Google Sheets मध्ये अटीबध्द फॉर्मॅटिंग नियम वापरा

काही अटींची पूर्तता केली तर मजकूर किंवा बॅकग्राउंड रंग बदलण्यासाठी सेल्स,पंक्ती किंवा स्तंभ फॉर्मॅट केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, त्यांच्यात एक विशिष्ट शब्द किंवा संख्या समाविष्ट असेल तर.

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. ज्यांना आपणास फॉर्मॅटिंग नियम लागू करायचे आहेत ते सेल्स निवडा.
 3. फॉर्मॅट आणि त्यानंतर अटीबध्द फॉर्मॅटिंगवर क्लिक करा. उजवीकडे एक टूलबार उघडेल.
 4. एक नियम तयार करा.
  • एकच रंग:"फॉर्मॅट सेल्स जर" खाली,आपण जो नियम ट्रिगर करू इच्छिता ती अट निवडा. "फॉर्मॅटिंग शैली" खाली ,अटी पूर्ण झाल्यावर सेल कसा दिसेल ते निवडा.
  • रंग श्रेणी: "पूर्वावलोकन करणे" खाली, रंग श्रेणी निवडा. या नंतर, एक किमान व कमाल मूल्य आणि एक ऐच्छिक मध्यबिंदु मूल्य निवडा. मूल्य वर्ग निवडण्यासाठी, डाऊन ॲरोवर क्लिक करा डाउन ॲरो.
 5. पूर्ण झाले वर क्लिक करा.
उदाहरण

कोणत्या विद्यार्थ्यांनी 80%.पेक्षा कमी गुण मिळवले ते चाचणी गुण शिक्षक ठळक करू शकतात.

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. चाचणी गुण निवडा.
 3. फॉर्मॅट आणि त्यानंतर अटीबध्द फॉर्मॅटिंगवर क्लिक करा.
 4. "फॉर्मॅट सेल्स ,जर" खालीपेक्षा कमीवर क्लिक करा. आधीच जर नियम असेल,तर त्यावर क्लिक करा किंवानविन नियम आणि त्यानंतर पेक्षा कमीजोडा. 
 5. मूल्य किंवा सूत्रवर क्लिक करा आणि 0.8 प्रविष्ट करा.
 6. लाल रंग निवडण्यासाठी,भरा वर क्लिक करा कलर फिल.
 7. पूर्ण झाले वर क्लिक करा. कमी गुण लाल रंगात हायलाइट केले जातील.

प्रगत अटीबध्द फॉर्मॅटिंग वापरा.

अटीबध्द फॉर्मॅटिंग सह कस्टम सूत्रे वापरा

इतर सेल्स मधील आशयाच्या आधारावर, एक किंवा अधिक सेल्सना फॉर्मॅटिंग लागू करण्यासाठी आपण कस्टम सूत्रे वापरू शकता.

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. आपल्याला फॉर्मॅट करायचे सेल्स निवडा.
 3. फॉर्मॅट आणि त्यानंतर अटीबध्द फॉर्मॅटिंगवर क्लिक करा.
 4. "फॉर्मॅट सेल्स जर"खाली ड्रॉप डाऊन मेनुत कस्टम सूत्र आहेव्रर क्लिक करा.आधीच नियम असला, तर तो क्लिक करा किंवा  आणि त्यानंतर कस्टम सूत्र असे आहेअसा नवा नियम जोडा.
 5. मूल्य किंवा सूत्रवर क्लिक करा आणि सूत्र व नियम जोडा.
 6. पूर्ण झाले वर क्लिक करा.

टीप: स्टॅंडर्ड नोटेशन (='sheetname'!cell) वापरून सूत्रे फक्त त्याच शीटला संदर्भित करू शकतात. सूत्रातील अन्य शीट संदर्भित करण्यासाठीअप्रत्यक्षकार्य वापरा.

उदाहरण 1

आपल्या डेटामध्ये तेच मूल्य एकाहून अधिक वेळा दिसत असेल तेव्हा हायलाईट कार्ण्यासाठी:

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. आपण फॉर्मॅट करू इच्छिता ती रेंज निवडा. उदा सेल्स A1 ते A100.
 3. फॉर्मॅट आणि त्यानंतर अटीबध्द फॉर्मॅटिंगवर क्लिक करा.
 4. "फॉर्मॅट सेल्स जर"खाली ड्रॉप डाऊन मेनुत कस्टम सूत्र आहेव्रर क्लिक करा.आधीच नियम असला, तर तो क्लिक करा किंवा  आणि त्यानंतर कस्टम सूत्र असे आहेअसा नवा नियम जोडा.
 5. पहिल्या पंक्तीसाठी नियम लिहा. या बाबतीत ,नियम असा असेल, "=COUNTIF($A$1:$A$100,
 6. इतर फॉर्मॅटिंग गुणधर्म निवडा.
 7. पूर्ण झाले वर क्लिक करा.

उदाहरण 2

त्या पंक्तीतील सेल्सपैकी एकाच्या मूल्याच्या आधारावर एक संपूर्ण पंक्ती फॉर्मॅट करणे:

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. आपल्याला फॉर्मॅट करायची रेंज निवडा,उदा स्तंभ A:E.
 3. फॉर्मॅट आणि त्यानंतर अटीबध्द फॉर्मॅटिंगवर क्लिक करा.
 4. "फॉर्मॅट सेल्स जर"खाली ड्रॉप डाऊन मेनुत कस्टम सूत्र आहेव्रर क्लिक करा.आधीच नियम असला, तर तो क्लिक करा किंवा  आणि त्यानंतर कस्टम सूत्र असे आहेअसा नवा नियम जोडा.
 5. पहिल्या पंक्तीसाठी नियम लिहा. उदाहरणार्थ: स्तंभ B मधील पूर्ण मूल्य "Yes" असतांना आपणास पूर्ण पंक्ती हिरवी करायची असेल,तर "=$B1="Yes"." सारखे सूत्र लिहा.
 6. इतर फॉर्मॅटिंग गुणधर्म निवडा.
 7. पूर्ण झाले वर क्लिक करा.

केवल वि.तुलनात्मक संदर्भ

अनेकदा,आपल्याला , सूत्रांतील अक्षरांच्या आणि संख्यांच्या पुढे डॉलर ($) चिन्ह जोडावे लागते ज्या मुळे तुलनात्मक संदर्भांऐवजी केवल संदर्भांना जोडावे लागते. (A1 ते B1, A2 ते B2).

अटीबध्द फॉर्मॅटिंगसह वाइल्डकार्ड वर्णांचा वापर

अनेक एक्स्प्रेशन्सशी जुळव्ण्यासाठी आपण वाइल्डकार्ड्स वर्ण वापरू शकता. "मजकूरात समाविष्ट" किंवा "मजकूरात समाविष्ट नाही" फिल्डसमध्ये फॉर्मॅटिंग करतांना वाइल्डकार्ड वर्ण वापरता येतात.

 • कोणताही एक वर्ण जुळवण्यासाठी प्रश्न चिन्ह (?) वापरा. उदाहरणार्थ, "a?c" समाविष्ट असणारा मजकूर नियम "abc" फॉर्मॅट करेल, परंतु "ac" किंवा"abbc करणार नाही.
 • शून्य किंवा अधिक वर्ण जुळवण्यासाठी एक ॲस्टरिक (*) वापरा. उदाहरणार्थ, "a*c" समाविष्ट असणारा मजकूर नियम "abc","ac" ,किंवा"abbc" फॉर्मॅट करेल, परंतु "ab" किंवा "ca." करणार नाही.
 • मजकूरात एक प्रश्न चिन्ह किंवा ॲस्टरिक जुळवण्यासाठी,आपण त्यांच्या समोर एक टिल्डे (~) जोडून वाइल्डकार्ड वर्ण सोडू शकता. उदाहरणार्थ, "a*~?c" समाविष्ट असणारा मजकूर नियम "a?c" फॉर्मॅट करेल, परंतु "ab" किंवा "a~?c." करणार नाही.

टिपा:

 • एक नियम काढण्यासाठी,नियमाकडे पॉइंट करा आणि काढा वर क्लिक कराकाढा.
 • क्रमाने लावलेली सूचीप्रमाणे नियमांचे मूल्यांकन केले जाते. सत्य म्हणून प्रथम मिळालेला नियम सेल किंवा रेंजच्या फॉर्मॅटची व्याख्या करेल. नियमांचा क्रम पुन्हा लावण्यासाठी,क्लिक करा आणि ते ड्रॅग करा.
 • आपण फॉर्मॅटिंग नियम असणार्‍या सेल किंवा रेंजमधून कॉपी आणि पेस्ट केले तर आपण कॉपी केलेला डेटा पेस्ट करता तेव्हा हे नियम लागू केले जातील.
हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?