शेवटचे अपडेट केले: २४ मार्च २०२५
आशय सारणी
- Gemini अॅप्स गोपनीयता नोटिस
- तुमचा डेटा आणि Gemini Apps
- कोणता डेटा गोळा केला जातो आणि तो कसा वापरला जातो
- मानवी परीक्षणकर्ते Google AI मध्ये कशी सुधारणा करतात
- तुमची सेटिंग्ज कॉंफिगर करणे
- Gemini अॅप्स अॅक्टिव्हिटी इतर सेवा आणि सेटिंग्जसोबत कशी काम करते
- आशय काढण्याची आणि तुमची माहिती एक्सपोर्ट करण्याची विनंती करणे
- Android वर तुमचा डिव्हाइस असिस्टंट म्हणून Gemini वापरणे
- जाणून घेण्याच्या गोष्टी
- सेवा अटी
- गोपनीयतेशी संबंधित प्रश्न
- सर्वसाधारण
- Gemini अॅप्स काय आहेत?
- माझ्या डेटावर प्रक्रिया करण्यावर मला आक्षेप कसा घेता येईल किंवा Gemini अॅप्सच्या प्रतिसादांमधील चुकीचा डेटा दुरुस्त करण्याची विनंती कशी करता येईल?
- Gemini अॅप्स डेटावरील प्रक्रियेसाठी युरोपियन युनियन (ईयू) किंवा युनायटेड किंगडम (यूके) डेटा संरक्षण कायद्यांतर्गत Google चे कायदेशीर आधार काय आहेत?
- कोणता डेटा गोळा केला जातो? तो कसा वापरला जातो?
- मला जाहिराती दाखवण्यासाठी तुम्ही Gemini अॅप्स संभाषणे वापरता का?
- Gemini अॅप्समधील माझ्या संभाषणांचा अॅक्सेस कोणाला असतो?
- मला माझ्या Google खात्यामधून माझा डेटा ॲक्सेस करता आणि हटवता येईल का?
- माझी Gemini अॅप्स संभाषणे, फीडबॅक आणि संबंधित इतर डेटाचे मानवी पुनरावलोकन का आवश्यक आहे?
- मी Gemini अॅप्स अॅक्टिव्हिटी बंद केल्यानंतर Google माझी संभाषणे स्टोअर का करते आणि Google त्या डेटाचे काय करते?
- Google माझा फीडबॅक कसा वापरते?
- Gemini हे नवीन आणि विकसित होणारे तंत्रज्ञान आहे याचा अर्थ काय?
- मी Gemini अॅप्सना माहिती सेव्ह करण्यास सांगितल्यावर काय होते?
- स्थान आणि इतर परवानग्यांसंबंधी माहिती
- अपलोड केलेल्या फाइल
- जनरेट केलेल्या इमेज
- Gemini मधील कनेक्ट केलेली अॅप्स
- Gemini Live
- Gems
- सर्वसाधारण
Gemini अॅप्स गोपनीयता नोटिस
शेवटचे अपडेट केले: ६ मार्च २०२५
तुमचा डेटा आणि Gemini Apps
इथे सूचीबद्ध केलेल्या ॲप्स आणि सेवा (“Gemini ॲप्स” किंवा संक्षिप्त स्वरूपात “Gemini”) यांद्वारे तुम्ही Gemini या Google च्या वैयक्तिक AI असिस्टंटशी संवाद साधता, तेव्हा Google तुमचा डेटा कसा हाताळते याचे वर्णन ही नोटिस व आमचे गोपनीयता धोरण या गोष्टींमध्ये केले आहे.
युरोपियन इकॉनॉमिक एरिया आणि स्वित्झर्लंडमध्ये, Gemini अॅप्स ही Google Ireland Limited द्वारे पुरवली जातात. इतर सर्व ठिकाणी Gemini अॅप्स ही Google LLC द्वारे पुरवली जातात. आम्ही खालील Google Ireland Limited आणि Google LLC यांना Google असे म्हणतो.
कोणता डेटा गोळा केला जातो आणि तो कसा वापरला जातो
Google तुमची चॅट (तुमच्या Gemini Live संवादांच्या रेकॉर्डिंगसह), तुम्ही Gemini ॲप्ससह काय शेअर करता (जसे की फाइल, इमेज आणि स्क्रीन), संबंधित उत्पादन वापराची माहिती, तुमचा फीडबॅक व तुमच्या स्थानाबद्दलची माहिती गोळा करते. तुमच्या स्थानाबद्दलच्या माहितीमध्ये तुमच्या डिव्हाइसवरील सर्वसाधारण भाग, आयपी ॲड्रेस किंवा तुमच्या Google खात्यामधील घर अथवा ऑफिसचे पत्ते यांचा समावेश असतो. g.co/privacypolicy/location वर स्थान डेटाबद्दल अधिक जाणून घ्या.
Google Cloud यांसारख्या Google च्या एंटरप्राइझ उत्पादनांच्या समावेशासह Google उत्पादने आणि सेवा व मशीन लर्निंग तंत्रज्ञाने पुरवण्यासाठी, त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि ती विकसित करण्यासाठी, Google आमचे गोपनीयता धोरण याच्याशी सुसंगत राहून हा डेटा वापरते.
तुमचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असल्यास, Gemini ॲप्स ॲक्टिव्हिटी बाय डीफॉल्ट सुरू असते. १८ वर्षांहून कमी वय असलेले वापरकर्ते ती सुरू करण्याचा पर्याय निवडू शकतात. तुमचे Gemini अॅप्स अॅक्टिव्हिटी सेटिंग सुरू असेल, तर Google तुमची Gemini अॅप्स अॅक्टिव्हिटी तुमच्या Google खात्यामध्ये १८ महिन्यांपर्यंत स्टोअर करते. Gemini ॲप्स ॲक्टिव्हिटी सेटिंग मध्ये तुम्ही हा कालावधी बदलून ३ किंवा ३६ महिने करू शकता.
मानवी परीक्षणकर्ते Google AI मध्ये कशी सुधारणा करतात
गुणवत्तेच्या बाबतीत मदत व्हावी यासाठी आणि (Gemini ॲप्सना सक्षम करणारी जनरेटिव्ह मशीन-लर्निंग मॉडेलसारख्या) आमच्या उत्पादनांमध्ये सुधारणा करण्यासाठी, (तृतीय पक्षांच्या समावेशासह) मानवी परीक्षणकर्ते तुमची Gemini ॲप्ससोबतची संभाषणे वाचतात, त्यांवर भाष्य व प्रक्रिया करतात. या प्रक्रियेचा भाग म्हणून, आम्ही तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्याकरिता पावले उचलतो. परीक्षणकर्त्यांनी तुमची Gemini ॲप्ससोबतची संभाषणे पाहण्यापूर्वी किंवा त्यांवर भाष्य करण्यापूर्वी ती तुमच्या Google खात्यापासून डिस्कनेक्ट करण्याचा यामध्ये समावेश आहे. कृपया तुमच्या संभाषणांमध्ये गोपनीय माहिती अथवा परीक्षणकर्त्याने पाहू नये किंवा आमची उत्पादने, सेवा आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञाने यांमध्ये सुधारणा करण्यासाठी Google ने वापरू नये असे तुम्हाला वाटत असलेला कोणताही डेटा एंटर करू नका.
तुमची सेटिंग्ज कॉंफिगर करणे
तुमचा डेटा संरक्षित करणारी आणि तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करणारी सेटिंग्ज व टूल अॅक्सेस करण्यासाठी, तुमच्या Google खात्याला भेट देणे हे करा.
भविष्यातील चॅटचे पुनरावलोकन केले जाणे किंवा Google मशीन लर्निंग तंत्रज्ञानांमध्ये सुधारणा करण्यासाठी ती वापरली जाणे थांबवण्याकरिता, Gemini ॲप्स ॲक्टिव्हिटी बंद करणे हे करा. तुम्ही Gemini ॲप्स ॲक्टिव्हिटी मध्ये मागील संभाषणांचे पुनरावलोकन करून ती हटवूदेखील शकता.
तुम्ही तुमची Gemini अॅप्स ॲक्टिव्हिटी हटवल्यावर मानवी परीक्षणकर्त्यांद्वारे पुनरावलोकन केलेली किंवा भाष्य केलेली संभाषणे (आणि तुमची भाषा, डिव्हाइसचा प्रकार, स्थान माहिती किंवा फीडबॅक यासारखा संबंधित डेटा) हटवली जात नाहीत, कारण ती स्वतंत्रपणे ठेवली जातात आणि ती तुमच्या Google खात्याशी कनेक्ट केलेली नसतात. त्याऐवजी, ती कमाल तीन वर्षांसाठी स्टोअर केली जातात.
Gemini अॅप्स ॲक्टिव्हिटी बंद असतानादेखील, तुमची संभाषणे कमाल ७२ तासांसाठी तुमच्या खात्यामध्ये सेव्ह केली जातील. यामुळे Google ला सेवा पुरवता येते आणि कोणत्याही फीडबॅकवर प्रक्रिया करता येते. ही ॲक्टिव्हिटी तुमच्या Gemini अॅप्स ॲक्टिव्हिटीमध्ये दिसणार नाही. अधिक जाणून घ्या.
Gemini अॅप्स अॅक्टिव्हिटी इतर सेवा आणि सेटिंग्जसोबत कशी काम करते
तुम्ही हे सेटिंग बंद केल्यास किंवा तुमची Gemini ॲप्स ॲक्टिव्हिटी हटवल्यास, इतर Google सेटिंग्ज बदलणार नाहीत. ती सेटिंग्ज, जसे की वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी किंवा स्थान इतिहास, तुम्ही इतर Google सेवा वापरत असताना स्थान व इतर डेटा सेव्ह करणे सुरू ठेवू शकतात. तुम्ही Gemini अॅप्सना इतर Google सेवांसोबत इंटिग्रेट करू शकता आणि ती वापरू शकता. तुम्ही ती वापराल, तेव्हा त्या सेवांमध्ये त्यांची धोरणे व Google गोपनीयता धोरण यांच्याशी सुसंगत पद्धतीने सेवा पुरवण्यासाठी आणि त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी तुमचा डेटा सेव्ह केला जाईल व वापरला जाईल. तुम्ही तृतीय पक्ष सेवांसोबत संवाद साधण्याकरिता Gemini अॅप्स वापरल्यास, त्या सेवा त्यांच्या गोपनीयता धोरणांनुसार तुमच्या डेटावर प्रक्रिया करतील.
आशय काढण्याची आणि तुमची माहिती एक्सपोर्ट करण्याची विनंती करणे
आमची धोरणे किंवा लागू कायद्यांनुसार तुम्ही आशय काढून टाकण्याची विनंती करू शकता. तुम्ही तुमची माहिती एक्सपोर्ट देखील करू शकता.
Android वर तुमचा डिव्हाइस असिस्टंट म्हणून Gemini वापरणे
- अतिरिक्त डेटा हाताळणे. तुमचा डिव्हाइस असिस्टंट म्हणून, तुम्हाला समजून घेण्यासाठी, प्रतिसाद देण्यासाठी आणि तुमची कामे पूर्ण करण्यात तुम्हाला मदत व्हावी यासाठी Gemini तुमच्या डिव्हाइसमधील व सेवांमधील माहितीवरदेखील आमचे गोपनीयता धोरण याच्याशी सुसंगत राहून प्रक्रिया करते. उदाहरणार्थ, Gemini हे (Google Assistant द्वारे ॲक्सेस करण्यासह) डायलर, कॉल आणि मेसेज लॉग व (तुम्हाला संपर्कात राहण्यात मदत करण्यासाठी) संपर्क यांसारख्या ठरावीक सिस्टीम परवानग्या आणि डेटा, (अलार्म व टायमर नियंत्रित करण्याकरिता) Clock यांसारखी इंस्टॉल केलेली ॲप्स, (तुम्हाला Gemini शी बोलताना मदत व्हावी यासाठी) भाषा प्राधान्ये आणि (त्यावर कृती करण्यात तुम्हाला मदत करण्याकरिता) स्क्रीन आशय यांसारख्या ठरावीक सिस्टीम परवानग्या व डेटा ॲक्सेस करते. तुम्ही Gemini आणि Google Assistant सोबत वापरता ती डिव्हाइस व सेवा यांमधील संदर्भ माहिती (जसे की, स्मार्ट होम डिव्हाइस नावे आणि प्लेलिस्ट) हीदेखील त्याद्वारे ॲक्सेस केली जाते. Gemini करिता तुमच्या ॲप परवानग्या (जसे की, डिव्हाइसचे स्थान, मायक्रोफोन आणि कॅमेरा) कशा व्यवस्थापित कराव्यात याबद्दल अधिक जाणून घ्या.
- Google Assistant कडून मदत. Gemini हे ठरावीक कृतींसाठी Google Assistant कडून मदत मिळवते, तेव्हा वैयक्तिक परिणामांसारखी सुसंबद्ध Google Assistant सेटिंग्ज लागू होतात. Gemini ने कनेक्ट केलेल्या ॲप्सच्या मदतीने कृती हाताळल्यावर, ती Google Assistant सेटिंग्ज लागू होत नाहीत. Gemini आणि Google Assistant एकत्र कसे काम करतात याबद्दल अधिक जाणून घ्या. तुम्ही Google Assistant वरून Gemini वर अपग्रेड करता, तेव्हा संभाषणांच्या गुणवत्तेबाबत मदत व्हावी यासाठी काही प्रदेशांमध्ये तुमचा Google Assistant वरील अलीकडील संभाषण विनंत्यांचा इतिहास (उदाहरणार्थ, “साशा यांना मेसेज पाठव”) Gemini ॲप्स ॲक्टिव्हिटीमध्ये इंपोर्ट केला जाऊ शकतो. अधिक जाणून घ्या.
- Gemini शी संवाद साधणे. तुमच्या सेटिंग्जमध्ये “ओके Google” आणि Voice Match (Google द्वारे सक्षम केलेले) सुरू असेल, तर तुम्ही Gemini शी किंवा Google Assistant शी (यांपैकी जे सक्षम असेल ते) हॅंड्स-फ्री पद्धतीने बोलू शकता. Gemini ला ॲक्टिव्हेट करण्याचा तुमचा हेतू नसतानाही ते ॲक्टिव्हेट होऊ शकते. उदाहरणार्थ, “Ok Google” सारखा ऐकू येणारा आवाज आल्यास किंवा तुमच्याकडून चुकून स्पर्श झाल्याने ते ॲक्टिव्हेट झाल्यास, असे घडू शकते. Gemini ने प्रतिसाद दिल्यास, ते तुमचे इनपुट सामान्य ॲक्टिव्हेशनप्रमाणे हाताळेल. तुमचे Gemini ॲप्स ॲक्टिव्हिटी सेटिंग सुरू असल्यास, ही नोटिस आणि Google चे गोपनीयता धोरण या गोष्टींशी सुसंगत राहून हा डेटा वापरला जातो, ज्यामध्ये मानवी परीक्षणकर्त्यांच्या मदतीने Google AI मध्ये सुधारणा करण्याचा समावेश आहे.
पूरक वैशिष्ट्ये
तुम्ही Gemini ॲप्समध्ये (Gems सारखी) विविध पूरक वैशिष्ट्ये वापरू शकता. तुम्ही ही पूरक वैशिष्ट्ये वापरताना पुरवलेला अतिरिक्त डेटा (जसे की Gem ची नावे आणि कस्टम सूचना) गोळा केला जातो व ही नोटिस आणि आमचे गोपनीयता धोरण या गोष्टींशी सुसंगत राहून वापरला जातो, ज्यामध्ये मानवी परीक्षणकर्त्यांच्या मदतीने Google AI मध्ये सुधारणा करण्याचा समावेश आहे.
जाणून घेण्याच्या गोष्टी
- Gemini ॲप्स सातत्याने विकसित होत असून, कधीकधी Google च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नसलेली चुकीची, आक्षेपार्ह किंवा अनुचित माहिती देऊ शकतात.
- Gemini कडून आलेल्या प्रतिसादांवर वैद्यकीय, कायदेशीर, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक सल्ला म्हणून विसंबून राहू नका.
- तुमच्या फीडबॅक मुळे आम्हाला Gemini मध्ये सुधारणा करण्यात मदत होईल.
अधिक जाणून घेण्यासाठी, Gemini अॅप्स वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि Gemini अॅप्स गोपनीयता केंद्र पहा.
सेवा अटी
टीप: Google अटी आणि जनरेटिव्ह AI प्रतिबंधित वापर धोरण या गोष्टी Gemini ॲप्सना लागू होतात.
तुम्ही कोरियास्थित वापरकर्ता असाल, तर Gemini अॅप्सचा वापर कोरियन स्थान सेवा अटी यांच्या अधीन आहे याला तुम्ही सहमती दर्शवता.
गोपनीयतेशी संबंधित प्रश्न
शेवटचे अपडेट केले: २४ मार्च २०२५