फाइल शोधा किंवा रिकव्हर करा

तुम्हाला Google Drive मध्ये फाइल सापडत नसल्यास, त्या रिकव्‍हर करण्यासाठी तुम्ही या टिपा वापरू शकता. कोणीतरी तुमच्या परवानगीशिवाय तुमचे Google Drive अ‍ॅक्सेस केले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुमचे खाते आणखी सुरक्षित बनवण्यासाठी तुम्ही पावले उचलावीत अशी आम्ही शिफारस करतो.

Google Drive ट्रॅश मधून फाइल रिस्टोअर करणे

  1. drive.google.com वर जा.
  2. डावीकडे, ट्रॅश वर क्लिक करा.
    • तुमच्या सर्व हटवलेल्या फाइल “ट्रॅश” मध्ये सूचीबद्ध केल्या आहेत.
    • “ट्रॅश” मध्ये फाइल किती काळापूर्वी जोडल्या गेल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी, तुम्ही फाइल त्यांच्या “ट्रॅश केलेल्या तारखेनुसार” क्रमाने लावू शकता.
  3. फाइल रिस्टोअर करण्यासाठी:
    1. फाइलवर राइट-क्लिक करा.
    2. रिस्टोअर करा वर क्लिक करा.

टीप: हटवलेल्या फाइल या कायमच्या हटवल्या जाण्यापूर्वी ३० दिवस ट्रॅश मध्ये स्टोअर केल्या जातात.

Google Drive मधील ट्रॅश मधून फाइल किंवा फोल्डर रिस्टोअर करण्यासाठीच्या पायऱ्या.

कायमची हटवलेली फाइल रिकव्‍हर करणे

तुम्ही पुढील गोष्टींची पूर्तता केल्यास, तुमच्या फाइल कायमच्या हटवल्या गेल्या असल्या, तरीही त्या रिकव्‍हर करता येऊ शकतात:

  1. तुमच्या फाइल मागील २५ दिवसांमध्ये कायमच्या हटवल्या गेल्याची तुम्हाला खात्री आहे.
  2. तुम्ही फाइलचे मालक आहात.

पुढील गोष्टींची पूर्तता केल्यास, तुम्ही मालक आहात:

  • तुम्ही तुमच्या Google Drive खात्यामध्ये फाइल किंवा फोल्डर तयार केले आहे.
  • तुम्ही Google Drive मध्ये फाइल किंवा फोल्डर अपलोड केले आहे.
  • तुम्ही फाइलची मालकी मूळ मालकाकडून स्वीकारली आहे.

आमच्याशी संपर्क साधण्यासाठी, तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.

Drive सपोर्ट सर्व भाषांमध्ये उपलब्ध नाही. तुम्ही इंग्रजी बोलत असल्यास, तुम्ही तुमची भाषा बदलू शकता आणि Drive तज्ञाशी संपर्क साधू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Drive मदत केंद्र वर जा.
  2. पेजच्या तळाशी, तुमच्या भाषेवर क्लिक करा.
  3. इंग्रजी निवडा.
  4. सर्वात वर डावीकडे, मेनू आणि त्यानंतर आमच्याशी संपर्क साधा वर क्लिक करा.
  5. तुमची समस्या आणि तुम्हाला आमच्याशी कसा संपर्क साधायचा आहे ते निवडा.

टीप: तुमचे पूर्ण झाल्यावर, तुम्ही तुमची भाषा परत तुमच्या प्राधान्य दिलेल्या भाषेवर बदलू शकता.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10542671746477182617
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
99950
false
false