स्‍मार्ट लेखन आणि स्मार्ट उत्तर वापरा

महत्त्वाचे: ऑफिस किंवा शाळेमार्फत खाती असलेल्या वापरकर्त्यांसाठी इंग्रजी, स्पॅनिश, पोर्तुगीझ आणि फ्रेंच भाषेत स्‍मार्ट लेखन उपलब्ध आहे. स्मार्ट उत्तर हे Google Docs आणि Slides साठी इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.

स्‍मार्ट लेखन आणि स्मार्ट उत्तर ही उत्तर पुरवत नाहीत आणि कदाचित नेहमी तथ्यानुसार योग्य माहिती देणार नाहीत. दोन्ही वैशिष्ट्ये सूचना ऑफर करण्यासाठी मशीन लर्निंग वापरतात.

Google Docs, Slides, Sheets आणि Drawings मध्ये स्‍मार्ट लेखन वापरणे

तुम्हाला आणखी जलद आणि अधिक सोप्यारीतीने दस्तऐवज लिहिता येण्यात मदत करण्यासाठी तुम्ही Google Docs, Slides, Sheets व Drawings मध्ये स्‍मार्ट लेखन वापरू शकता.
स्‍मार्ट लेखन हे Google Slides आणि Drawings च्या टिप्पण्यांमध्येदेखील उपलब्ध आहे.

स्‍मार्ट लेखन सुरू किंवा बंद करा

  1. फाइल उघडा. 
  2. सर्वात वरती, टूलआणि त्यानंतरप्राधान्ये वर क्लिक करा. 
  3. स्‍मार्ट लेखन सुरू किंवा बंद करण्यासाठी, स्‍मार्ट लेखन सूचना दाखवा वर क्लिक करा.
  4. ओके वर क्लिक करा.
टीप: तुम्ही Google Docs मध्ये स्‍मार्ट लेखन बंद केल्यास, स्‍मार्ट लेखन सूचना मुख्य संपादन विंडो किंवा टिप्पण्यांमध्ये दिसणार नाहीत. तुम्ही Google Sheets मध्ये स्‍मार्ट लेखन बंद करू शकत नाही.

सूचना स्‍वीकारा किंवा नाकारा

स्‍मार्ट लेखन सूचना स्वीकारण्यासाठी:

  • टॅब की दाबा
  • राइट अ‍ॅरो की दाबा
  • Android किंवा iOS साठी: सूचित मजकुरावरून उजवीकडे स्‍वाइप करा
Smart Compose सूचना नाकारण्यासाठी, टाइप करत राहा.

Google Docs आणि Slides मधील स्मार्ट उत्तर

टिप्पण्यांना उत्तर देण्याचा वेळ वाचवण्यासाठी तुम्ही Google Docs आणि Slides मध्ये स्मार्ट उत्तर वापरू शकता.

स्मार्ट उत्तर सुरू किंवा बंद करा

  1. फाइल उघडा. 
  2. सर्वात वरती, टूलआणि त्यानंतरप्राधान्ये वर क्लिक करा. 
  3. स्‍मार्ट लेखन सुरू किंवा बंद करण्यासाठी, स्मार्ट उत्तर सूचना दाखवा वर क्लिक करा.
  4. ओके वर क्लिक करा.

टीप: तुम्ही Smart Reply बंद केल्यास, Smart Reply सूचना या टिप्पण्यांवर दिसणार नाहीत.

सुचवलेले उत्तर स्वीकारा किंवा नाकारा

स्मार्ट उत्तर सूचना स्वीकारण्यासाठी:

  • सूचनेवर क्लिक करा
  • उत्तराच्या बॉक्सवर फोकस करा, सूचनेवर टॅब करा आणि एंटर दाबा
  • स्क्रीन रीडरच्या वापरासाठी वाचिक सूचना फॉलो करा

स्मार्ट उत्तर सूचना नाकारण्यासाठी, उत्तराच्या बॉक्समध्ये इतर काहीतरी टाइप करा.

मशीन लर्निंगविषयी

भाषा समजणारी मॉडेल बोललेल्या शब्दांचे आपोआप प्रतिलेखन करण्यासाठी अब्जावधी सामान्य वाक्प्रचार आणि वाक्ये वापरत असल्यामुळे, त्यांमध्ये मानवी आकलनाशी संबंधित पूर्वग्रहदेखील दिसू शकतात. याची जाणीव असणे ही एक चांगली सुरुवात आहे आणि ती कशी हाताळायची याबद्दल संभाषण सुरू आहे. Google प्रत्येकासाठी योग्य असतील अशी उत्पादने तयार करण्यास वचनबद्ध आहे आणि अनावधानाने होणारा पक्षपात आणि निरसन धोरणांवर सक्रियपणे संशोधन करत आहे.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1127087501060640385
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false