स्प्रेडशीटवर इमेज जोडा

तुम्ही ५० MB पेक्षा कमी आकाराच्या इमेज .png, .jpg, किंवा .gif फॉरमॅटमध्ये जोडू शकता. इमेज वापर मार्गदर्शक तत्त्वे फॉलो करा.

 1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets अ‍ॅप मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. घाला घाला आणि त्यानंतर इमेज वर टॅप करा.
 3. तुमची इमेज सेलच्या आत किंवा सेलच्या वर ठेवणे निवडा. इमेज असलेल्या सेलमध्ये मजकूरदेखील असू शकत नाही.
 4. तुमची इमेज कुठून मिळवायची ते निवडा.
 5. फोटोवर टॅप करा.

इमेज हलवा

इमेज एका सेलवरून दुसर्‍या सेलवर हलवा

 1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets अ‍ॅप मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. तुम्हाला हलवायच्या असलेल्या इमेजवर टॅप करा आणि धरून ठेवा.
 3. कट करा वर टॅप करा.
 4. तुम्हाला ज्या सेलवर इमेज हलवायची आहे त्यावर टॅप करा आणि धरून ठेवा.
 5. पेस्ट करा वर टॅप करा.

सेलच्या वर असलेली इमेज बदला

तुम्हाला हलवायच्या असलेल्या इमेजवर टॅप करा आणि ती ड्रॅग करा.

इमेज हटवा

 • सेलच्या आतील इमेज हटवण्यासाठी: इमेज आणि त्यानंतर हटवा वर टॅप करा.
 • सेलच्या वर असलेली इमेज हटवण्यासाठी: इमेजवर टॅप करा आणि धरून ठेवा, त्यानंतर साफ करा वर टॅप करा.
हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?