तुमच्या चार्टचे अक्ष संंपादित करा

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

दुसरा Y-अक्ष जोडा

तुम्ही रेषा, भाग किंवा स्तंभ चार्टवर दुसरा Y-अक्ष जोडू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल-क्लिक करा.
  3. उजवीकडे, कस्टमाइझ करा वर क्लिक करा.
  4. मालिका वर क्लिक करा.
  5. पर्यायी: "यावर लागू करा" च्या बाजूला, तुम्हाला उजव्या अक्षावर दिसायला हवी असलेली डेटा मालिका निवडा.
  6. "अक्ष" खाली, उजवा अक्ष निवडा.
  7. अक्ष कस्टमाइझ करण्यासाठी, उजवा उभा अक्ष वर क्लिक करा. त्यानंतर, तुम्हाला हवे असलेले बदल करा.

टीप: तुम्ही दुसरा X-अक्ष जोडू शकत नाही, पण तुम्ही सिरीझचे संच जोडणे हे करू शकता.

चार्टमधील पंक्ती आणि स्तंभ स्विच करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल-क्लिक करा.
  3. उजवीकडे, सेटअप वर क्लिक करा.
  4. पंक्ती / स्तंभ स्विच करा वर क्लिक करा.

अक्ष कस्टमाइझ करा

उभा अक्ष संंपादित करा

तुम्ही लेबले फॉर्मॅट करू शकता, किमान किंवा कमाल मूल्ये सेट करू शकता आणि स्केल बदलू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल-क्लिक करा.
  3. उजवीकडे, कस्टमाइझ करा वर क्लिक करा.
  4. उभा अक्ष वर क्लिक करा.
  5. तुम्‍हाला हवे असलेले बदल करा.

टीप: उभ्या अक्षाची रेषा लपवण्यासाठी, "अक्ष रेषा दाखवा" शेजारी असलेल्या चौकटीतली खूण काढून टाका.

आडव्या अक्षावर कोणता डेटा दिसतो ते निवडा
  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. आपल्याला आपल्या चार्टमध्ये समाविष्ट करायचे सेल्स निवडा.
  3. चार्ट आणि त्यानंतर घालावर क्लिक करा.
  4. उजवीकडे, सेटअप वर क्लिक करा.
  5. "x-अक्ष" च्या बाजूच्या बॉक्समध्ये, आणखी आणखी आणि त्यानंतर संपादित करा वर क्लिक करा.
  6. तुम्हाला आडव्या अक्षावर दिसायला हवे असलेले सेल निवडा.
  7. ओके वर क्लिक करा.
आडवा अक्ष संंपादित करा

तुम्ही लेबले फॉरमॅट करू शकता किंवा अक्षांचा क्रम उलट करू शकता.

टीप: चार्टमध्ये वेळ मालिका किंवा संख्यात्मक डेटा असल्यास, तुम्ही किमान आणि कमाल मूल्येदेखील बदलू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल-क्लिक करा.
  3. उजवीकडे, कस्टमाइझ करा वर क्लिक करा.
  4. आडवा अक्ष वर क्लिक करा.
  5. तुम्‍हाला हवे असलेले बदल करा.

आडव्या अक्षावरील डेटा एकत्रित करा

अधिक माहिती दाखवण्यासाठी, तुम्ही आडव्या अक्षावरील स्तंभांच्या गटांना लेबल लावू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. डेटामध्ये X-अक्ष स्तंभापेक्षा अधिक डेटा असल्याची खात्री करा. उदाहरणार्थ: वार्षिक, तिमाही आणि मासिक.
  3. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल-क्लिक करा.
  4. उजवीकडे, सेटअप वर क्लिक करा.
  5. “गट करणे” च्या बाजूला, जोडा वर क्लिक करा.
  6. तुम्हाला हवा असलेला गट निवडा.
  7. आणखी गट जोडण्यासाठी, जोडा वर पुन्हा क्लिक करा.

सिरीझचे संच जोडणे (डोमेन सेट)

डेटाचे सेट एका बाजूला एक दाखवण्यासाठी, तुम्ही तुमच्या स्प्रेडशीट आणि चार्टमध्ये X-अक्ष स्तंभ जोडू शकता. बार चार्टसाठी, तुम्ही Y-अक्ष स्तंभदेखील जोडू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल-क्लिक करा.
  3. उजवीकडे, सेटअप वर क्लिक करा.
  4. तळाशी, अक्ष आणि सिरीझचा संच जोडा वर क्लिक करा.
  5. तुमचा X-अक्ष आणि सिरीझ निवडा.
सिरीझचे आणखी संच जोडण्यासाठी, अक्ष आणि सिरीझचा संच जोडा वर पुन्हा क्लिक करा.

अक्षांचे शीर्षके आणि खुणा बदलणे

अक्षाची शीर्षके जोडणे आणि संपादित करणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल-क्लिक करा.
  3. उजवीकडे, कस्टमाइझ करा वर क्लिक करा.
  4. चार्ट व ॲक्सिस शीर्षकावरक्लिक करा.
  5. ’टाईप’च्या बाजूस आपण बदलू इच्छिता ते शीर्षक निवडा.
  6. "शीर्षक मजकूर," खाली एक शीर्षक प्रविष्ट करा.
  7. शीर्षक व फॉंटमध्ये बदल करा.
टिक मार्क जोडाआणि फॉरमॅट करा
  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल-क्लिक करा.
  3. उजवीकडे, कस्टमाइझ करा वर क्लिक करा.
  4. "ग्रिडलाइन आणि खुणा" या अंतर्गत, "मोठ्या खुणा" यांशेजारी असलेल्या चौकटीत खूण करा.
  • पर्यायी: मोठ्या खुणांदरम्यान छोट्या खुणा करण्यासाठी, तुम्ही "छोट्या खुणा" यांशेजारी असलेल्या चौकटीत खूण करू शकता.

टीप: तुमचा अक्ष कस्टमाइझ करण्यासाठी, तुम्ही खुणांदरम्यानची जागा, रेषेची जाडी आणि रंग बदलू शकता.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4993168970038877385
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false