Google Slides मध्ये तुमचे शब्दलेखन तपासा

Google Slides मध्ये टाइप करत असताना तुम्हाला चुकीचे शब्दलेखन सापडू शकते आणि तुम्ही ते दुरुस्त करू शकता.

शब्दलेखन तपासा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Slides उघडा.
  2. सादरीकरणावर क्लिक करा.
  3. वरच्या बाजूला, टूल आणि त्यानंतरशब्दलेखन वर क्लिक करा.
  4. स्पेल चेक वर क्लिक करा.

स्पेल चेकला एरर आढळल्यास, तुम्हाला शब्दलेखन सुचवले जाईल:

  • सूचना स्वीकारण्यासाठी, बदला वर क्लिक करा.
    सर्व सूचना स्वीकारण्यासाठी, डाउन अ‍ॅरो डाउन अ‍ॅरो आणि त्यानंतर सर्व बदला वर क्लिक करा.
  • सूचना दुर्लक्षित करण्यासाठी,दुर्लक्षित करा वर क्लिक करा.
    सर्व सूचना दुर्लक्षित करण्यासाठी, डाउन अ‍ॅरो डाउन अ‍ॅरो​ आणि त्यानंतर सर्व दुर्लक्षित करा वर क्लिक करा.
टीप: तुम्ही शब्दलेखन सूचना सुरू केल्यास, चुकीचे शब्दलेखन असलेले शब्द लाल रंगात अधोरेखित केले जातील. सूचना स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी, शब्दावर राइट क्लिक करा.

तुमच्या वैयक्तिक शब्दकोशात शब्द जोडा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Slides उघडा.
  2. वरच्या बाजूला, टूल आणि त्यानंतर शब्दलेखन वर क्लिक करा.
  3. वैयक्तिक शब्दकोश वर क्लिक करा.
  4. तुमचा नवीन शब्द एंटर करा.
  5. ओके वर क्लिक करा.

शब्दलेखन सूचना सुरू किंवा बंद करा

महत्त्वाचे: तुमच्या सर्व सादरीकरणांसाठी सूचना सुरू किंवा बंद करण्याकरिता या पायर्‍या फॉलो करा.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Slides उघडा.
  2. वरच्या बाजूला, टूल आणि त्यानंतर शब्दलेखन आणि त्यानंतर एरर अधोरेखित करा वर क्लिक करा.

ऑटोकरेक्ट बंद करा

ऑटोकरेक्ट कॅपिटलायझेशन तपासते आणि लिंक व सूची तयार करते.

ठरावीक ऑटोकरेक्शन बंद करण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Slides उघडा.
  2. वरच्या बाजूला, टूल आणि त्यानंतर प्राधान्ये आणि त्यानंतर सर्वसाधारण वर क्लिक करा.
  3. ठरावीक ऑटोकरेक्ट बंद करण्यासाठी, कार्याच्या बाजूच्या बॉक्समधील खूण काढा.
  4. ओके वर क्लिक करा.

ठरावीक ऑटो पर्याय बंद करा

  1. तुमच्या काँप्युटरवर,Google Slides उघडा.
  2. टूल आणि त्यानंतर प्राधान्ये आणि त्यानंतर पर्याय वर क्लिक करा.
  3. ठरावीक ऑटो पर्याय बंद करण्यासाठी, शब्द किंवा चिन्हाच्या बाजूच्या बॉक्समधील खूण काढा.
  4.  ऑटो पर्याय काढण्यासाठी, शब्द किंवा चिन्हाच्या बाजूला, काढा remove वर क्लिक करा.
  5. ओके वर क्लिक करा.

संबंधित लेख

Google Docs मध्ये तुमचे शब्दलेखन आणि व्याकरण दुरुस्त करा

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6319114917060023351
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false