Google Sheets सोबत Salesforce डेटा इंपोर्ट, संपादित आणि सिंक करा


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

महत्त्वाचे: हे अ‍ॅड-ऑन फक्त इंग्रजीत आहे.

अ‍ॅड-ऑन मिळवा

तुम्ही Google Sheets सोबत Salesforce डेटा इंपोर्ट, अपडेट करण्यापूर्वी किंवा हटवण्यापूर्वी, अ‍ॅड-ऑन सेट करा.

पहिली पायरी: अ‍ॅड-ऑन डाउनलोड करा

  1. Google Sheets मध्‍ये शीट उघडा.
  2. सर्वात वरती, एक्स्टेंशनआणि त्यानंतरअ‍ॅड-ऑन आणि त्यानंतर अ‍ॅड-ऑन मिळवा वर क्लिक करा.
  3. शोध बारमध्ये सर्वात वरती उजवीकडे, "Salesforce साठी डेटा कनेक्टर" शोधा.
  4. अ‍ॅड-ऑनच्या बाजूला, जोडा Plus वर क्लिक करा.

दुसरी पायरी: Salesforce शी कनेक्ट करा

  1. तुम्ही अजून तसे केले नसल्यास, Google Sheets मध्‍ये शीट उघडा.
  2. सर्वात वरती, एक्स्टेंशन आणि त्यानंतर Salesforce साठी डेटा कनेक्टर आणि त्यानंतर Salesforce मध्ये लॉग इन करा वर क्लिक करा.
  3. सुरू ठेवा वर क्लिक करा.
  4. अनुमती द्या वर क्लिक करा.
  5. ड्रॉप-डाउन मेनूमधून, तुम्हाला साइन इन करायचे असलेले Salesforce पर्यावरण निवडा.
  6. परवानगी द्या वर क्लिक करा.
  7. तुमचे Salesforce वापरकर्ता नाव आणि पासवर्डने साइन इन करा.

डेटा इंपोर्ट, अपडेट करा आणि हटवा

डेटा इंपोर्ट करा

तुम्ही Salesforce वरून Google spreadsheet वर डेटा कॉपी करू शकता.

  1. Google Sheets मध्‍ये शीट उघडा.
  2. सर्वात वरती, एक्स्टेंशन आणि त्यानंतर Salesforce साठी डेटा कनेक्टर आणि त्यानंतर उघडा वर क्लिक करा.
  3. उजवीकडे, पर्याय निवडा:
    • अहवाल: तुमच्या स्प्रेडशीटमध्ये सद्य Salesforce अहवाल आणा.
    • इंपोर्ट करा: क्वेरी बिल्डर किंवा SOQL वापरून Salesforce वरून डेटा इंपोर्ट करा.
  4. शोध बारमध्ये तुमचा स्रोत अहवाल, ऑब्जेक्ट, भाग किंवा फिल्टर टाइप करा.
    • अहवाल: तुमचा अहवाल सद्य शीटवर किंवा नवीन शीटवर इंपोर्ट करणे निवडा.
    • इंपोर्ट करा: कमाल पाच स्रोत ऑब्जेक्ट, भाग आणि फिल्टर जोडा.
  5. डेटा मिळवा किंवा पूर्ण झाले वर क्लिक करा.

डेटा अपडेट करा आणि हटवा

महत्त्वाचे: तुमच्या Salesforce खात्यामधील Google Sheets मध्ये केलेले बदल अपडेट करण्यासाठी किंवा हटवण्यासाठी अ‍ॅड-ऑन वापरले जाऊ शकते; वापरताना साधगिरी बाळगा.

डेटा अपडेट करा

तुमच्या Google स्प्रेडशीटमध्ये तुम्ही डेटा संपादित करू शकता आणि बदल Salesforce वर ट्रान्स्फर करू शकता.

  1. Google Sheets मध्‍ये शीट उघडा.
  2. सर्वात वरती, एक्स्टेंशन आणि त्यानंतर Salesforce साठी डेटा कनेक्टर आणि त्यानंतर उघडा वर क्लिक करा.
  3. तुम्ही अजून तसे केले नसल्यास, तुम्हाला बदलायचा असलेला डेटा इंपोर्ट करा. डेटा कसा इंपोर्ट करायचा ते जाणून घ्या.
  4. तुमचा डेटा संपादित करा.
  5. उजवीकडे, अपडेट करा वर क्लिक करा.
  6. तुम्हाला अपडेट करायच्या असलेल्यापंक्‍ती आणि स्‍तंभ हायलाइट करा.
  7. निवडलेली रेंज रिफ्रेश करा वर क्लिक करा.
  8. तुम्हाला अपडेट करायचा असलेला Salesforce स्रोत ऑब्जेक्ट निवडा.
  9. पर्याय निवडा:
    • घाला: स्प्रेडशीटमधील सर्व डेटा Salesforce वर नवीन रेकॉर्ड म्हणून एक्सपोर्ट करा.
    • अपडेट करा: सद्य Salesforce रेकॉर्ड अपडेट करा.
    • घाला किंवा अपडेट करा: Salesforce मध्ये नवीन रेकॉर्ड तयार करा किंवा सद्य रेकॉर्ड अपडेट करा.
  10. तुमचा परिणाम स्तंभ निवडा.
  11. पूर्ण झाले वर क्लिक करा.

डेटा रिफ्रेश करा

Sheets मध्ये आधीच इंपोर्ट केलेल्या अहवालांसाठी तुम्ही तुमचा डेटा मॅन्युअली किंवा सेट केलेल्या शेड्युलवर रिफ्रेश करू शकता.
  1. Google Sheets मध्‍ये शीट उघडा.

  2. सर्वात वरती, एक्स्टेंशन आणि त्यानंतर Salesforce साठी डेटा कनेक्टर आणि त्यानंतर उघडा वर क्लिक करा.

  3. उजवीकडे, रिफ्रेश करा वर क्लिक करा.

    • ऑटोमॅटिक रिफ्रेश शेड्युल तयार करण्यासाठी, तयार करा आणि त्यानंतर ड्रॉप डाउन मेनूमधून वेळ मध्यांतर निवडा (४, ८ किंवा २४ तास) आणि त्यानंतर तयार करा वर क्लिक करा.

    • डेटा एकदा मॅन्युअली रिफ्रेश करण्यासाठी, रिफ्रेश करा वर क्लिक करा.

डेटा हटवा

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य तुम्ही Sheets मध्ये हायलाइट केलेली रेकॉर्ड Salesforce वरून हटवेल; वापरताना सावधगिरी बाळगा. हटवलेला डेटा रिस्टोअर कसा करायचा ते जाणून घेण्यासाठी Salesforce मदत केंद्राला भेट द्या.

  1. Google Sheets मध्‍ये शीट उघडा.
  2. सर्वात वरती, एक्स्टेंशन आणि त्यानंतर Salesforce साठी डेटा कनेक्टर आणि त्यानंतर उघडा वर क्लिक करा.
  3. तुम्हाला बदलायचा असलेला डेटा इंपोर्ट करा. डेटा कसा इंपोर्ट करायचा ते जाणून घ्या.
  4. अ‍ॅड-ऑन बॉक्समध्ये, हटवा वर क्लिक करा.
  5. तुम्हाला हटवायच्या असलेल्यापंक्‍ती आणि स्‍तंभ हायलाइट करा.
  6. निवडलेली रेंज रिफ्रेश करा वर क्लिक करा.
  7. तुम्हाला हटवायचा असलेला Salesforce स्रोत ऑब्जेक्ट निवडा.
  8. तुमचा प्राथमिक की स्तंभ निवडा.
  9. हटवा वर क्लिक करा.

स्क्रिप्ट आणि अ‍ॅड-ऑनबद्दल जाणून घ्या

अ‍ॅड-ऑन Google Apps स्क्रिप्ट अतिरिक्त अटी यांनी कव्हर केले आहेत.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9412798665353777916
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false