चेकबॉक्‍स जोडा आणि वापरा

तुम्‍ही स्‍प्रेडशीटमधील सेलमध्‍ये चेकबॉक्‍स जोडू शकता. अनेक उद्देशांसाठी चेकबॉक्‍स वापरा जसे की प्रोजेक्‍टचा ट्रॅक ठेवणे, उपस्थिती ठेवणे आणि तुमची टू-डू सूची तपासा.

चेकबॉक्स घाला

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Sheets मध्‍ये स्‍प्रेडशीट उघडा.
  2. तुम्‍हाला ज्‍या सेलवर चेकबॉक्‍स हवे आहेत ती निवडा.
  3. मेनूमध्‍ये वर, घाला आणि त्यानंतर चेकबॉक्‍स वर क्लिक करा.
  4. चेकबॉक्‍स काढण्‍यासाठी, तुम्‍हाला काढायचे असलेले चेकबॉक्‍स निवडा आणि हटवा दाबा.

टीप: तुम्‍ही चार्ट, फिल्‍टर, पिव्‍हट सारण्‍या आणि सूत्रांसह चेकबॉक्‍स वापरू शकता.

कस्‍टम चेकबॉक्‍स मूल्‍ये जोडा

तुम्‍ही कस्‍टम मूल्‍यांसह चेकबॉक्‍स जोडू शकता. उदाहरणार्थ, कस्‍टम चेक मूल्‍य "होय" असू शकते आणि अनचेक मूल्‍य "नाही" असू शकते.

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Sheets मध्‍ये स्‍प्रेडशीट उघडा.
  2. तुम्‍हाला ज्‍या सेलवर चेकबॉक्‍स हवे आहेत ती निवडा.
  3. मेनूमध्‍ये वर, डेटा आणि त्यानंतर डेटा पडताळणी वर क्लिक करा.
  4. "निकष" च्‍या पुढील, चेकबॉक्‍स निवडा.
  5. कस्‍टम सेल मूल्‍ये वापरा वर क्लिक करा.
  6. "चेक केले" च्‍या पुढील, मूल्‍य एंटर करा
  7. पर्यायी: "अनचेक केले" च्‍या पुढील, मूल्‍य एंटर करा.
  8. सेव्ह करा वर क्लिक करा.

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5677181507219569840
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false