तुमचे Google स्‍टोरेज कसे काम करते

प्रत्येक Google खाते मध्ये १५ GB स्टोरेजचा समावेश असतो, जे संपूर्ण Google Drive, Gmail, आणि Google Photos वर शेअर केले जाते. तुमच्या प्रदेशामध्ये Google One ची सुविधा उपलब्ध असल्यास, तुमच्या स्टोरेज कोट्यामध्ये वाढ करण्यासाठी, तुम्ही Google One सदस्यत्व खरेदी करू शकता. अधूनमधून, तुम्हाला विशेष प्रमोशन किंवा संबंधित खरेदीमधून अधिक स्टोरेज मिळू शकते. जागा मोकळी किंवा अपग्रेड कशी करावी आणि तुम्ही तुमचे स्टोरेज कसे वापरता हे जाणून घ्या.

तुमच्या Google खाते स्टोरेजवर कशाचा परिणाम होतो

तुमच्या स्टोरेज कोटामध्ये काय मोजले जाते

  • Google Photos वर बॅकअप घेतलेले मूळ गुणवत्तेमधील फोटो आणि व्हिडिओ.
  • १ जून २०२१ नंतर Google Photos वर उच्च गुणवत्तेचे (आताचे नाव स्टोरेज सेव्हर) आणि अत्युच्च गुणवत्तेचे फोटो आणि व्हिडिओ यांचा बॅकअप घेतला जातो. तुम्ही १ जून २०२१ आधी मूळ गुणवत्तेमध्ये किंवा अत्युच्च गुणवत्तेमध्ये बॅक अप घेतलेले फोटो किंवा व्हिडिओ तुमच्या Google खाते स्टोरेजमध्ये मोजले जाणार नाहीत. या बदलाबद्दल अधिक जाणून घ्या.
  • Gmail मेसेज आणि अटॅचमेंट, ज्यांमध्ये तुमच्या स्पॅम आणि ट्रॅश फोल्डरचा समावेश आहे.
  • Google Drive मधील फाइल, ज्यांमध्ये PDFs, इमेज आणि व्हिडिओचा समावेश आहे.
  • Meet मधील कॉल रेकॉर्डिंग.
  • Google Docs, Sheets, Slides, Drawings, Forms, Recorder आणि Jamboard यांसारख्या सहयोगाने आशय तयार करण्यासंबंधित अ‍ॅप्समध्ये तयार केलेल्या किंवा संपादित केलेल्या फाइल.
    • १ जून २०२१ नंतर तयार केलेल्या किंवा संपादित केलेल्या फाइल तुमच्या कोट्यामध्ये मोजल्या जातात.
    • १ जून २०२१ पूर्वी अपलोड केलेल्या किंवा शेवटच्या संपादित केलेल्या फाइल तुमच्या कोट्यामध्ये मोजल्या जात नाहीत.

टीप: WhatsApp चे Android वरील बॅकअप हे लवकरच तुमच्या Google खाते स्टोरेजमध्ये मोजले जातील. WhatsApp बॅकअपबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही कोटा ओलांडता तेव्हा, त्याचा अर्थ असा, की तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या स्टोरेजपेक्षा जास्त जागा वापरत आहात. तुम्ही तुमचा स्टोरेज कोटा ओलांडल्यास:

  • तुम्ही Google Drive वर नवीन फाइल किंवा इमेज अपलोड करू शकत नाही.
  • तुम्ही Google Photos वर कोणत्याही फोटो आणि व्हिडिओचा बॅकअप घेऊ शकत नाही.
  • Gmail मध्ये ईमेल पाठवण्याच्या आणि मिळवण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
  • तुम्ही Google Docs, Sheets, Slides, Drawings, Forms आणि Jamboard सारख्या सहयोगाने आशय तयार करणाऱ्या अ‍ॅप्समध्ये नवीन फाइल तयार करू शकत नाही. तुम्ही तुमचा स्टोरेज वापर कमी करेपर्यंत, तुमच्या परिणाम झालेल्या फाइल कोणीही संपादित किंवा कॉपी करू शकत नाही.
  • तुम्ही नवीन Recorder फाइलचा बॅकअप घेऊ शकत नाही.
  • टीप:तुम्ही तरीही साइन इन करू शकता आणि तुमचे Google खाते अ‍ॅक्सेस करू शकता.

तुम्ही दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी तुमचा स्टोरेज कोटा ओलांडल्यास: परत कोटाच्या मर्यादेमध्ये येण्यासाठी तुम्ही जागा मोकळी न केल्यास किंवा आणखी जागा खरेदी न केल्यास, Gmail, Google Photos आणि Google Drive वरून तुमचा सर्व आशय काढून टाकला जाऊ शकतो (यामध्ये Google Docs, Sheets, Slides, Drawings, Forms आणि Jamboard फाइलचा समावेश आहे).

तुमचा आशय काढून टाकण्यापूर्वी, आम्ही:

  • Google उत्पादनांमधील ईमेल आणि सूचनांद्वारे तुम्हाला मेसेज देऊ. आशय हटवण्यासाठी पात्र ठरण्यापूर्वी आम्ही किमान तीन महिने आधी तुमच्याशी संपर्क साधू. 
  • (अतिरिक्त स्टोरेजसाठी पैसे देऊन किंवा फाइल हटवून)तुम्हाला आशय हटवणे टाळण्याची संधी देते
  • तुम्हाला आमच्या सेवांमधून तुमचा आशय डाउनलोड करण्याची संधी दिली जाते.. तुमचा Google डेटा डाउनलोड करणे हे कसे करावे याबद्दल अधिक जाणून घ्या.

कोट्याच्या मर्यादेमध्ये पुन्हा कसे यावे

आम्ही स्टोरेज व्यवस्थापन टूलचा अ‍ॅक्सेस देतो ज्यामुळे तुम्हाला स्टोरेज जागा मोकळी करण्याचे मार्ग मिळण्यात मदत होते. जागा मोकळी करण्याचा दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या फाइल वैयक्तिक डिव्हाइसवर डाउनलोड करणे आणि त्यानंतर त्या क्लाउड स्‍टोरेजमधून हटवणे.

तुम्हाला Gmail, Drive आणि Photos साठी आणखी स्टोरेज जागा हवी असल्यास, तुम्ही Google One सह आणखी मोठ्या स्टोरेज प्लॅनवर अपग्रेड करू शकता. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ही धोरणे G Suite/Workspace खाती तसेच ग्राहक खात्यांवरही लागू होतात का?
कोट्याशी संबंधित काही बदल काही Google Workspace, G Suite for Education आणि G Suite for Nonprofits प्लॅनसाठी लागू होतील. कृपया हे बदल त्यांच्यावर कसा परिणाम करतात हे समजून घेण्यासाठी, आमच्या Google Workspace अपडेट पोस्ट पहा. 
ही धोरणे Google Sites, Google Keep आणि येथे सूचीबद्ध नसलेल्या इतर आशय तयार करण्यासंबंधित अ‍ॅप्सना लागू होतात का? Blogger आणि YouTube वरील आशयाविषयी काय?

संपत आलेल्या कोटाशी संबंधित धोरण यावर लागू होत नाही:

  • Google Sites
  • Google Keep
  • Blogger
  • YouTube

इनॅक्टिव्हिटीशी संबंधित धोरण तुमचे Google खाते आणि खात्यातील सर्व आशयावर लागू होते.

माझा कोटा संपला आहे. माझा आशय हटवला जाण्यापूर्वी माझ्याकडे किती कालावधी आहे? 
तुमचे खाते या धोरण बदलाच्या अधीन असल्यास, तुमचा आशय हटवण्यापूर्वी आम्ही तुम्हाला आगाऊ सूचना देण्याचा प्रयत्न (किमान तीन महिने आधी) करू. तुम्ही स्टोरेज कोट्याची मर्यादा दोन वर्षांहून अधिक ओलांडलेली असेल तेव्हा, तुमचा आशय हटवण्यासाठी पात्र होईल. तुमचा आशय हटवला जाऊ नये याची खात्री करण्यासाठी, तुम्ही वापरत असलेले स्टोरेज कमी करा किंवा Google One सह आणखी मोठ्या स्टोरेज प्लॅनवर अपग्रेड करणे हे करा.
माझा डेटा हटवला जाण्यापूर्वी तुम्ही मला त्याची सूचना द्याल का? 

तुमचे खाते या धोरणातील बदलाच्या अधीन असल्यास, तुमचा आशय हटवला जाण्यापूर्वी आम्ही तुम्हाला किमान ३ महिन्यांची सूचना देऊ.

एखाद्या प्रियजनाचे निधन झाल्यावर मला त्यांचा आशय कसा जतन करता येईल?

आम्ही लक्षात घेतो, की अनेक लोक त्यांची ऑनलाइन खाती कशी व्यवस्थापित केली जावीत याबद्दल स्पष्ट सूचना न ठेवता निधन पावतात. निधन झालेल्या वापरकर्त्याच्या खात्यामधील आशय पुरवण्यासाठी Google हे जवळचे कुटुंब सदस्य आणि (ठरावीक बाबतींत) प्रतिनिधी यांच्यासोबत काम करू शकते. निधन झालेल्या वापरकर्त्याच्या डेटाच्या विनंतीसंबंधित आमची प्रक्रिया याविषयी अधिक जाणून घ्या.

निधन किंवा दीर्घकालीन इनॅक्टिव्हिटीच्या प्रसंगी तुमच्या डेटाचे काय करावे ते आम्हाला आगाऊ कळवण्यासाठी, इनॅक्टिव्ह खाते व्यवस्थापक याबद्दल अधिक जाणून घ्या.

टीप: इनॅक्टिव्ह खाते व्यवस्थापक सेटिंग्ज आमची इनॅक्टिव्ह आणि कोटा संपण्याची धोरणे यांना ओव्हरराइड करत नाहीत.

true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14004090244446703126
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false