चार्टवर डेटा लेबले, टिपा किंवा एरर बार जोडा

ऑफिस किंवा शाळेसाठी Google Drive चा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे का? विनामूल्य G Suite चाचणीसाठी साइन अप करा.

डेटा लेबल जोडा

तुम्ही बार, कॉलम, स्कॅटर, एरिया, लाइन, वॉटरफॉल, हिस्टोग्राम किंवा पाय चार्टवर डेटा लेबल जोडू शकता. चार्टच्या प्रकारांबद्दल अधिक जाणून घ्या.

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल क्लिक करा.
 3. उजवीकडे, कस्टमाइझ करा आणि त्यानंतर सिरीझ वर क्लिक करा.
 4. “डेटा लेबल” च्या बाजूच्या बॉक्समध्ये खूण करा.

टीप: "स्थान" च्या खाली, तुमचे डेटा लेबल बारच्या आतमध्ये असावे की बाहेर हे तुम्ही निवडू शकता.  

डेटा लेबल संपादित करा

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल क्लिक करा.
 3. उजवीकडे, कस्टमाइझ करा आणि त्यानंतर सिरीझ वर क्लिक करा.
 4. तुमचे डेटा लेबल कस्टमाइझ करण्यासाठी तुम्ही स्थान, फॉंट, शैली, रंग आणि नंबर फॉरमॅट बदलू शकता. 

टीप:वैयक्तिक डेटा लेबल कस्टमाइझ करण्यासाठी मजकुरावर डबल क्लिक करा.

तुम्ही पाय चार्ट तयार करत असल्यास,

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल क्लिक करा.
 3. उजवीकडे, कस्टमाइझ करा वर क्लिक करा.
 4. पाय चार्ट वर क्लिक करा.
 5. "स्लाइस लेबल" खाली, पर्याय निवडा.
स्टॅक केलेल्या चार्टवर एकूण डेटा लेबल जोडा

तुम्ही बार, स्तंभ किंवा भाग चार्टमधील स्टॅक केलेल्या डेटाची बेरीज दाखवणारे लेबल जोडू शकता. चार्टच्या प्रकारांबद्दल अधिक जाणून घ्या.

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल क्लिक करा.
 3. उजवीकडे, कस्टमाइझ करा आणि त्यानंतर सिरीझ वर क्लिक करा.
 4. पर्यायी: "यावर लागू करा" च्या बाजूला, तुम्हाला लेबल जोडायचे असलेली डेटा सिरीझ निवडा.
 5. एकूण डेटा लेबले वर क्लिक करा.
 6. पर्यायी: लेबलच्या फॉंटमध्ये बदल करा.

चार्टवर टिपा जोडा

डेटामधील ट्रेंड स्पष्ट करण्यासाठी तुम्ही टीप किंवा भाष्य जोडू शकता.

तुम्ही टीप जोडण्यापूर्वी: तुम्ही बार, कॉलम, स्कॅटर, एरिया, लाइन आणि वॉटरफॉल चार्टवर टिपा जोडू शकता. चार्टच्या प्रकारांबद्दल अधिक जाणून घ्या.

डेटा पॉइंटवर टिपा जोडा

पहिली पायरी: मजकूर टिपा जोडा

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. प्रत्येक डेटा पॉइंटच्या उजवीकडील स्तंभामध्ये, तुमच्या मजकूर टिपा जोडा.

तुमच्या टिपा चार्टवर दिसत नसल्यास, दुसर्‍या पायरीवर जा.

उदाहरण

 • स्तंभ A: आडव्या अक्षासाठी लेबले
 • स्तंभ B: उभ्या अक्षासाठी डेटा पॉइंट
 • स्तंभ C: टिपा
  A B C
1 आठवड्याचा दिवस विक्री टिपा
2 सोमवार 50 कमी नफा
3 मंगळवार 100 ऑनलाइन कूपन घोषित केले गेले

दुसरी पायरी: लेबले जोडा

 1. तुम्हाला टिपा जोडायच्या असलेल्या चार्टवर डबल क्लिक करा.
 2. उजवीकडे, सेटअप वर क्लिक करा.
 3. "X-अक्ष" च्या बाजूच्या बॉक्समध्ये, आणखीआणखी आणि त्यानंतर लेबले जोडा वर क्लिक करा.
 4. तुमच्या टिपांसोबत डेटा रेंज एंटर करा. उदाहरणार्थ, C2:C3.
 5. ओके वर क्लिक करा.
आडव्या अक्षावर टिपा जोडा

पहिली पायरी: मजकूर टिपा जोडा

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. तुमचा X- अक्ष असलेल्या स्तंभाच्या उजवीकडे, तुमच्या टिपा जोडा.

तुमच्या टिपा चार्टवर दिसत नसल्यास, दुसर्‍या पायरीवर जा.

उदाहरण

 • स्तंभ A: आडव्या (X) अक्षासाठी लेबले
 • स्तंभ B: टिपा
 • स्तंभ C: प्रत्येक लेबलसाठी डेटा पॉइंट
  A B C
1 आठवड्याचा दिवस टिपा विक्री
2 सोमवार कमी नफा 50
3 मंगळवार ऑनलाइन कूपन घोषित केले गेले 100

.

दुसरी पायरी: लेबले जोडा

 1. तुम्हाला टिपा जोडायच्या असलेल्या चार्टवर डबल क्लिक करा.
 2. उजवीकडे, सेटअप वर क्लिक करा.
 3. "मालिका" च्या बाजूच्या बॉक्समध्ये, आणखी आणखी आणि त्यानंतर लेबले जोडा वर क्लिक करा.
 4. तुमच्या टिपांसोबत डेटा रेंज एंटर करा. उदाहरणार्थ, B2:B3.

चार्टवर एरर बार जोडा

तुम्ही स्थिरांक मूल्य, विशिष्ट आयटमचे टक्केवारी मूल्य किंवा मालिकेच्या साधारण विचलन मूल्याच्या आधारावर बार किंवा रेखा चार्टवर एरर बार जोडू शकता. तुम्ही साधारण विचलन प्रकार निवडल्यास, एरर बार मालिकेच्या मध्यकावर केंद्रित केले जातात, प्रत्येक स्वतंत्र आयटमच्या मूल्यावर नव्हे.

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. संपादक पॅनल उघडण्यासाठी, चार्टवर डबल क्लिक करा.
 3. कस्टमाइझ करा आणि त्यानंतर सिरीझ वर क्लिक करा.
 4. “एरर बार” च्या बाजूच्या बॉक्समध्ये खूण करा.
 5. प्रकार आणि मूल्य निवडा.
हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?