Google Drive कसे वापरायचे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

तुम्‍ही Google Drive सह कोणत्‍याही डिव्‍हाइसवर तुमच्‍या फायली सुरक्षितपणे स्‍टोअर करू शकता, उघडू शकता आणि त्‍या संपादित करू शकता.

Google Drive सह सुरुवात करा

तुम्हाला तुमच्या Drive मध्ये कोणत्याही शुल्काशिवाय १५ GB जागा मिळते. Google Drive मध्ये काय जागा घेते आणि आणखी जागा कुठे खरेदी करायची ते जाणून घ्या.

१ली पायरी: अ‍ॅप उघडा

तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Drive अ‍ॅप Google Drive आयकन शोधा आणि उघडा. "माझा ड्राइव्ह" मध्ये, तुम्हाला पुढील गोष्टी दिसतील:

  • तुम्ही अपलोड किंवा सिंक केलेल्या फाइल आणि फोल्डर.
  • तुम्‍ही तयार करत असलेले Google Docs, Sheets, Slides आणि Forms

Drive अ‍ॅपचे २ प्रसंग उघडा

तुम्ही मोठी स्क्रीन असलेल्या Android डिव्हाइसवर Drive अ‍ॅपचे २ प्रसंग एकमेकांच्या बाजूला उघडू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही स्क्रीनच्या एका बाजूला तुमची फोल्डर स्क्रोल करताना, दुसऱ्या बाजूला PDF उघडू शकता.

तुमच्या डिव्हाइसचे रेझोल्यूशन ६०० dpi पेक्षा जास्त असल्यास आणि Android 12 किंवा त्यानंतरच्या आवृत्तीवर काम करत असल्यास

  1. Drive अ‍ॅप उघडा.
  2. कोणत्याही Drive आयटमवर, मेनू अधिक वर टॅप करा.
  3. स्प्लिट दृश्यामध्ये उघडा निवडा.

तुमचे डिव्हाइस हे Android N किंवा त्यानंतरच्या आवृत्तीवर काम करत असल्यास

  1. Drive अ‍ॅप उघडा.
  2. दुसरे अ‍ॅप वापरून स्प्लिट स्क्रीन मोड एंटर करा.
  3. कोणत्याही Drive आयटमवर, मेनू अधिक वर टॅप करा.
  4. इतर विंडोमध्ये उघडा निवडा.
Drive अ‍ॅपचे २ प्रसंग २ वेगळ्या खात्यांमध्ये उघडणे

तुमच्या डिव्हाइसचे रेझोल्यूशन ६०० dpi पेक्षा जास्त असल्यास आणि Android 12 किंवा त्यानंतरच्या आवृत्तीवर काम करत असल्यास

  1. Drive अ‍ॅप उघडा.
  2. फाइलच्या शेजारी, मेनू अधिक वर टॅप करा.
  3. स्प्लिट दृश्यामध्ये उघडा निवडा.
  4. तुमच्या नवीन विंडोच्या सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो निवडा.
  5. तुमचे खाते स्विच करा.

तुमचे डिव्हाइस हे Android N किंवा त्यानंतरच्या आवृत्तीवर काम करत असल्यास

  1. Drive अ‍ॅप उघडा.
  2. दुसरे अ‍ॅप वापरून स्प्लिट स्क्रीन मोड एंटर करा.
  3. कोणत्याही Drive आयटमवर, मेनू अधिक वर टॅप करा.
  4. इतर विंडोमध्ये उघडा निवडा.
  5. तुमच्या नवीन विंडोच्या सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो निवडा.
  6. तुमचे खाते स्विच करा.

दुसरी पायरी: फाइल अपलोड करा किंवा तयार करा

तुमच्‍या फोन किंवा टॅबलेटवरून तुम्‍ही फायली अपलोड करू शकता किंवा Google Drive मध्‍ये फायली तयार करू शकता.

पायरी ३: फाइल शेअर करा आणि संगतवार लावा

तुम्ही फाइल किंवा फोल्‍डर शेअर करू शकता, जेणेकरून इतर लोक ती अ‍ॅक्सेस करू शकतील, संपादित करू शकतील किंवा त्यावर टिप्पणी करू शकतील.

इतर लोकांनी तुमच्यासोबत शेअर केलेल्या फाइल पाहण्यासाठी, "माझ्यासोबत शेअर केले" विभागावर जा.

Google Drive मधून साइन आउट करणे

Android वर Drive मधून साइन आउट करण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसवरून तुमचे Google खाते काढून टाका.

इतर वापरकर्त्यांना तुमचे डिव्हाइस ॲक्सेस करण्यापासून रोखण्यासाठी, स्क्रीन लॉक कसे सेट करावे किंवा अतिथी मोड कसा वापरावा हे जाणून घ्या.

तुमचे Google खाते काढून टाकणे

  1. Settings अ‍ॅप सेटिंग्ज अ‍ॅप उघडा.
  2. वापरकर्ते आणि खाते वर टॅप करा.
  3. तुम्हाला काढून टाकायचे असलेले खाते निवडा.
  4. खाते काढून टाका वर टॅप करा.
  5. कंफर्म करण्यासाठी, खाते काढून टाका वर टॅप करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10447790212342809885
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
99950
false
false