फाइल आणि फोल्डर Shared Drive मध्ये हलवणे

सहजरीत्या सहयोगासाठी, तुम्ही कॉंप्युटरवर ऑफिस किंवा शाळा खाते यावर लॉग इन केलेले असल्यास, फाइल आणि फोल्डर माझे ड्राइव्ह मधून Shared Drive वर हलवू शकता. बाय डीफॉल्ट, तुम्ही फक्त तुमच्या मालकीच्या फाइल आणि फोल्डर हलवू शकता. 

  • तुमच्या ॲडमिनने फाइल संपादकांना Shared Drive मध्ये फाइल हलवण्याची अनुमती देण्याचे सेटिंग सुरू केल्यास, तुम्ही संपादक असलेल्या फाइल तुम्हाला हलवता येऊ शकतील. या ॲडमिन सेटिंगबद्दल अधिक माहितीसाठी, तुमच्या संस्थेचा आशय Shared Drive वर हलवणे वर जा. 
  • तुम्ही Shared Drive चे व्यवस्थापक असाल फक्त तरच तुम्ही Shared Drive वर फोल्डर हलवू शकता.

फाइलचा अ‍ॅक्सेस कसा बदलतो ते जाणून घ्या

तुम्ही Shared Drive वर आशय हलवता तेव्हा:

  • Shared Drive चे सदस्य नसलेले Shared Drive वर हलवलेल्या आशयाचा अ‍ॅक्सेस गमावू शकतात.
  • फक्त Shared Drive चे सदस्य आणि ज्यांच्यासोबत फाइल थेट शेअर केली आहे ते लोक फाइल अ‍ॅक्सेस करू शकतात.
  • फोल्डरकडून मिळालेल्या फाइलच्या परवानग्या कॉपी केलेल्या नसतात. 
    • तुम्ही Shared Drive वर उप फोल्डर हलवल्यास, मुख्य फोल्डरकडून मिळालेल्या परवानग्या कॉपी केल्या जाणार नाहीत.
    • तुम्ही Shared Drive वर मुख्य फोल्डर हलवल्यास, उप फोल्डरकडे तरीही त्या मिळालेल्या परवानग्या असतील.
  • फाइलचा मूळ मालक तुमच्या संस्थेमध्ये असल्यास पण Shared Drive चा सदस्य नसल्यास, ते मालकी गमावतात पण तरीही फाइल अ‍ॅक्सेस करू शकतात.

तुम्ही फाइल आणि फोल्डर हलवता, तेव्हा मर्यादा समजून घ्या 

तुम्ही फाइल आणि फोल्डर ही माझे ड्राइव्ह वरून Shared Drive वर हलवता, तेव्हा तुम्हाला येणाऱ्या काही साधारण समस्या येथे नमूद केल्या आहेत:

तुमच्या संस्थेच्या बाहेरील वापरकर्त्यांच्या मालकीच्या फाइल हलवणे

  • बाहेरील वापरकर्ता हा गंतव्यस्थान Shared Drive चा सदस्य असला तरीही तुम्ही बाहेरील वापरकर्त्यांच्या मालकीची फोल्डर आणि फाइल हलवू शकत नाही. 
  • बाह्य मालकीच्या फोल्डरचा भाग असलेली आतील मालकीची सबफोल्डर तुम्ही हलवू शकत नाही.

Google Sites फाइलना Shared Drive वर हलवणे

  • साइटचा मूळ मालक हा Shared Drive च्या समान संस्थेमध्ये असल्यास, प्रकाशित झालेली साइट तरीही दृश्यमान असते. साइट पूर्वी शेअर केली होती अशा वापरकर्त्यांसाठी, साइटशी संबंधित Sites फाइल अजूनही ॲक्सेस करता येणारी आहे.
  • साइटचा मूळ मालक हा Shared Drive पेक्षा वेगळ्या संस्थेमध्ये असल्यास, प्रकाशित झालेली साइट तरीही दृश्यमान असते. संबंधित फाइल पूर्वी त्यांच्यासोबत शेअर केली होती तरीदेखील, ती Shared Drive चे सदस्य नसलेल्या लोकांना ॲक्सेस करता येणारी नाही.

तुम्ही Drive फोल्डर हे Shared Drive वर हलवताना येणाऱ्या इतर मर्यादा समजून घेणे

  • हलवता न येणाऱ्या सर्व आयटमचे शॉर्टकट तयार केले जातात. परवानगी किंवा अ‍ॅक्सेस संबंधित समस्या असल्यामुळे हलवता न येणारे कोणते आयटम असल्यास, तुम्ही माझे ड्राइव्ह मधून Shared Drive वर फोल्डर हलवता, तेव्हा ते सद्य फोल्डरची हायरार्की जपण्यासाठी Shared Drive मध्ये शॉर्टकट तयार करतात. हे करण्यासाठी, आम्ही पुढीलप्रमाणे फोल्डर हलवण्याच्या मर्यादांची अंमलबजावणी करतो:
    • असे फोल्डर ज्यामध्ये २५ हलवता न येणारे आयटम असल्यास किंवा १०% आयटम हलवता न येणारे असल्यास ते हलवले जाऊ शकत नाहीत (मर्यादा प्रति फोल्डर १०% किंवा २५ आयटमपेक्षा लहान आहे).
    • एकूण कमाल १००,००० आयटम हलवले जाऊ शकतात.
  • शॉर्टकट तयार केले जातात, तेव्हा मूळ आयटम हे मालकाच्या माझे ड्राइव्ह फोल्डरमध्ये हलवले जातात.
  • मर्यादा गाठली जाऊ शकते एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही फोल्डर हे Shared Drive वर हलवता, तेव्हा तुम्ही हलवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तुम्हाला चेतावणी देणारी सूचना मिळू शकते.

हलवण्याआधीचा डायलॉग हा हलवण्याआधीच्या डाउनलोडसोबत का जुळू शकणार नाही ते समजून घेणे

  • तुमच्या हलवण्याआधीच्या डायलॉगमधील हलवता येणाऱ्या आयटमची संख्या ही पुढील कारणांमुळे तुमच्या हलवण्याआधीच्या डाउनलोडमध्ये दिसणाऱ्या संख्येशी जुळू शकणार नाही: 
    • हलवण्याआधीचा डायलॉग तुमच्याकडे अ‍ॅक्सेस नसलेले आयटम मोजतो, हलवण्याआधीचे डाउनलोड हे आयटम समाविष्ट करत नाही.
    • इतर फोल्डर किंवा आयटम असलेले फोल्डर (मुख्य फोल्डर) हलवता येणारे नसल्यास आणि त्या मुख्य फोल्डरमध्ये हलवता न येणारे आणखी आयटम असल्यास, फक्त मुख्य फोल्डर सूचिबद्ध केले जाते. त्या मुख्य फोल्डरमधील आयटम हे हलवता येणाऱ्या आयटमच्या संख्येमध्ये मोजले जात नाहीत.

एरर कोड समजून घेणे

आयटम हलवले जाऊ शकत नाहीत अशी तुम्हाला सूचना मिळाल्यास, तुमच्याकडे आयटमची सूची डाउनलोड करा (CSV) यावर क्लिक करण्याचा पर्याय असेल. ते CSV फाइल डाउनलोड करण्याची सूचना देईल ज्यामध्ये हलवता न येणाऱ्या आयटमची सूची आणि प्रत्येक आयटमशी संबंधित एरर कोड समाविष्ट आहे. प्रत्येक एरर कोडबद्दल अधिक माहिती खालती सूचिबद्ध केलेली आहे:

न हलवण्याचे अज्ञात कारण आणि इतर
विविध कारणांमुळे फाइल हलवल्या जाऊ शकत नाहीत.
अपुरी परवानगी
तुमच्याकडे आवश्यक परवानग्या नसल्यामुळे फाइल हलवल्या जाऊ शकत नाहीत. फाइलच्या मालकाला परवानग्यांबद्दल विचारा.
वेगवेगळे ग्राहक
ही फाइल ज्या संस्थेची आहे त्या संस्थेने तशी अनुमती न दिल्यामुळे फाइल हलवल्या जाऊ शकत नाहीत.
गैरवापर/गैरवर्तन
फाइलमध्ये हानिकारक आशय असल्यामुळे त्या हलवल्या जाऊ शकत नाहीत.
ब्लॉक करण्याचे प्रकार
फाइलच्या त्या प्रकारांना Shared Drive मध्ये सपोर्ट नसल्यामुळे फाइल हलवल्या जाऊ शकत नाहीत.
Shared Drive न सापडणे
लक्ष्यित गंतव्यस्थान काढून टाकल्यामुळे फाइल हलवल्या जाऊ शकत नाहीत.
आधीपासून Shared Drive मध्ये असणे
फाइल आधीपासून गंतव्यस्थान Shared Drive मध्ये असल्यामुळे त्या हलवल्या जाऊ शकत नाहीत.
संपादकाचे फाइल हलवणे बंद करणे
तुमचा डोमेन हा संपादकांना फाइल Shared Drive मध्ये हलवण्याची अनुमती देत नसल्यामुळे फाइल हलवल्या जाऊ शकत नाहीत.
मालक हा गंतव्यस्थान Shared Drive चा सदस्य असणे आवश्यक
मालक हा Shared Drive चा सदस्य नसल्यामुळे फाइल हलवल्या जाऊ शकत नाहीत.
ॲडमिन असल्यामुळे फाइल हलवता न येणे
ॲडमिन वापरकर्त्याकडे हलवण्याचे विशेषाधिकार नसल्यामुळे फाइल हलवल्या जाऊ शकत नाहीत.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18071031977638268093
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
99950
false
false