स्लायसरने चार्ट आणि टेबल फिल्टर करा

तुम्ही कस्टम डॅशबोर्ड तयार केल्यास, तुम्ही तुमचे टेबल, चार्ट किंवा पिव्हट टेबल फिल्टर करण्यासाठी स्लायसर जोडू शकता.

स्लायसर वापराचा gif

स्लायसर जोडा

 1. तुमच्या काँप्युटरवर, sheets.google.com वर स्प्रेडशीट उघडा.
 2. तुम्हाला फिल्टर करायचा असलेल्या चार्ट किंवा पिव्हट टेबलवर क्लिक करा.
 3. वरच्या बाजूला, डेटा आणि त्यानंतर स्लायसर वर क्लिक करा.
 4. उजवीकडे, ज्यानुसार फिल्टर करायचे तो स्तंभ निवडा.
 5. स्लायसरवर क्लिक करा आणि तुमचे फिल्टर नियम निवडा:
  • स्थितीनुसार फिल्टर करा: स्थितींच्या सूचीमधून निवडा किंवा तुमची स्वतःची स्थिती तयार करा.
  • मूल्यांनुसार फिल्टर करा: तुम्हाला लपवायच्या असलेल्या कोणत्याही डेटा पॉइंटची खूण काढा. 

टिपा:

 • तुम्ही प्रति स्तंभ एक स्लायसर वापरू शकता. एकाहून अधिक स्तंभांनुसार फिल्टर करण्यासाठी, एकाहून अधिक स्लायसर जोडा.
 • स्लायसर एकच डेटा सेट वापरणार्‍या पत्रकामधील सर्व चार्ट आणि पिव्हट टेबलना लागू होतात.
 • तुम्ही एकच स्रोत डेटा वापरणारे एकाहून अधिक स्लायसर जोडल्यास, प्रत्येक स्लायसरची रेंज इतर स्लायसरप्रमाणेच आहे याची खात्री करा.
 • स्लायसरच्या फिल्टर निवडी तुम्ही डीफॉल्ट म्हणून सेट न केल्यास खाजगी आणि सेव्ह न केलेल्या राहतात.

फिल्टर, फिल्टर दृश्ये आणि स्लायसर

फिल्टर:

 • दृश्यमानता: स्प्रेडशीट अ‍ॅक्सेस करता येणार्‍या प्रत्येकजणाला दिसते. फिल्टर काढले किंवा बदलले जाईपर्यंत जागेवर राहतात.
 • पुनर्वापर: पुनर्वापरासाठी टेम्पलेट म्हणून स्टोअर केले जाऊ शकत नाही. 
 • परवानग्या: स्प्रेडशीट पाहू शकणार्‍या कोणालाही लागू केलेले फिल्टर दिसेल, परंतु तुम्ही संपादन अ‍ॅक्सेसशिवाय फिल्टर लागू करू किंवा बदलू शकत नाही.

दृश्ये फिल्टर करा:

 • दृश्यमानता: तुम्ही फिल्टर दृश्य जोडल्यास, फक्त तुम्ही ते पाहू शकता.
 • पुनर्वापर: तुम्ही एकाहून अधिक फिल्टर दृश्ये सेव्ह करू शकता. स्प्रेडशीटचा अ‍ॅक्सेस असलेले कोणीही सेव्ह केलेली फिल्टर दृश्ये पाहू आणि लागू करू शकते.
 • परवानग्या: फिल्टर दृश्ये सेव्ह करण्यासाठी तुम्हाला संपादन अ‍ॅक्सेसची गरज आहे, परंतु तुमच्याकडे दृश्य अ‍ॅक्सेस असल्यास, तुम्ही तात्पुरती फिल्टर दृश्ये तयार करू शकता.

स्लायसर:

 • दृश्यमानता: स्प्रेडशीटचा अ‍ॅक्सेस असलेले कोणीही स्लायसरवरील फिल्टर पाहू आणि अ‍ॅडजस्ट करू शकते. तुम्ही फिल्टरवर स्लायसर जोडता तेव्हा, तुम्ही बदल डीफॉल्ट म्हणून सेट न केल्यास, ते फक्त तुम्हाला दिसतात. 
 • पुनर्वापर: स्लायसरवर लागू केलेले फिल्टर तुम्ही डीफॉल्ट म्हणून सेव्ह न केल्यास, पुनर्वापरासाठी सेव्ह केले जाऊ शकत नाहीत. तुम्ही फिल्टर निवडी डीफॉल्ट म्हणून सेव्ह करता तेव्हा, स्प्रेडशीटचा अ‍ॅक्सेस असलेल्या प्रत्येकजणासाठी त्या लागू केल्या जातील. 
 • परवानग्या: स्प्रेडशीटचा अ‍ॅक्सेस असलेली प्रत्येक व्यक्ती स्लायसर पाहू शकते, परंतु नवीन स्लायसर जोडण्यासाठी किंवा काढण्यासाठी तुम्हाला संपादन अ‍ॅक्सेस लागेल.

तुमचा स्लायसर संपादित करा

 1. तुमच्या काँप्युटरवर, sheets.google.com वर स्प्रेडशीट उघडा.
 2. स्लायसरची डेटा रेंज, स्तंभ किंवा शीर्षक बदलण्यासाठी, तुम्हाला बदलायच्या असलेल्या स्लायसरवर क्लिक करा.
 3. उजव्या बाजूला, आणखी Moreआणि त्यानंतर स्लायसर संपादित करा वर क्लिक करा.

फिल्टर पर्याय बदलण्यासाठी, फिल्टर फिल्टर वर क्लिक करा.

तुमच्या स्लायसर फिल्टर निवडी सेव्ह करा

तुम्ही तुमची स्प्रेडशीट बंद केल्यानंतर तुमच्या स्लायसरवर लागू केलेले फिल्टर ठेवण्यासाठी, ते डीफॉल्ट म्हणून सेव्ह करा. तुम्ही तुमची स्प्रेडशीट इतरांसोबत शेअर केल्यास, त्यांना डीफॉल्ट फिल्टर दिसतील.

 1. तुमच्या काँप्युटरवर, sheets.google.com वर स्प्रेडशीट उघडा.
 2. तुम्हाला डीफॉल्ट बनवायच्या असलेल्या स्लायसरच्या उजव्या बाजूला, आणखी Moreआणि त्यानंतर सद्य फिल्टर डीफॉल्ट म्हणून सेट करा वर क्लिक करा.
हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?