तुमच्या स्थानाची अचूकता शोधणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे

Google Maps ला तुमचे स्थान शोधण्यात समस्या येऊ शकते. नकाशावरील तुमच्या निळ्या बिंदूचे GPS स्थान चुकीचे असल्यास किंवा दिसत नसल्यास, तुम्ही समस्येचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी पावले उचलू शकता.

टीप: या पायऱ्या तुमच्या शोध परिणामांमध्येदेखील सुधारणा करतील आणि ते तुमच्यासाठी आणखी उपयुक्त करतील.

नकाशावर तुमचे सध्याचे स्थान पहा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, माझे स्थान माझे स्थान वर क्लिक करा. निळा बिंदू तुमचे स्थान दाखवतो.

Maps तुमचे सध्याचे स्थान कसे शोधते

तुमच्या वेब ब्राउझरमधील स्थान माहिती यांसारख्या स्रोतांवरून Maps हे तुम्ही कुठे आहात याचा अंदाज लावते.

Maps ला स्थान परवानगी द्या

तुम्ही आहात ते स्थान नकाशावर केंद्रस्थानी आणण्यासाठी, Maps ला तुमचे स्थान शोधण्याची परवानगी देणे आवश्यक आहे.

macOS वर, तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये Maps परवानगी देता येण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्राउझरसाठी स्थान सेवा सुरू करणे आवश्यक आहे:

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, सिस्टम प्राधान्ये आणि त्यानंतर सुरक्षा आणि गोपनीयता प्राधान्ये आणि त्यानंतर गोपनीयता आणि त्यानंतर स्थान सेवा उघडा.
  2. बदलांना परवानगी देण्यासाठी, तळाशी डावीकडे, लॉकवर क्लिक करा.
  3. "स्थान सेवा सुरू करा" च्या बाजूच्या बॉक्समध्ये खूण करा.
  4. तुमच्या ब्राउझर शेजारच्या बॉक्समध्ये खूण करा.
  5. तुमच्या ब्राउझरमध्ये Maps ला स्थान परवानगी द्या.

तुमच्या ब्राउझरमध्ये Maps ला स्थान परवानगी द्या

Chrome
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Chrome उघडा आणि Google Maps वर जा.
  2. तळाशी उजवीकडे, माझे स्थान माझे स्थान वर क्लिक करा.
    • तुम्हाला तुमचे स्थान शेअर करण्यास सांगितल्यास, अनुमती द्या निवडा.
    • निळा बिंदू दिसत असल्यास आणि तुमचे स्थान दाखवत असल्यास, Maps ला आधीपासून तुमच्या ब्राउझरमध्ये स्थान परवानगी आहे.
    • "Google Maps ला तुमचे स्थान वापरण्याची परवानगी नाही" असा मेसेज दिसल्यास, पुढील पायऱ्यांवर जा.
  3. शोध बारमध्ये, माझे स्थान माझे स्थान वर क्लिक करा.
  4. तुमचे स्थान अ‍ॅक्सेस करण्यासाठी, http://www.google.com ला नेहमी अनुमती द्या निवडा.
  5. तुमचा ब्राउझर रिफ्रेश करा.
Firefox
  1. तुमच्या काँप्युटरवर, Firefox उघडा आणि Google Maps वर जा.
  2. तळाशी उजवीकडे, माझे स्थान माझे स्थान वर क्लिक करा.
    • तुमचे स्थान शेअर करण्यास सांगितल्यावर, अनुमती द्या किंवा स्थान अ‍ॅक्सेस करण्यास अनुमती द्या निवडा.
    • त्याऐवजी तुम्हाला "तुमचे स्थान दाखवा" असे दिसू शकते.
    • निळा बिंदू दिसत असल्यास आणि तुमचे स्थान दाखवत असल्यास, Maps ला आधीपासून तुमच्या ब्राउझरमध्ये स्थान परवानगी आहे. 
    • "Google Maps ला तुमचे स्थान वापरण्याची परवानगी नाही" असा मेसेज दिसल्यास, पुढील पायऱ्यांवर जा.
  3. शोध बारमध्ये, माझे स्थान माझे स्थान वर क्लिक करा.
  4. तात्पुरते ब्लॉक करा बंद करा वर क्लिक करा.
  5. तुमचा ब्राउझर रिफ्रेश करा.
Safari
महत्त्वाचे: Safari वापरण्यासाठी, तुम्ही Safari मध्ये स्थान सेवा सुरू करणे हे आवश्यक आहे.
  1. तुमच्या काँप्युटरवर, Safari उघडा आणि Google Maps वर जा.
  2. तळाशी उजवीकडे, माझे स्थान माझे स्थान वर क्लिक करा.
    • तुम्हाला तुमचे स्थान शेअर करण्यास सांगितले पाहिजे. अनुमती द्या निवडा.
    • निळा बिंदू दिसत असल्यास आणि तुमचे स्थान दाखवत असल्यास, Maps ला आधीपासून तुमच्या ब्राउझरमध्ये स्थान परवानगी आहे.
    • "Google Maps ला तुमचे स्थान वापरण्याची परवानगी नाही" असा मेसेज दिसल्यास, पुढील पायऱ्यांवर जा.
  3. शोध बारमध्ये, माझे स्थान माझे स्थान वर क्लिक करा.
  4. तुमचे स्थान अ‍ॅक्सेस करण्यासाठी, http://www.google.com ला नेहमी अनुमती द्या निवडा.
  5. तुमचा ब्राउझर रिफ्रेश करा.
Microsoft Edge
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Microsoft Edge उघडा आणि Google Maps वर जा.
  2. तळाशी उजवीकडे, माझे स्थान माझे स्थान वर क्लिक करा.
    • तुम्हाला तुमचे स्थान शेअर करण्यास सांगितल्यास, अनुमती द्या निवडा.
    • निळा बिंदू दिसत असल्यास आणि तुमचे स्थान दाखवत असल्यास, Maps ला आधीपासून तुमच्या ब्राउझरमध्ये स्थान परवानगी आहे. 
    • "Google Maps ला तुमचे स्थान वापरण्याची परवानगी नाही" असा मेसेज दिसल्यास, पुढील पायऱ्यांवर जा.
  3. वेब अ‍ॅड्रेसच्या डावीकडे, लॉक करा Lock वर क्लिक करा.
  4. या साइटसाठी परवानग्या वर क्लिक करा.
  5. "स्थान" च्या उजवीकडे, अनुमती द्या निवडा.
  6. Google Maps पेज रीलोड करा  माझे स्थान माझे स्थान वर क्लिक करा.

स्थान अचूकता सुधारण्याचे आणखी मार्ग

तुम्हाला "तुमचे स्थान निर्धारित केले जाऊ शकत नाही" किंवा तुमचे स्थान अद्याप चुकीचे आहे अशी एरर आल्यास, तुम्ही पुढीलपैकी काही पायऱ्या वापरून पाहू शकता:

  • तुमचा ब्राउझर रीलोड करा (Chrome, Firefox किंवा Safari यांसारखा).
  • तुमच्याकडे एक मजबूत इंटरनेट कनेक्शन असल्याची खात्री करण्यासाठी तपासा.
  • वरील सूचनांचा वापर करून तुमच्या ब्राउझरची परवानगी सेटिंग्ज दोनदा तपासा.
  • तुमचा काँप्युटर रीस्टार्ट करा.

तुमचे स्थान इतर साइट आणि अ‍ॅप्सवर शोधा

इतर साइट आणि अ‍ॅप्सवर Google Maps मध्ये तुमचे स्थान शोधण्यासाठी, वर दिलेल्या पायर्‍या फॉलो करा. तरीही, काही वैशिष्ट्ये वेगळी असू शकतात:

  • तुम्ही वेगळी साइट किंवा अ‍ॅप वापराल, Google Maps नाही.
  • तुम्ही Google Maps ला नव्हे, तर वापरलेल्या साइट किंवा अ‍ॅपला सर्वप्रथम स्थान परवानगी देणे आवश्यक आहे.
  • तुम्ही Google Chrome किंवा Safari उघडल्यास, तुम्ही फक्त सुरक्षित वेब पेजवर तुमचे स्थान शोधू शकाल. तुम्हाला अ‍ॅड्रेस बारमध्ये "https" दिसेल.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6054696927163758489
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false