Google Docs, Sheets, Slides आणि Forms संपादित करण्याबाबत समस्या

तुम्हाला Google Docs, Sheets, Slides किंवा Forms उघडण्यात किंवा संपादित करण्यात समस्या असल्यास, तुम्ही खाली दिलेल्या काही पायर्‍या वापरून पाहू शकता.

टीप: तुम्हाला Google Drive बाबत फाइल अपलोड करणे किंवा दस्तऐवज सिंक करणे यांसारख्या समस्या असल्यास, Google Drive मदत केंद्र पहा.

आधी वापरून पाहण्याच्या पायर्‍या

पेज रिफ्रेश करा

तुम्ही फाइल उघडू किंवा संपादित करू शकत नसल्यास, पेज रिफ्रेश करून पहा. खाली तुमचा ब्राउझर निवडा:

  • Google Chrome: वर डावीकडे, हे पेज रीलोड करा रीलोड करा वर क्लिक करा.
  • Safari: पहा आणि त्यानंतर पेज रीलोड करा.
  • Firefox: वरच्या बाजूला, सद्य पेज रीलोड करावर क्लिक करा.
  • Internet Explorer: तुमच्या कीबोर्डवर, F5 दाबा.
  • Microsoft Edge: तुमच्या कीबोर्डवर, F5 दाबा.
तुमची फाइल वेगळ्या ब्राउझरमध्ये उघडा

काय तपासायचे

तुम्ही काय करून पाहू शकता

  • तुमची फाइल दुसर्‍या काँप्युटरवर किंवा Chrome, Safari अथवा Firefox सारख्या वेगळ्या वेब ब्राउझरमध्ये उघडा.
फाइल कशी शेअर केली गेली आहे ते तपासा

तुम्ही "फक्त पहा" फाइल संपादित करण्याचा प्रयत्न करत असल्यास, तुम्हाला कदाचित यश मिळणार नाही. तुम्ही Google Docs, Sheets किंवा Slides मध्ये फाइल उघडू शकत नसल्यास, येथे क्लिक करा.

फाइलचा फॉरमॅट तपासा
आणखी लहान फाइल वापरून पहा

तुमची फाइल Google Docs Editors ची आकार मर्यादा ओलांडत नाही याची खात्री करा.

Google Docs, Sheets आणि Slides किती मोठ्या असू शकतात ते जाणून घ्या.

वापरून पाहण्यासाठी प्रगत पायर्‍या

ब्राउझर प्लग-इन आणि एक्स्टेंशन बंद करा

काही वेळा ब्राउझर एक्स्टेंशन आणि प्लग-इन Google Docs, Sheets, Slides किंवा Forms मध्ये समस्या निर्माण करू शकतात.

कसे ते जाणून घेण्यासाठी, तुमचा ब्राउझर निवडा:

कॅशे आणि कुकी साफ करा

तुमचा कॅशे आणि कुकी कशा साफ करायच्या ते जाणून घेण्यासाठी, खाली तुमचा ब्राउझर निवडा:

ऑफलाइन सेटिंग्ज बंद आणि पुन्हा सुरू करा

तुमच्या सेटिंग्जवर अवलंबून, तुम्ही तुमच्या फाइलवर ऑफलाइन काम करू शकता. Google Docs, Sheets आणि Slides यांवर ऑफलाइन काम कसे करायचे त्याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही ऑफलाइन अ‍ॅक्सेस सुरू केलेला असल्यास, तुम्ही तो बंद आणि पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Docs, Sheets किंवा Slides होम स्क्रीन उघडा.
  2. वर डावीकडे, मेनू मेनू वर क्लिक करा.
  3. सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. "ऑफलाइन" सुरू असल्यास, ते बंद करा.
काँप्युटर फायरवॉलसाठी तपासा

फायरवॉल असल्यास, डोमेन किंवा नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेटरला फायरवॉल किंवा सर्व्हर सेटिंग्ज बाबत तुम्हाला मदत करण्यास सांगा.

तुम्हाला तुमच्या समस्येचे उत्तर मिळाले नसल्यास, तुम्ही Google Docs फोरम वर प्रश्न विचारू शकता.

हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?