Google Sheets मध्ये BigQuery डेटासोबत समस्यांचे निराकरण करा

अ‍ॅक्सेस किंवा शेअरिंगबाबतच्या समस्यांचे निराकरण करा

Google Sheets मध्ये BigQuery डेटाच्या अ‍ॅक्सेससाठी, तुम्हाला पुढील गोष्टींची आवश्यकता आहे:

वरील निकषांची पूर्तता न करणार्‍या एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही शीट शेअर केल्यास, त्यांना तुमचे Connected Sheets सोबत बनवलेले विश्लेषण पाहता येईल आणि नियमित Sheets ऑपरेशन करता येतील, परंतु त्यांना ते रिफ्रेश करता येणार नाही किंवा त्यांचे स्वतःचे कनेक्ट केलेले शीट तयार करता येणार नाही.

योग्य त्या डेटा सारण्यांचा ॲक्सेस नसलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही शीट शेअर केल्यास, त्यांना Connected Sheets विश्लेषण तयार किंवा रिफ्रेश करता येणार नाही आणि BigQuery ॲडमिनशी संपर्क साधावा लागेल.

शेड्युल केलेल्या रिफ्रेशसोबत समस्यांचे निराकरण करा

महत्त्वाचे: कनेक्ट केलेल्या शीटचे शेड्यूल केलेली रिफ्रेश ही आयपी अ‍ॅड्रेस किंवा डिव्हाइस माहिती यांसारख्या अंतिम वापरकर्ता संदर्भाचा प्रसार करत नाहीत. अ‍ॅक्सेस प्रतिबंधित करण्यासाठी अंतिम वापरकर्ता संदर्भ वापरणाऱ्या व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड सर्व्हिस कंट्रोल्स (VPC-SC) या पेरिमीटरमुळे शेड्युल केलेली रिफ्रेश अयशस्वी होतील.

शेड्युल केलेल्या डेटा रिफ्रेशबाबत तुम्हाला समस्या असल्यास:

क्वेरी अयशस्वी होण्याबाबतच्या समस्यांचे निराकरण करा
तुम्हाला क्वेरी अयशस्वी होण्याबाबत समस्या असल्यास: 
  • BigQuery सारणी हटवली गेली असू शकते. सारणीच्या मालकाशी संपर्क साधा. नवीन सारणीशी कनेक्ट करण्यासाठी, तळाशी "रिफ्रेश करा" च्या बाजूला, आणखी पर्याय अधिक आणि त्यानंतर कनेक्शन सेटिंग्ज वर क्लिक करा. नवीन सारणी आणि त्यानंतर कनेक्ट करा वर क्लिक करा. 
  • BigQuery सारणीमधील स्तंभ बदलले असू शकतात. स्तंभ बदलले आहेत का हे विचारण्यासाठी सारणीच्या मालकाशी संपर्क साधा. ते बदलले असल्यास, क्वेरीमध्ये योग्य स्तंभाचा संदर्भ द्या.
  • BigQuery मध्ये सारणी पाहण्याची तुम्हाला परवानगी नसू शकते. अ‍ॅक्सेसची विनंती करण्यासाठी सारणीच्या मालकाशी संपर्क साधा.
  • निवडलेल्या बिलिंग प्रोजेक्टवर कार्य रन करण्याची तुम्हाला परवानगी नसू शकेल. कनेक्शन सेटिंग्जवर जा आणि बिलिंग प्रोजेक्ट बदला किंवा अ‍ॅक्सेसची विनंती करण्यासाठी बिलिंग प्रोजेक्टच्या मालकाशी संपर्क साधा. 
  • तुमचे क्वेरी परिणाम खूप मोठे असू शकतात. पुढील बाबतींत तुमची क्वेरी अयशस्वी होईल:
    • मुख्य सारणीमध्ये 30K पेक्षा जास्त परिणाम असल्यास. तुमचे क्वेरी परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
      • परिणाम मर्यादित करण्यासाठी फिल्टर वापरणे
      • प्रति ब्रेकआउट पंक्तींची संख्या मर्यादित करणे 
      • पंक्ती, स्तंभ, मूल्ये आणि फिल्टर जोडताना “एकूण दाखवा” बंद करा
    • परिणामांचा आकार १०MB पेक्षा जास्त असल्यास. आकार कमी करण्यासाठी, आणखी कमी पंक्ती किंवा स्तंभ मिळवा.
  • तुम्ही BigQuery सँडबॉक्स वापरत आहात आणि तुम्हाला कदाचित सँडबॉक्सच्या मर्यादा आल्या आहेत. BigQuery सँडबॉक्सच्या मर्यादांबद्दल अधिक जाणून घ्या. तुम्ही तुमची डेटा मर्यादा गाठली असल्यास, तुमचे खाते अपग्रेड कसे करायचे ते जाणून घ्या
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1343044122589585748
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false