिळवणे
काही ठरावीक प्लॅन असलेल्या Google One सदस्यांना पात्र Google Store खरेदीवर विशिष्ट टक्के रक्कम Google Store क्रेडिटच्या स्वरूपात परत मिळते:
- २०० GB किंवा ४०० GB चा प्लॅन असलेले Google One सदस्य: Google Store क्रेडिटच्या स्वरूपात ३% रक्कम परत मिळते.
- २ TB किंवा त्याहून अधिक स्टोरेज असलेले Google AI प्लॅन (Google AI Plus २ TB, Google AI Pro किंवा Google AI Ultra प्लॅन) असलेले Google One सदस्य: Google Store क्रेडिटच्या स्वरूपात १०% रक्कम परत मिळते.
पात्रता निकष:
- हा फायदा फक्त युनायटेड स्टेट्स, कॅनडा, युनायटेड किंगडम, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध आहे.
- Google One चाचणी सदस्यत्वे आणि कुटुंब गट सदस्य पात्र नाहीत.
Google One ॲड-ऑन सदस्याचे फायदे
Plus, Pro आणि Ultra यांसह Google One AI प्लॅनमध्ये विस्तारित स्टोरेज व Google AI वैशिष्ट्यांसह ठरावीक अॅड-ऑन फायद्यांचा अॅक्सेस मिळतो.
तुमचा Google One प्लॅन कसा अपडेट करावा हे इथे जाणून घ्या.
YouTube Premium अॅड-ऑन याविषयी
YouTube Premium अॅड-ऑन पुढील ठिकाणी उपलब्ध आहे:
- ब्राझील
- कॅनडा
- फ्रान्स
- जर्मनी
- जपान
- यूएस
Google Home Premium आणि Google Health Premium फायद्यांविषयी
तुम्ही Google AI Pro किंवा Google AI Ultra सदस्यत्व प्लॅनसह कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Google Home Premium आणि Google Health Premium सदस्यत्वे मिळवू शकता. Google Home Premium किंवा Google Health Premium सदस्यत्वाविषयी जाणून घ्या.
Google Workspace प्रीमियम वैशिष्ट्ये वापरणे
Google AI प्लॅनमध्ये Gmail, Docs, Vids आणि आणखी बऱ्याच गोष्टींमध्ये टप्प्याटप्प्याने आणखी AI वैशिष्ट्ये मिळतात.
Google AI सदस्यत्वाच्या फायद्यांबद्दल अधिक जाणून घ्या: